CMEGP Scheme : राज्यातील तरुण-तरुणींना नवीन उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी, उद्योग, व्यवसाय सुरु करण्यासाठी 10 ते 50 लाखापर्यंत 'या' योजनेतून मदत, ऑनलाईन अर्ज सुरु...

CMEGP Scheme Maharashtra : राज्यातील तरुणांसाठी एक महत्वाची बातमी, ज्यांना उद्योग, व्यवसाय सुरू करायचा आहे, पण भांडवल नाही त्यांना आता 10 लाख ते 50 लाखापर्यंत शासनातर्फे मदत मिळणार आहे, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत राज्यातील 18 ते 45 वर्ष वयोगटातील तरुण - तरुणी ऑनलाईन अर्ज करू शकतात, या योजनेच्या अटी व शर्ती आवश्यक पात्रता सविस्तर माहिती पाहूया..

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम

CMEGP Scheme Maharashtra

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP - Chief Minister Employment Generation Programme) अंतर्गत राज्य शासनाच्या भक्कम सहकार्याने तरुण-तरुणींना नवीन उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे.

उद्योग, व्यवसाय सुरु करण्यासाठी 10 ते 50 लाखापर्यंत 'या' योजनेतून मदत - योजनेचे निकष

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेंतर्गत लाभ मिळण्याकरीता 18 ते 45 वर्ष वयोगटातील कोणतीही व्यक्ती अर्ज करु शकते. (अजा/अज/महिला/माजी सैनिक यांना 50 वर्ष). 

जर प्रकल्प हा 10 ते 25 लाखासाठी असेल तर इयत्ता सातवी पास आणि जर प्रकल्प 25 ते 50 लाखासाठी असेल तर इयत्ता दहावी पास असणे आवश्यक आहे.

उत्पादन उद्योगासाठी कमाल प्रकल्प मर्यादा 50 लाख रुपये आणि सेवा उद्योगासाठी कमाल प्रकल्प मर्यादा 20 लाख रुपये आहे.

प्रकल्प अहवालातील निकष 

स्थिर भांडवलाकरीता मशीनरी रक्कम कमीत कमी 50 टक्के, इमारत बांधकामाकरिता जास्तीत जास्त 20 टक्के आणि खेळते भांडवलाकरिता जास्तीत जास्त 30 टक्के असणे आवश्यक आहे.

स्वगुंतवणूक 5 ते 10 टक्के, अनुदान मर्यादा 15 ते 35 टक्के आहे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना नवीन स्थापन होणाऱ्या उद्योगासाठी आहे. यामध्ये वैयक्तिक मालकी असलेले घटक देखील पात्र आहेत. 

ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्यासाठी लागणारे कागदपत्रे 

पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा डोमिसीयल सर्टिफिकेट, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र (आपले शिक्षण किती झाले याचा पुरावा जसे दहावी, बारावी, पदवीचे गुणपत्रक), हमीपत्र (Undertaking Form) वेबसाईटवर मेनूमध्ये मिळेल.

प्रकल्प अहवाल, जातीचे प्रमाणपत्र (अजा/अज असेल तर), विशेष प्रवर्ग असेल तर प्रमाणपत्र (माजी सैनिक, अपंग), REDP/EDP/SDP किंवा कौशल्य विकास प्रशिक्षण झाले असेल तर प्रमाणपत्र, लोकसंख्येचा दाखला (20000 पेक्षा कमी लोकसंख्या असेल तर), पार्टनरशिप उद्योग असेल तर रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र आणि अधिकारपत्र आदी कागदपत्रे लागतात.

दहावी-बारावीचा निकाल 2023 तारीख येथे पहा

ऑनलाईन अर्ज येथे करा

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईट https://maha-cmegp.gov.in/ या संकेत स्थळाला भेट द्यावी. तिथे CMEGP Online Application for Individual Applicant पर्यायावर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करू शकता.

नवनविन अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

 


Previous Post Next Post