महत्वाची अपडेट! महाराष्ट्र नगरपिरषद राज्यसेवा परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Rajyaseva Exam Date 2023: नगरपरिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा संवर्गामधील विविध पदे नामनिर्देशनाने, सरळसेवेने भरण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट - क परीक्षा - २०२३ पदभरतीची जाहिरात दि. १३ जुलै, २०२३ रोजी राज्यातील विविध वृत्तपत्रात, संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती, आता ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

महाराष्ट्र नगरपिरषद राज्यसेवा परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Rajyaseva Exam Date 2023

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग तसेच केंद्र शासनाच्या कामगार व रोजगार मंत्रालयाच्या National Career Service या पोर्टलवर सदर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती, त्यानुसार १३ जुलै २०२३ ते २० ऑगस्ट २०२३ या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते.

आता Maharashtra Municipal Council Rajyaseva Group - C Examination सदर विविध संवर्गांची ऑनलाईन परीक्षा ही दि. २५ ऑक्टोबर २०२३ ते दि. ०३ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे. याबाबत संवर्गनिहाय सविस्तर वेळापत्रक परीक्षेपूर्वी https://mahadma.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे.

Rajyaseva Exam Date 2023

कर्मचारी राज्य विमा महामंडळात मोठी भरती सुरु, लगेच करा अर्ज
LPG सिलिंडरवर 300 रुपयांची सबसिडी मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

सरकारी जॉब अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post