Salary Increase : राज्य सरकारचा मोठा निर्णय, 'या' कर्मचाऱ्यांच्या मानधनात केली तब्बल 10 हजार रुपयाची वाढ, सुधारित मानधन येथे पहा..

Teacher Salary Increase 2023 : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण सेवकांच्या मानधनात 10 हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, हा लाभ 1 जानेवारी 2023 पासून देण्यात येणार आहे, आता इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अधिनस्त स्वयंसेवी संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या आश्रमशाळांतील शिक्षण सेवकांच्या मानधनात देखील 10 हजार वाढ करण्यात आली आहे. सविस्तर बातमी पाहूया..

राज्य सरकारचा मोठा निर्णय, शिक्षणसेवकांच्या मानधनात 10 हजाराची वाढ

Teacher Salary Increase 2023

राज्यात शालेय शिक्षण विभागाकडून शिक्षण सेवक ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. यांतर्गत शालेय शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण सेवकांच्या मानधनात 10 हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने 22 डिसेंबर 2022 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय 7 फेब्रुवारी 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. सविस्तर येथे वाचा.. 

'या' कर्मचाऱ्यांच्या मानधनात केली तब्बल 10 हजार रुपयाची वाढ, सुधारित मानधन

या धर्तीवर आता इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अधिनस्त स्वयंसेवी संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या आश्रमशाळांतील शिक्षणसेवकांच्या मानधनात देखील 10 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसा शासन निर्णय शासनाने काढला असून, हा लाभ 1 जानेवारी 2023 पासून मिळणार आहे.

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अधिनस्त स्वयंसेवी संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या आश्रमशाळांतील शिक्षणसेवकांचे सुधारित मानधन पुढीलप्रमाणे

  1. प्राथमिक व उच्च प्राथमिक - रु.16000/- ((पूर्वीचे 6000/-)
  2. माध्यमिक - रु.18000/- (पूर्वीचे 8000/-)
  3. उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालय - 20000 ((पूर्वीचे 9000/-)

मानधन वाढ शासन निर्णय येथे पहा
जिल्हा परिषद मेगा भरती जाहिरात येथे पहा

अंगणवाडी भरती निवड प्रक्रिया येथे पहा

नवनविन अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

 

Previous Post Next Post