Mahajyoti Yojana 2023 : सुवर्णसंधी ! राज्यातील तरुणांना 'मोफत' सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण मिळणार, दरमहा 10 हजार रुपये विद्यावेतन, ऑनलाईन अर्ज सुरु..

Mahajyoti Yojana 2023 : राज्यातील तरुणांसाठी आनंदाची बातमी, सैन्यामध्ये भरती होऊ इच्छिणाऱ्या आणि तयारी करणाऱ्या उमेदवारांना आता महाज्योती मार्फत मोफत सैनिकी (मिलिटरी) पूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे, त्यासोबतच दरमहा 10 हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे, या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक यांनी 28 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे उमेदवारांना आवाहन करण्यात आले आहे.

1 हजार 500 तरुणांना 'मोफत' सैनिकी पूर्व प्रशिक्षण मिळणार 

Mahajyoti Yojana 2023

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण (महाज्योती) संस्था इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागाच्या मार्फत राज्यातील 1 हजार 500 तरुणांना मोफत सैनिकी पूर्व (मिलिटरी) परीक्षा पूर्व प्रशिक्षण देण्याबाबत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. (Mahajyoti Yojana Military Free Training)

यासाठी राज्य करत MahaJyoti च्या वतीने 1500 जागा निश्चित करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातील उमेदवारांनी महाज्योतीच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. 

त्यानंतर प्राप्त अर्ज नुसार उमेदवारांची अंतिम निवड करण्यासाठी चाळणी परीक्षा घेऊन 1 हजार 500 तरुणांची निवड करण्यात येणार आहे.

मोफत प्रशिक्षणासह दरमहा 10 हजार रुपये विद्यावेतन

सैनिकी भरती पूर्व प्रशिक्षणास निवड झालेल्या उमेदवारांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच या प्रशिक्षण कालावधीमध्ये दरमहा 10 हजार रुपये विद्यावेतन देखील मिळणार आहे.

महाज्योतीच्या या मिलिटरी पूर्व प्रशिक्षणाच्या नियमानुसार प्रत्यक्ष प्रशिक्षणार्थीची 75 टक्के उपस्थित असणे आवश्यक आहे. त्याच प्रशिक्षणार्थींना हे विद्यावेतन देय असणार आहे.

त्याचबरोबर या कालावधीमध्ये आकस्मित निधी एक वेळ बारा हजार रुपये ची तरतूद देखील करण्यात आलेली आहे.

महाज्योती सैनिकी पूर्व प्रशिक्षण ठळक मुद्दे

या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना मिलिटरी भरतीसाठी परीक्षा पूर्व प्रशिक्षण तसेच लेखी व शारीरिक परीक्षांचे सुधारित अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण मिळणार आहे. (Mahajyoti Yojana Military Free Training)

 • हे प्रशिक्षण पूर्णतः मोफत असणार आहे.
 • या प्रशिक्षणाचा कालावधी हा 6 महिन्यांचा असणार आहे. 
 • सदरचे प्रशिक्षण हे अनिवासी स्वरुपाचे आहे.
 • प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरुपाचे देण्यात येईल.
 • प्रशिक्षण काळात विद्यार्थ्यांना दरमहा 10 हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे.

आवश्यक पात्रता

 • विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
 • विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-‍ भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असणे आवश्यक आहे. 
 • विद्यार्थी 12 वी वर्गात प्रवेश घेतलेला असावा किंवा 12 वी वर्ग उत्तीर्ण केलेला असावा.
 • तसेच वैद्यकीय दृष्ट्या सैनिकी भरती साठी आवश्यक पात्रता असणे आवश्यक आहे.

सैनिकी पूर्व प्रशिक्षणासाठी निवड कशी होणार?

 • महा ज्योती या संस्थेमार्फत सैनिकी पूर्व प्रशिक्षणासाठी ची निवड प्रक्रिया पुढीलप्रमाणे असणार आहे.
 • सर्वप्रथम इच्छुक विद्यार्थ्यांनी महाज्योतीच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा.
 • मिल्ट्री भरतीपूर्व परीक्षेच्या धर्तीवर व अभ्यासक्रमानुसार पात्र विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा घेण्यात येईल.
 • त्यानंतर विद्यार्थ्यांची अंतिम निवड यादी व प्रतीक्षा निवड यादी महा ज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

ऑनलाईन अर्ज 

महाज्योती सैनिकीपूर्व प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज हे www.mahajyoti.org.in या अधिकृत वेबसाईटवर 28 मे 2023 पर्यंत करण्याचे उमेदवारांना आवाहन करण्यात आले आहे.

ऑनलाईन अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास तुम्ही महाज्योतीच्या (Call Centre) संर्पक क्र 0712-2870120/21 या क्रमांकावर संपर्क करू शकता. किंवा E-mail Id: mahajyotimpsc21@gmail.com वर प्रतिक्रिया पाठवू शकता.

35 हजार रुपयाची शिष्यवृत्ती 'येथे' करा ऑनलाईन अर्ज

नवनविन अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

 

Previous Post Next Post