आजपासून बारावीची परीक्षा - नांदेडचा कॉपीमुक्त पॅटर्न

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावी बोर्डाच्या लेखी परीक्षेला २१ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. यंदा परीक्षेत नांदेडचा कॉपीमुक्त पॅटर्न राबवण्यात येत आहे. कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी भरारी पथकांसह केंद्रावर बैठी पथके आणि अन्य विविध विभागांच्या पथकांची विभागीय मंडळाच्या वतीने निवड करण्यात आली आहे. यासाठी महिलांचे एक स्वतंत्र पथकही राहणार आहे. बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी तणावमुक्त आणि कॉपीमुक्त परीक्षा द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

आजपासून बारावीची परीक्षा यंदा 14.57 लाख विद्यार्थी

Hsc exam maharashtra

कोरोनानंतर होणारी राज्य बोर्डाची इयत्ता बारावीची परीक्षा आजपासून (२१ फेब्रुवारी) सुरू होत आहे. यंदा परीक्षेसाठी राज्यभरातून तब्बल १४ लाख ५७, २९३ विद्यार्थी बसले आहे.

यंदा प्रश्नपत्रिका केंद्रात देताना त्याचे चित्रीकरण होणार

प्रश्नपत्रिका ११ वाजता (वा पेपरच्या निर्धारित वेळेलाच) दिली जाईल. पेपरची निर्धारित वेळ संपल्यावर १० मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात येणार आहे. गैरप्रकारांना आळा बसावा म्हणून राज्यात २७१ भरारी पथके नेमली आहेत.
प्रत्येक
जिल्ह्यात दक्षता समिती, प्रश्नपत्रिका पोचवणाऱ्या वाहनांचे जीपीएस ट्रॅकिंग होईल. प्रश्नपत्रिका केंद्रात देताना चित्रीकरण. प्रत्येक केंद्रावर ५० मीटर परिसरात विद्यार्थी सोडून कुणालाही प्रवेश नाही. परिसरातील झेरॉक्स दुकाने बंद ठेवणार.

निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे बाकी असताना वाजेल एक टोल

कोरोनामुळे दोन वर्षे परीक्षेतील नियमांत शिथिलता दिली होती. मात्र, आता सर्व परिस्थिती सुरळीत असल्याने सर्व नियमांचे कडक पालन केले जाणार असून दिलेल्या सर्व सवलती रद्द केल्या आहेत. परीक्षेत दहा मिनिटे आधी जी वेळ दिली होती, ती रद्द करत निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वाढवून दिली आहेत. 
या बदलांमुळे आता मंडळाच्या वतीने पेपरदरम्यान केलेल्या वेळेच्या नियोजनासाठी द्यावयाच्या घंटेच्या वेळेतही आता सुधारणा केली आहे. त्यासंदर्भातील सूचनापत्र मंडळाच्या वतीने जाहीर केले आहे. ते खालीलप्रमाणे 

असे असेल घंटेचे सुधारित नियोजन

  • 10:30 - केंद्रावर हजर - वॉर्निंग गजर 
  • 10:50 - उत्तरपत्रिका वाटप- दोन टोल
  • 11:00 - प्रश्नपत्रिका वाटप लेखन सुरू दोन टोल
  • 12:00 - एक तास पूर्ण - दोन टोल
  • 1:00 - दोन तास पूर्ण - दोन टोल
  • 2:00 - तीन तास पूर्ण वाढीव दहा मिनिटे बाकी - एक टोल
  • 2:10 - लेखन समाप्त - गजर.


नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

                                                             

Previous Post Next Post