MPSC PSI Recruitment 2023 : राज्यातील या कर्मचाऱ्यांना PSI होण्याची सूवर्णसंधी! पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील तब्बल 615 पदांची महाभरती

MPSC PSI Recruitment 2023 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त यंदा राज्यांमध्ये विविध विभागाअंतर्गत रिक्त असणाऱ्या  75 हजार सरळसेवा कोट्यातील पदांसाठी मेगा भरती होत आहे, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग तसेच तलाठी भरती सध्या सुरु असून, इतर पदांची देखील महाभरती सुरु आहे, नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पोलीस उपनिरीक्षक PSI संवर्गातील तब्बल 615 पदांच्या भरती करिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

$ads={1}

पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील तब्बल 615 पदांची महाभरती

MPSC PSI Recruitment 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील PSI म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक PSI संवर्गातील 615 पदांच्या भरती करिता जाहिरात प्रसिद्ध निघाली असून, सदरची पूर्व परीक्षा 2 डिसेंबर 2023 रोजी होणार आहे, तर या भरतीसाठी पात्र उमेदवारांना 11 सप्टेंबर 2023 पासून ते 3 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे.

MPSC PSI Recruitment 2023 last date

पदाबाबत सर्वसाधारण तपशील

  • पदाचे नाव - पोलीस उपनिरीक्षक (PSI)
  • एकूण जागा - 615 पदे
  • वेतनश्रेणी - S-14 : 38600-122800 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते

राज्यातील या कर्मचाऱ्यांना PSI होण्याची सूवर्णसंधी! 

पोलीस उपनिरीक्षक PSI पदासाठी आवश्यक पात्रता

जाहिरातीनुसार निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास म्हणजेच दिनांक 3 ऑक्टोबर 2023 रोजी विहित शैक्षणिक अहर्ता असणे आवश्यक आहे.

सदर पदांची जाहिरात ही राज्यातील गृह विभागाच्या अखत्यारीतील सध्या कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई या संवर्गातील कर्मचारीच या परीक्षेस पात्र असणार आहे. म्हणजेच राज्यातील या कर्मचाऱ्यांना PSI होण्याची संधी मिळणार आहे. सदर PSI पदांची जाहिरात ही पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 करिता आहे.

कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पगार वेळेत होण्यासाठी घेतला निर्णय

$ads={1}

अधिकृत वेबसाईट (ऑनलाईन अर्ज लिंक) - https://mpsc.gov.in/

करार कर्मचाऱ्यांना सुधारित मानधन! - बाह्ययंत्रणेमार्फत नियुक्त कर्मचाऱ्यांना 83% मानधन मिळणार

मोठी अपडेट ! तलाठी भरती परीक्षेच्या तारखेबाबत जाहीर सूचना! सविस्तर वाचा

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post