RTE Admission 2023 : 'आरटीई' प्रवेश निश्चितीसाठी उद्या शेवटचा दिवस, तुमच्या मुलाचा प्रवेश निश्चित झाला आहे का? येथे तपासा

RTE Admission Last Date 2023 : 'आरटीई' प्रवेश प्रक्रिया 2023 24 करिता लॉटरीमध्ये निवड झालेल्या मुलांच्या प्रवेश निश्चितीसाठी उद्या (दि. 22 मे) शेवटचा दिवस आहे, त्यानंतर प्रतीक्षा यादीतील मुलांना प्रवेशासाठी संधी मिळणार आहे, तुमच्या मुलाचा प्रवेश निश्चित झाला आहे का? नाही हे तुम्ही एक मिनिटात तपासून पाहू शकता. सविस्तर 'आरटीई'  प्रवेशाची सद्यस्थिती जाणून घेऊया..

'आरटीई' प्रवेश प्रक्रिया 2023 आतापर्यंतची सद्यस्थिती

RTE Admission Last Date 2023
RTE Admission Last Date 2023 

राज्यातील आरटीई 25% प्रवेश प्रक्रिये अंतर्गत आर्थिक व वंचित घटकातील मुलांना नामांकित खाजगी शाळेमध्ये मोफत प्रवेश देण्याची योजना आहे. सन 2023 24 च्या प्रवेशा करिता यावर्षी शासनाने आरटीई प्रवेशाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी जानेवारी 2023 पासूनच सुरुवात केलेली आहे.

RTE प्रवेशासाठी पहिला टप्प्यामध्ये शाळांच्या नोंदणी करण्यासाठी जानेवारी/फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्यातील शाळांची नोंदणी करून घेण्यात आली. त्यामध्ये राज्यातील 8 हजार 823 शाळांची नोंदणी केली आहे.

त्यानंतर RTE प्रवेशासाठी राज्यातील मुलांचे ऑनलाईन अर्ज भरून  घेण्यात आले होते. शिक्षण हक्क कायद्यानुसार राज्यातील RTE कोट्यातील च्या प्रवेशासाठी 1 लाख 1 हजार 846 जागा निश्चित करण्यात आल्या.

'आरटीई' ऑनलाईन सोडत जाहीर

बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्वये प्राप्त अर्जानुसार 'आरटीई' प्रवेशाकरिता 5 एप्रिल 2023 रोजी ऑनलाईन लॉटरी जाहीर करण्यात आली, त्यामध्ये राज्यातील 94 हजार 700 मुलांची निवड करण्यात आली. आणि 81 हजार 129 मुलांचे नाव प्रतीक्षा यादीत आहे.

'आरटीई' प्रवेश निश्चितीसाठी उद्या शेवटचा दिवस

RTE लॉटरी मध्ये निवड झालेल्या मुलांच्या पालकांना मोबाईल क्रमांकावर दिनांक 12 एप्रिल पासून मेसेज पाठवण्यात आले आहेत, त्यानुसार 13 एप्रिल पासून निवड झालेल्या मुलांच्या प्रवेश निश्चितीसाठी कागदपत्रे पडताळणी सुरु करण्यात आली असून, दोन वेळा RTE च्या प्रवेशाची मुदत वाढवण्यात आली, आता 22 मे 2023 ही प्रवेशाची अंतिम मुदत असून त्यांनतर 'आरटीई' प्रवेशाची दुसरी फेरी म्हणजेच प्रतीक्षा यादीतील मुलांना प्रवेशासाठी संधी मिळणार आहे. (रिक्त जागेनुसार वेटिंग लिस्ट मधील मुलांना संधी मिळेल)

राज्यातील 62 हजार 420 बालकांचे प्रवेश निश्चित

आतापर्यंत राज्यातील 8 हजार 823 शाळांमध्ये 94 हजार 700 बालकांची निवड करण्यात आलेली असून, त्यापैकी 62 हजार 420 बालकांचे प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत. जिल्हानिहाय आकडेवारी सविस्तर पहा..

तुमच्या मुलाचा प्रवेश निश्चित झाला आहे का? येथे तपासा

RTE लॉटरी मध्ये निवड मुलांचा प्रवेश निश्चित झाला आहे का? हे तपासण्यासाठी तुम्ही कागदपत्रे पडताळणी समिती कडून प्रवेश निश्चित झाल्याची पावती घेतली असेल, त्यानुसार शाळेत प्रवेश घेतला असेल, किंवा प्रत्यक्ष RTE पोर्टल वर तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्ही 'आरटीई' पोर्टल वरील अर्जाची स्थिती या पर्यायावर क्लिक करून पाहू शकता. प्रवेश निश्चित झाल्याची खात्री येथे करा..

आरटीई प्रवेशाची जिल्हानिहाय आकडेवारी येथे पहा

नवनविन अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

 

Previous Post Next Post