अध्ययन अक्षमतेची कारणे | Causes of Learning Disability

अध्ययन अक्षमता म्हणजे हा विविध अक्षमतांचा समूह असतो. त्यामध्ये साधारणपणे बोलणे, ऐकणे, वाचन-लेखन, गणितीय आकडेमोड, भाषा आकलन, विचार प्रक्रिया, तर्कशक्ती आदि. अक्षमतांचा समावेश असतो. याबद्दलची सविस्तर माहिती आपण यापूर्वीच्या अध्ययन अक्षमता म्हणजे काय? या लेखामध्ये घेतली आहे. अध्ययन अक्षमता संबंधित असणारे गैरसमज व वास्तव काय आहे? आणि अध्ययन अक्षमता कशामुळे निर्माण होते? या बद्दलची देखील सविस्तर माहिती घेतली. आज आपण मुलांमध्ये किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये अध्ययन अक्षमता का निर्माण झालेली असते? अध्ययन अक्षममतेची कारणे कोणते असतात? (Causes of Learning Disability) बद्दलची माहिती आज आपण पाहूया.


{tocify} $title={अनुक्रमणिका}


अध्ययन अक्षमतेची कारणे | Causes of Learning Disability

प्रत्येक आई-वडिलांना वाटत असते की, आपले मुल हे निरोगी राहावे. त्याने त्या-त्या वयामध्ये रांगणे, चालणे, बोलणे इत्यादी क्रिया नैसर्गिक रित्या पूर्ण कराव्यात. मात्र जेव्हा मूल हळूहळू मोठे होत जाते. तेव्हा मुलाच्या वयोमानानुसार मुल काही गोष्टींना प्रतिसाद देत नाही. तेव्हा पालकांच्या लक्षात येऊ लागते की, या मुलांमध्ये सामान्य मुलांपेक्षा याचा विकास हा संथगतीने होत आहे.  अशावेळी पालकांच्या मनामध्ये एक नकारात्मक भावना निर्माण होऊ शकते. अशावेळी पालकांनी सकारात्मक राहून स्वत:वर संयम ठेवून, लवकरात लवकर वैद्यकीय उपचार घ्यायला हवेत. या लहान वयातच लवकरात लवकर निदान (Early Intervention) होणे आणि त्यावर उपचार होणे हे अत्यंत आवश्यक असते. योग्य वेळी जर आपण योग्य निदान करून त्यावर उपचार केले तर निर्माण झालेली समस्या त्यावर आपण योग्य उपचाराने मात करू शकतो.

Causes of Learning Disability in marathi


आज आपण अध्ययन अक्षमता या विषयाची संबंधित अध्ययन क्षमता का निर्माण होते? मुलांमध्ये अध्ययन क्षमता का निर्माण होते? त्या मागची कारणे कोणती आहे? याबद्दलची माहिती पाहणार आहोत. अध्ययन अक्षमता हा एक दिव्यांगत्वाचा प्रकार आहे. भारत सरकारने ‘दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016’ (RPWD ACT 2016)  नुसार अध्ययन अक्षमता हा या 21 प्रकारांमध्ये नमूद आहे. सामान्यतः अध्ययन अक्षमता निर्माण होण्यामागे काही कारणे असतात.

अध्ययन अक्षमता का निर्माण झालेली असते?

कोणतीही समस्या ही तेव्हाच निर्माण होते. जेव्हा त्या समस्येला काहीतरी कारण असते. मात्र हे कारण लक्षात न आल्यामुळे किंवा आपल्याकडून झालेल्या चुकीमुळे ही समस्या निर्माण होत असते. 

अध्ययन अक्षमता निर्माण होण्यामागे साधारणपणे आई-वडिलांचे नात्यामध्ये लग्न झाले असल्याकारणाने त्याचा परिणाम जन्म घेणारे नवे मुल यावर होत असते. याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणारच आहोत. त्यासोबतच आई किंवा वडिलांच्या कुटुंबा मध्ये यापूर्वी कोणाला काही  याबद्दलची समस्या असेल, तर अनुवंशिकता हे कारण अध्ययन अक्षमता निर्माण होण्यामागे असू शकते. 

त्याचबरोबर जेव्हा आईची गर्भधारणा होते तेव्हा जन्माअगोदर, जन्मावेळेस आणि जन्मानंतर या तीन स्तरावर झालेल्या चुकीमुळे बाळाला त्याची इजा पोहोचते आणि त्याचा परिणाम बाळावर होतो. त्यामुळे अध्ययन अक्षमता निर्माण होऊ शकते. आता आपण अनुवंशिकता, जन्माअगोदर चे कारणे जन्मा वेळेस आणि जन्मानंतरची त्याची कारणे याबद्दलची सविस्तर माहिती पाहुया.

अध्ययन अक्षमतेची अनुवांशिक कारणे | Genetics of learning disability Causes

अध्ययन अक्षमतेची ची लक्षणे दिसून येण्यामागे त्या बालकांमध्ये ही समस्या का निर्माण होत असते, तर त्यामध्ये अनुवंशिक हे एक कारण असू शकते. अनुवंशिक कारणांमध्ये कौटुंबिक इतिहासनातेसंबंधात लग्न होणे, आई-वडिलांचा रक्तगट किंवा गुणसूत्रांच्या जोड्या यामध्ये काही समस्या निर्माण झाली असल्यास किंवा अनुवंशिक काही इतिहास असल्यास याचा थेट परिणाम बाळाच्या वाढ व विकासावर होत असतो. 

नातेसंबंधात विवाह (लग्न) | Relationship marriage

अध्ययन अक्षमता हा दिव्यांगत्वाचा एक प्रकार आहे. अध्ययन अक्षमता निर्माण होण्यामागे नात्या मध्ये होणारे लग्न हे एक कारण असू शकते. नातेसंबंधांमध्ये लग्न किंवा विवाह केल्यानंतर समान रक्तगट संबंधित व्यक्तींशी विवाह होतो आणि हा रक्तगट कुठेतरी जुळून आल्यामुळे त्याचा बाळावर परिणाम होत असतो. त्याची लक्षणे त्या बाळामध्ये दिसून येतात.

रंगसुत्रे व गुणसूत्रे 

पुरूष व स्त्रीयांमध्ये ज्या 23 रंगसुत्रांच्या जोडया असतात. यामध्ये पुरूषांमधील 23 पैकी 22 जोडया या क्षक्ष (xx) स्वरूपाच्या असतात. या 22 जोडयांना ‘ॲटोझोमल क्रोमोझोम’ असे म्हणतात. तर 23 वी जोडी ही लिंगनिश्चितीची म्हणजेच ‘सेक्स डिटरमाईन’ असते. ती क्षक्ष (xx) किंवा क्षय (xy) परंतु स्त्रीयांमधील 23 च्या 23 जोडया या क्षक्ष (xx) स्वरूपाच्या  असतात. मुलगा किंवा मुलगी होणे हे पूर्णंत: पुरूष्याच्या 23 व्या जोडीवर अवलंबून असते. 23 रंगसुत्रांच्या जोडयातील 21 व्या जोडीमध्ये एक अतिरिक्त रंगसुत्र आल्यास डाउन सिंड्रोम ही स्थिती उदभवते.

(Genetics of learning disability Causes, includes chromosomal abnormalities, copy number variants, single genes, and mitochondrial and imprinting disorders.)

आई-वडिलांच्या विवाह स्थितीमध्ये काही पूर्व इतिहास किंवा रक्ताच्या संबंधित काही योगा-योगाने समस्या निर्माण झाले असेल तर त्याला घाबरून न जाता, योग्य तज्ञांचा सल्ला घेऊन आपल्या मुलांवर उपचार करणे गरजेचे असते.

अध्ययन अक्षमतेची जन्मापूर्वीची कारणे | Prenatal causes of learning disability

लग्नाचे वय - जेव्हा आई वडिलांचे लग्न होते. तेव्हा लग्न करण्याचे वय हे पुरुषांसाठी 21 वर्ष पूर्ण असावे लागते. आणि स्त्रियांसाठी 18 वर्षे पूर्ण असावे. मात्र जर पुरुषांचे कमी वयामध्ये किंवा मुलींचे कमी वयामध्ये जर लग्न झाले असेल, तर अशावेळी त्याचा परिणाम होणाऱ्या बाळावर होतो.  हे एक कारण अध्ययन अक्षमता निर्माण  होण्यामागे असते.

क्ष-किरण तपासणी | X-Ray

आईची गर्भधारणे झाल्यानंतर डॉक्टर आईच्या गर्भधारणेची वेळोवेळी उपचार करत असतात यामध्ये पालकांना उत्सुकता असते की आपले होणारे निरोगी असावे चांगले असावे यासाठी पालक किंवा शक्तीनुसार डॉक्टर अधिकाधिक क्ष-किरण तपासणी करून घेतात. आवश्यकतेपेक्षा जास्त वेळा जर एक्स-रे काढण्यात आले तर त्याचा परिणाम हा आईच्या गर्भावर होतो आणि निश्चितच मुलाच्या वाढीवर याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आवश्यक ती काळजी घेणे आवश्यक आहे. 

गर्भपात करण्याचा प्रयत्न

आई-वडिलांकडून कधीकधी गर्भपात करण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये आल्यामुळे गर्भपात करण्याचा प्रयत्न करतात. मात्र अशावेळी चुकीच्या औषधोपचार यामुळे किंवा इतर वैद्यकीय सल्ला न घेतल्यामुळे गर्भपात होऊ शकत नाही. या छोट्याशा चुकीमुळे त्याचा परिणाम मुलाच्या वाढ व विकासावर होत असतो .

अमली पदार्थाचे सेवन

जसे की काही स्त्रियांना अमली पदार्थ सेवन करण्याची सवय असते. या सवयीमुळे आईच्या पोटामध्ये वाढणारा गर्भ यावर त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळे निदान गर्भवती स्रियांनी अमली पदार्थाचे सेवन हे अवश्य टाळायला हवे.

गर्भवती स्त्रीचा पोषक आहार 

गर्भवती स्त्रियांनी या काळामध्ये संतुलित असा पौष्टिक आहार घ्यायला हवा. मात्र या धकाधकीच्या जीवनामध्ये विशेषतः ग्रामीण भागातील स्त्रियांना विशेष असे लक्ष या काळामध्ये ठेवता येत नाही. आहाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याचा परिणाम हा बाळावर होतो.

इतर कारणे

याशिवाय जन्मपूर्व अवस्थेमध्ये गर्भवती महिलांनी या काळात जर कधी त्यांना विषबाधा झाली किंवा घरातील ताण-तणावामुळे होणारा मानसिक आघात, आईला असणारा आजार त्यामध्ये मधुमेह इतर संसर्गजन्य आजार याची काळजी त्या त्या वेळी घेणे आवश्यक असते. योग्य वेळी योग्य काळजी घेतली नाही तर त्याचा आईच्या गर्भावर परिणाम होतो. आणि मग सहाजिकच मुलाच्या वाढ व विकासावर त्याचा परिणाम होत असतो. 

त्याचबरोबर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधाचे कधीकधी सेवन केले जाते. अनियमित रक्तदाब, गर्भवती महिलांना रूबेला ची लागण होणे, अपस्मार, हायपोझिया इ. अध्ययन अक्षमतेची जन्मापूर्वीची कारणे (Prenatal causes of learning disability) असू शकतात. 

निरोगी बाळ जन्माला येणे यासाठी हा काळ खूप महत्त्वाचा मानला जातो. या काळामध्ये आईने स्वतःची व्यवस्थित काळजी घेऊन आपल्या बाळाला जन्म देणे आवश्यक असते. वेळोवेळी वैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेऊन बाळाची काळजी घ्यायला हवी.

अध्ययन अक्षमतेची जन्मावेळेसचे कारणे | Causes of learning disability delivery time

साधारणपणे सदृढ बाळाला जन्म देण्यासाठी ची योग्य वेळ ही 9 महिने 9 दिवस पूर्ण झाल्यानंतर बाळ जन्माला येते.  मात्र बऱ्याचदा पूर्ण कालावधी न होता करावी लागणारी प्रसूती. त्यामुळे कमी दिवसाचे बाळ जन्माला येणे प्रसूती कधी व कोठे होते? कोणामार्फत होते याचा देखील परिणाम बाळावर होतो.  

प्रसुतीचे ठिकाण 

आईचे दिवस भरत आल्यानंतर म्हणजे नऊ महिने जवळ पूर्ण होत असल्यास, विशेषत: ग्रामीण भागामध्ये दुर्गम भागांमध्ये आईला हॉस्पिटल पर्यंत दवाखान्यापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लावू शकतो. जर आईला कळा येणे लवकर सुरू झाले आणि अशावेळी जर लवकरात लवकर डॉक्टर उपलब्ध होऊ शकले नाही तर, गावातीलच शेजारी अनुभवी महिला त्या आईची प्रसूती करत असते. अशावेळी जर काही त्या महिलांकडून चूक झाली बाळ दबले गेले किंवा त्याला ऑक्सिजन व्यवस्थित न मिळाल्यास किंवा इतर काही कारण असल्यास त्याचा परिणाम हा बाळावर होऊ शकतो. त्यामुळे आईची प्रकृती ही दवाखान्यातच व्हायला हवी तशी पूर्वतयारी प्रत्येक आई-वडिलांनी करून ठेवायला पाहिजे.

कमी दिवसाचे बाळ

गर्भाची वाढ पूर्ण दिवस होण्याआधी जर इमर्जन्सी मध्ये आईची प्रसूती करण्याची वेळ आली तर, त्या वेळी कमी दिवसाचे बाळ हे जन्माला येते. तरी देखील बाळाचे व्यवस्थित सर्व वैद्यकीय उपचार केले तर एक सदृढ बाळ त्याचा विकास आणि वाढ होऊ शकतो.

प्रसुती वेळेसची कारणे

 • प्रसुती कालावधी
 • श्वसनात अडचण
 • ऑक्सिजनचा पुरवठा
 • मेंदूला इजा झाल्यास
 • नाळ आधी बाहेर येणे
 • स्त्रीला झटके येणे (अपस्मार)
 • रक्तस्त्राव
 • अनियमीत रक्तदाब
 • अवजार व हत्याऱ्याच्या सहाय्याने होणारी प्रसुती

आईची प्रसूती ही करतेवेळी जर जास्त वेळ लागला किंवा बाळाला किंवा आईला ऑक्सिजन घेण्यामध्ये काही अडचण निर्माण झाली. ऑक्सिजनचा पुरवठा वेळेत मिळाला नाही किंवा ऑक्‍सिजन कमी प्रमाणात मिळाले, तर त्याचा देखील परिणाम बाळावर होऊ शकतो. प्रसूती करतेवेळी जर बाळाच्या मेंदूला इजा झाली किंवा नाळ आधी बाहेर येणे किंवा प्रसिद्धीसाठी जास्त वेळ लागणे, आईला झटके येणे किंवा अति प्रमाणात रक्तस्राव होणे, आईचा अनियमित रक्तदाब, प्रसुती करतेवेळी इतर साहित्याचे साह्याने प्रसूती करणे इ. इत्यादी कारणे जन्मावेळेसची असू शकतात.

जन्मावेळेसचे इतर काही कारणे खालीलप्रमाणे 

 • कमी वजनाचे बाळ
 • एकापेक्षा जास्त बाळ जन्मल्यास
 • अपसामान्य सादरीकरण
 • श्वासावरोध  (Asphyxia)
 • काविळ
 • संसर्गजन्य रोगाची लागण / आजार (Herpes Infection)


अध्ययन अक्षमतेची जन्मानंतरचे कारणे | Postnatal causes of learning disability

दुग्धपान / स्तनपान

बाळाचा जन्म झाल्यानंतर लगेच बाळाला आईचे दूध दिले जाते मात्र काही आईंच्या बाबतीत दूध लवकर येत नसल्यामुळे बाळाला व्यवस्थित दुग्धपान करता येत नाही.

 • काविळ
 • आघात / जखम
 • संसर्ग

आई किंवा बाळाला कावीळ झाल्यास किंवा प्रसूती करतेवेळी होणारा संसर्ग, जखम यामुळे देखील त्याचा परिणाम बाळावर होतो.

 • झटके येणे
 • श्वसनात अडचण
 • मेंदूला सूज आल्यास
 • टि. बी झाल्यास
 • विषबाधा झाल्यास
 • योग्य आहार
 • लसीकरण

आईने बाळाला जन्म दिल्यानंतर काही दिवस बाळाची विशेष काळजी घ्यायला हवी. त्या सोबत आईने देखील सकस आहार घेऊन बाळाचे योग्य ते लसीकरण वेळोवेळी करून घ्यावे, त्यामुळे नक्कीच सदृढ बाळाचा वाढ व विकास नैसर्गिक पद्धतीने होऊ शकेल.

सारांश

अध्ययन क्षमता निर्माण होण्याची कारणे कोणती आहेत त्यामध्ये आपण जन्मापूर्वीची कारणे, जन्मावेळी ची कारणे आणि जन्मानंतर ची कारणे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या आर्टिकल मध्ये घेतली आहे. तेव्हा एका सदृढ बाळाला जन्म देण्यासाठी आई-बाबांनी बाळाचे नियोजन करतानाच तेव्हापासून योग्य ती काळजी आपण घ्यायला हवी. आईचे आरोग्य सुदृढ असेल तर बाळाचे आरोग्य देखील निश्चितच सदृढ राहील याकडे विशेष असे लक्ष द्यायला हवे त्यामुळे आईने या काळामध्ये व्यवस्थित स्वतःची काळजी घेत संतुलित आहार घेऊन डॉक्टरांच्या वैद्यकीय सल्ल्याने मार्गदर्शनाखाली स्वतःची काळजी घ्यावी. पुढील लेखामध्ये अध्ययन अक्षमतेची लक्षणे  या विषयावर समावेशित शिक्षण या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

हे सुद्धा वाचा 

नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

Previous Post Next Post