Post Office Gds Recruitment 2023 : 10 वीच्या गुणांवर थेट निवड होणार, पोस्ट ऑफिस मेगा भरतीचे नोटिफिकेशन जारी, जाहिरात..

Post Office Gds Recruitment 2023 : पोस्ट ऑफिस (टपाल) विभागांमध्ये इयत्ता 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी बंपर भरतीची जाहिरात निघाली आहे. याबाबतचे नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे, पोस्ट ऑफिस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना दिनांक 22 मे 2023 पासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे, यामध्ये शाखा पोस्टमास्टर Branch Postmaster (BPM) आणि सहाय्यक शाखा पोस्टमास्टर Assistant Branch Postmaster (ABPM) या पदांसाठी भरती केली जाणार असून, दहावीच्या गुणांवर थेट मेरीटनुसार निवड करण्यात येणार आहे, सविस्तर पाहूया..

पोस्ट ऑफिस मेगा भरतीचे नोटिफिकेशन जारी

Post Office Gds Recruitment 2023

जानेवारी 2023 मध्ये ग्रामीण ग्रामीण डाक सेवक या पदाची मोठी भरती केल्यानंतर आता इंडियन पोस्ट ऑफिस मार्फत शाखा पोस्टमास्टर Branch Postmaster (BPM) आणि सहाय्यक शाखा पोस्टमास्टर Assistant Branch Postmaster (ABPM) या पदांसाठी भरती होणार आहे. (Post Office Gds Recruitment 2023)

याबाबतचे अधिकृत नोटिफिकेशन इंडियन पोस्ट www.indiapost.gov.in या अधिकृत वेबसाईटवर 20 मे 2023 रोजी जारी करण्यात आले आहे. त्यानुसार आता इयत्ता 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना 22 मे 2023 पासून या https://www.indiapostgdsonline.gov.in/ वेबसाईटवर अधिकृतपणे ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

10 वीच्या गुणांवर थेट निवड होणार

'Gramin Dak Sevak (GDS) Online Engagement-Special Gycle, May,2023 नोटिफिकेशन  नुसार शाखा पोस्टमास्टर Branch Postmaster (BPM) आणि सहाय्यक शाखा पोस्टमास्टर Assistant Branch Postmaster (ABPM) या पदांसाठी किमान शैक्षणिक पात्रता ही इयत्ता 10 वी (गणित व इंग्रजी विषयांसह) उतीर्ण असणे आवश्यक आहे.

तसेच स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असून, संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे. निवड प्रक्रिया ही इयत्ता दहावी च्या गुणांच्या आधारे करण्यात येणार असून, कागदपत्रे पडताळणी नंतर अंतिम निवड करण्यात येणार आहे. (दहावीचा निकाल तारीख येथे पहा)
Post Office bharti Qualifications

ऑनलाईन अर्ज

या पदांसाठी ऑनलाईन अर्ज हे https://www.indiapostgdsonline.gov.in/  या वेबसाईटवर दिनांक 22 मे 2023 पासून करता येणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2023 आहे.

Post Office bharti online Application last date


पोस्ट ऑफिस मेगा भरती (नोटिफिकेशन) जाहिरात येथे पहा

Previous Post Next Post