शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित | School Admission Age Criteria 2023

 School Admission Age Limit 2023 : भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून शाळेतील प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्यासंदर्भात नियमावली तयार करण्यात आली आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार (New Education Policy) शिक्षण पद्धतीमध्ये मोठा बदल करण्यात आला असून, केंद्र सरकारने शाळेतील (School Admission Age Criteria) प्रवेश प्रक्रियेसाठी बालकाचे वय निश्चित केलं आहे. देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासाठी हा नियम लागू आहे. आता इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेण्यासाठी बालकांचे वय सहा वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे. म्हणजेच जर एखाद्या बालकाचे वय सहा वर्ष पूर्ण नसेल तर त्या विद्यार्थ्याला इयत्ता पहिली मध्ये प्रवेश मिळणार नाही हा सर्वात मोठा बदल केंद्र सरकारकडून करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांमध्ये मुलांच्या आयुष्यातील सुरुवातीची पाच वर्षे हे शिकण्यासाठी चा मूलभूत टप्पा आहे. त्यामुळे आता इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेण्यासाठी मालकाचे वय सहा वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित | School Admission Age Criteria

School Admission Age Criteria 2023
School Admission Age Criteria 2023

शाळा प्रवेश वय 2023 : इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेण्यासाठी बालकांचे वय सहा वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे. म्हणजेच जर एखाद्या बालकाचे वय सहा वर्ष पूर्ण नसेल तर त्या विद्यार्थ्याला इयत्ता पहिली मध्ये प्रवेश मिळणार नाही हा सर्वात मोठा बदल केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून करण्यात आला आहे.

शाळा प्रवेशासाठी कसे आहेत नवे नियम

केंद्र सरकारने २३ फेब्रुवारीला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शाळेत प्रवेश प्रक्रियेसाठी बालकांचे वय निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • गुजरात, तेलंगणा, लडाख, आसाम आणि पुद्दुचेरी ही अशी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आहेत जिथे पाच वर्षांच्या मुलांनाही पहिल्या वर्गामध्ये प्रवेश दिला जात होता.
  • राजस्थान, दिल्ली, आंध्र प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, कर्नाटक, गोवा, झारखंड आणि केरळ या राज्यांमध्ये पहिली इयत्तेमध्ये प्रवेश घेण्यासाठी मुलांचे किमान वय 5 वर्षांपेक्षा जास्त असणं आवश्यक होते. 
  • याच पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्रालयाने लोकसभेत एक अहवाल सादर केला होता. त्यानुसार, विविध राज्यांतील प्रवेश प्रक्रिया ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार नसल्यामुळे वेगवेगळ्या राज्यांमधील प्रवेशाचे नियम वेगवेगळे असल्याचं समोर आले होते. 
  • त्यानुसार आता इयत्ता पहिलीमध्ये बालकाचा प्रवेश घेण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील बालकाचे किमान वय 6 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजेच 6 वर्ष पूर्ण नसल्यास विद्यार्थ्याला प्रवेश मिळणार नाही. 

RTE प्रवेशासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा 2023 (RTE Admission age Limit)

पहिलीसाठी सहा वर्ष पूर्ण का हवेत?

मुलं जसजशी मोठे होऊ लागतात, तेव्हा पालकांना  वाटत असते की, आपले मूल लवकरात लवकर शाळेमध्ये जावे, मुलांना लवकर शाळेत प्रवेश घेतला म्हणजे ते लवकर शिकतील. पण वास्तविक पाहता मुलांना शिकण्यासाठी आवश्यक शारीरिक आणि मानसिक वाढ त्यांची पूर्ण होणे आवश्यक आहे. तेव्हाच प्राथमिक शाळेत मुलांना टाकायला हवे असे तज्ञांचे मत आहे.

इयत्ता पहिली मध्ये गेल्यावर मुले लिहायला वाचायला शिकण्याची सुरुवात करतात त्यासाठी सर्वात आधी मुलांच्या हाताचे स्नायू बळकट होणे गरजेचे आहे. पहिलीत जाताना मुलांना हाताच्या बोटामध्ये किमान पेन्सिल नीट धरण्याची क्षमता विकसित होणे गरजेचे असते. 

आय हॅन्ड कॉर्डिनेशन - Eye Hand Coordination

मेंदू आधारित शिक्षणावर संशोधक करणाऱ्या डॉक्टर श्रुती पानसे देखील सांगतात की, आय हॅन्ड कॉर्डिनेशनने (Eye Hand Coordination) हे सर्वात महत्त्वाचं असतं. सहा वर्षाच्या आधी मुलांना कागदावर रेघोट्या मारता येतात, चित्र काढता येऊ शकतात, रंग भरता येतात पण पेन्सिल बोटात  धरून अक्षर काढण्यासाठी, एखाद अक्षर पाहून छोट्या बॉक्समध्ये नीट ओळीवर लिहिण्यासाठी आवश्यक नियंत्रण त्यांच्यामध्ये आलेले नसतं. त्यासाठी त्यांचे कारक कौशल्य (Motor Skills)  पूर्णतः विकसित होणे महत्वाचे असते. 

त्यासाठी वाचन पूर्व , लेखन पूर्व तयारी, पूर्व प्राथमिक स्तरावर होत असते. यासाठी नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता पहीली प्रवेशासाठी मुलांचं किमान वय सहा वर्ष पूर्ण असणे आवश्यक करण्यात आले आहे.

आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी किमान वय किती लागेल?  | RTE Admission Age Limit 2023-24 

RTE Admission 2023-24 : आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया दरवर्षी राज्यामध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांसाठी राबवली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनामार्फत ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येते.

पुढील शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून, नवीन वर्षातील इयत्ता 1 ली साठी बालकांचे वय सहा वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. तरच पालकांना RTE 25 टक्के Admission साठी ऑनलाईन अर्ज करता येईल.


प्रत्येक अपडेट साठी समावेशित शिक्षण  Whatsapp Group ला जॉईन व्हा.

                                                             

Previous Post Next Post