CTET Exam Hall Ticket Link : केन्द्रीय शिक्षक पात्रता परीक्षा हॉल तिकीट येथे डाउनलोड करा - डायरेक्ट लिंक

CTET Exam Hall Ticket Link : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून Central Teacher Eligibility Test (CTET) केन्द्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे हॉल तिकीट उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. परीक्षा पद्धतीमध्ये बदल करण्यात आला असून, आता OMR पद्धतीने म्हणजेच ऑफलाईन परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे.

$ads={1}

CTET Exam Hall Ticket Link

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या ज्या उमेदवारांनी 27/04/2023 ते 26/05/2023 पर्यंत अर्ज प्रक्रिया पूर्ण करून परीक्षा शुल्क भरले होते, त्यांना CTET Admit Card उपलब्ध करून देण्यात आले आहे. आता ही परीक्षा 20/08/2023 रोजी OMR आधारित (ऑफलाईन) घेतली जाणार असल्याचे परीक्षा मंडळाकडून कळविण्यात आले आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अर्जदारांना कळविण्यात आले आहे की, सीटीईटी अर्ज करताना त्यांनी ऑनलाइन परीक्षेनुसार परीक्षेच्या शहरांची निवड केली होती, परंतु आता परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतली जात असल्याने, परीक्षा केंद्रांच्या उपलब्धतेनुसार परीक्षा शहरे बदलली आहेत. त्यामुळे, अर्जदारांनी त्यांच्या ऑनलाइन फॉर्ममध्ये दिलेल्या त्यांच्या सध्याच्या पत्त्याचा जिल्हा आधार म्हणून लक्षात घेऊन, त्यांना त्यांच्या सध्याच्या पत्त्याच्या जिल्ह्याच्या जवळचे परीक्षा शहर हे परीक्षा केंद्रांचे शहर म्हणून देण्यात आले आहे. 

CTET Exam Hall Ticket Link

केन्द्रीय शिक्षक पात्रता (CTET) परीक्षा हॉल तिकीट असे डाउनलोड करा

  1. सर्वप्रथम अधिकृत खाली दिलेल्या अ‍ॅडमिट कार्ड लिंकवर क्लिक करा
  2. त्यांनतर  लॉगिन पेजवर आवश्यक माहिती भरा. त्यामध्ये Application No, Date of Birth, Enter Security Pin, Security Pin माहिती भरून सबमिट बटनावर क्लिक करा.
  3. आता तुमचे हॉल तिकीट स्क्रीन वर दिसेल ते डाउनलोड करा आणि प्रिंट काढा.

केन्द्रीय शिक्षक पात्रता परीक्षा हॉल तिकीट येथे डाउनलोड करा - डायरेक्ट लिंक

अधिकृत वेबसाईट - https://ctet.nic.in/

तलाठी भरती महत्वाची लेटेस्ट अपडेट पहा

Previous Post Next Post