मोठी बातमी ! गॅस सिलेंडरवर मिळणार 1 एप्रिल पासून सबसिडी - LPG Gas Subsidy 2023

Ujjwala Yojana LPG Gas Subsidy 2023 : केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे, पंतप्रधान उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता घरगुती गॅस सिलेंडरवर Subsidy देण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्राच्या मंत्रिमंडळ समितीने घेतला आहे. यामध्ये Ujjwala Yojana LPG Gas धारक लाभार्थी यांना वर्षभरासाठी प्रत्येक Gas किमतीवर 200 रु. अनुदान सरकार तर्फे देण्यात येणार आहे, म्हणजेच प्रत्येक Gas Cylinder वर ही  Subsidy लागू असणार आहे. त्यामुळे हा निर्णय (PMUY) Scheme च्या लाभार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. 

गॅस सिलेंडरवर मिळणार 1 एप्रिल पासून सबसिडी

LPG Gas Subsidy 2023
LPG Gas Subsidy 2023

देशातील ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांन (LPG Gas), स्वच्छ स्वयंपाक इंधन उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने मे 2016 मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली. गरीब घरातील प्रौढ महिलांना डिपॉझिट न ठेवता मोफत एलपीजी जोडणी या योजनेअंतर्गत दिली जाते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या Cabinet Economic Committee मध्ये मंत्रिमंडळ समितीने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (PMUY) लाभार्थ्यांना एका वर्षात 14.2 किलोच्या सिलिंडरसाठी 12 Gas Cylinder वर 200 रु अनुदान (Subsidy) देण्यास मान्यता दिली आहे.

या निर्णयामुळे आता Gas Cylinder वर दोनशे रुपये सबसीडी मिळणार असल्याने लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. 1 एप्रिल 2023 पासून हे अनुदान सबसिडी लाभार्थ्यांना मिळणार आहे.

Ujjwala Yojana Subsidy 2400 रुपयांपर्यंत अनुदान 

Ujjwala Yojana अंतर्गत केंद्र सरकारकडून प्रत्येक सिलिंडरवर 200 रुपयांचे अनुदान मिळेल, म्हणजेच केंद्र सरकारकडून एका वर्षात सबसिडीच्या स्वरूपात लाभार्थ्यांना 2400 रुपयांपर्यंत अनुदान मिळेल. केंद्र सरकारच्या माहितीनुसार, 1 मार्च 2023 पर्यंत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे (PMUY - Pradhan Mantri Ujjwala Yojana) चे 9 कोटी 59 लाख लाभार्थी आहेत. 

या कंपन्याकडून उज्वला योजनेचे अनुदान

उज्वला योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात Subsidy अनुदानाची रक्कम थेट जमा होणार आहे. Indian Oil Corporation Limited (IOCL), Bharat Petroleum Corporation Limited (BPCL) and Hindustan Petroleum Corporation Limited (HPCL) या सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या 22 मे 2022 पासून हे अनुदान देत आहेत.

LPG Gas चा वापर 20 टक्क्यांनी वाढला

विविध कारणांमुळे एलपीजी (घरगुती वापरासाठीचा गॅस) च्या आंतरराष्ट्रीय किमतीत मोठी वाढ झाली आहे. एलपीजीच्या वाढलेल्या किमती पासून लाभार्थ्यांना सूट मिळावी यासाठी हा निर्णय घेतला असून गरीब कुटुंबाना याचा लाभ मिळणार आहे.

ग्राहकांना एलपीजीच्या दरात दिलासा दिला तर ते एलपीजीच्या सतत वापरासाठी प्रोत्साहित होतात. उज्ज्वला योजनेतल्या ग्राहकांनी पूर्णपणे स्वच्छ स्वयंपाक इंधनाकडे वळावे यासाठी त्यांनी सतत एलपीजीचा वापर करणे महत्त्वाचे आहे, योजनेतील ग्राहकांचा एलपीजीचा सरासरी वापर 2019-20 मधील 3.01 रिफिलवरून 20 टक्क्यांनी वाढून 2021-22 मध्ये 3.68 झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्या


प्रत्येक अपडेट साठी समावेशित शिक्षण  Whatsapp Group ला जॉईन व्हा.

                                                             

Previous Post Next Post