Ramai Awas Gharkul Yojana : घरकुलाचे स्वप्न होणार साकार, रमाई आवास योजनेअंतर्गत 2.5 लाखापर्यंत मदत, ऑनलाईन अर्ज...

Ramai Awas Gharkul Yojana 2023 : सर्वसामान्यांना हक्काचे घर देणारी रमाई आवास योजना ही एक महत्वपूर्ण सरकारी योजना आहे, सामाजिक न्याय विभागामार्फत राज्यामध्ये रमाई आवास योजना ग्रामीण व शहरी भागामध्ये राबविली जाते, सविस्तर माहिती पाहूया..

रमाई आवास योजनेअंतर्गत अडीच लाखापर्यंत मदत

Ramai Awas Gharkul Yojana 2023

या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ग्रामीण भागात सर्वसाधारण क्षेत्रात 1 लाख 20 हजार रुपये तर नक्षलग्रसत व डोंगराळ क्षेत्रात 1 लाख 30 हजार रुपये अनुदान दिले जाते. तर शहरी भागात  2 लाख 50 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.

शंभर टक्के राज्य पुरस्कृत असलेल्या या योजनेत मनरेगा अंतर्गत 90 ते 95 दिवस अकुशल मनुष्य दिवसांची मजूरी व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) शौचालय बांधण्यासाठी 12 हजार रुपये अनुदान दिले जाते. या अनुदानाचे वितरण लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केले जाते.

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील कुटूंबाचे राहणीमान उंचावून त्यांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत रमाई आवास योजना शहरी व ग्रामीण भागामध्ये राबविली जाते. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना 269 चौरस फुटाचे घर बांधून दिले जाते.

रमाई आवास योजनेसाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे. 

  • अनु. जाती व नवबौध्द घटकाचा असावा.  
  • महाराष्ट्र राज्यात वास्तव्य किमान 15 वर्षे असावे.  
  • अर्जदाराच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण - रू.1.00 लाख 
  • महानगरपालिका आणि नगरपालिका - रू.3.00 लाख 
  • लाभार्थ्याची स्वत:च्या नावे किमान 269 स्वेअर फुट जागा अथवा त्यावर कच्चे घर असावे.  
  • सदर योजनेचा लाभ कुटुंबातील एकाच व्यक्तीला देणेत येईल. शासनाच्या इतर गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

या योजनेचे लाभार्थी निवड करण्यासाठी नगरपालिका क्षेत्रासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती असते. तर ग्रामीण भागासाठी पालकमंत्री हे या समितीचे अध्यक्ष असतात.

ऑनलाईन अर्ज - अधिकृत वेबसाईट
ऑफलाईन अर्ज - PDF येथे डाउनलोड करा
रमाई आवास योजना शासन निर्णय - PDF येथे डाउनलोड करा

महत्वाच्या योजना

Previous Post Next Post