ITI Student Stipend : आयटीआय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, येत्या शैक्षणिक वर्षापासून 500 रुपये विद्यावेतन मिळणार

ITI Student Stipend : राज्यातील विद्यार्थ्यांना करिअर विषयक विविध संधीची माहिती मिळावी, यासाठी लवकरच शासकीय हेल्पलाईन सुरु करण्यात येणार आहे, तसेच आयटीआयमधील विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा 500 रुपये विद्यावेतन (ITI Student Stipend) देण्यात येणार आहे, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी याबाबतची माहिती दिली.

करिअर मार्गदर्शन मेळावा संपन्न

ITI Student Stipend

करिअर विषयक विविध संधी संदर्भात कुर्ला येथील डॉन बॉस्को इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट येथे आयोजित शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या राज्यस्तरीय उपक्रमाचे मंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. यामध्ये सुमारे 3 हजार पेक्षा जास्त विद्यार्थी या शिबिरामध्ये सहभागी झाले. 

शिबिराच्या ठिकाणी विविध करिअर विषयक संधी, रोजगार-स्वयंरोजगार विषयक शासकीय योजना, देशातील आणि परदेशातील विविध शिष्यवृत्ती तसेच शैक्षणिक कर्जविषयक योजना आदींची माहिती देणारे स्टॉल्स लावण्यात आले होते. 

या स्टॉल्सना विद्यार्थ्यांसह पालकांनीही भेट देऊन माहिती घेतली. याठिकाणी विद्यार्थ्यांसह पालकांचेही करिअरविषयक समुपदेशन करण्यात येत होते. यासोबतच दिवसभर शिक्षण आणि करिअरविषयक क्षेत्रातील तज्ज्ञानी विविध विषयांवर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

करिअरविषयक मार्गदर्शनासाठी राज्यात लवकरच हेल्पलाइन - Career Helpline

राज्यातील विद्यार्थी, युवक-युवती आणि पालकांना करिअरविषयक विविध संधींची माहिती (Career Helpline) घरबसल्या घेता यावी यासाठी लवकरच कायमस्वरूपी हेल्पलाईन नंबर आणि ईमेल आयडी सुरू करण्यात येणार आहे. 

आयटीआयमधील विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा 500 रुपये विद्यावेतन

शैक्षणिक वर्ष 2023 24 पासून राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (ITI) विद्यार्थ्यांना दरमहा 500 रुपये विद्यावेतन (Stipend) देण्यात येईल, अशी घोषणा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली. कुर्ला येथील डॉन बॉस्को इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट येथे आयोजित करिअर शिबिरामध्ये मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी याबाबतची माहिती दिली. ITI Student Stipend

सर्व जिल्ह्यात युवाशक्ती करिअर शिबीरांचे आयोजन

देशात मागील काही वर्षात औद्योगिक, कॉर्पोरेट अशा विविध क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत. त्या बदलांना अनुसरून विविध कौशल्ये असलेले रोजगार या क्षेत्रामध्ये व्यापक प्रमाणात उपलब्ध झाले आहेत. पण या कौशल्याचे प्रशिक्षण कोठे घ्यायचे, त्यासाठीच्या प्रशिक्षण संस्था कुठे आहेत, प्रवेशप्रक्रिया कशी असते याची माहिती ज्ञान अनेकांना नसते. 

त्यामुळे अनेक युवक-युवती पारंपरिक शिक्षण, प्रशिक्षणच घेताना दिसतात. या युवकांसाठी भविष्याची विविध नवीन क्षितिजे खुली व्हावीत, नवनवे अभ्यासक्रम, स्किल्स त्यांना माहीत व्हावेत यासाठी कौशल्य विकास विभागाने पुढाकार घेतला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये दिनांक 6 मे ते 6 जून 2023 या कालवधीत छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. 

यामध्ये विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या करिअरविषयक विविध संधींची माहिती या शिबिरांमधून दिली जाणार आहे. यामध्ये विद्यार्थी, युवक-युवतींसह पालकांचेही करिअरविषयक समुपदेशन केले जाणार आहे. राज्यातील ग्रामीण, शहरी अशा सर्व भागातील विद्यार्थी, युवक-युवती व पालकांनी या शिबिरांमध्ये सहभागी व्हावे आणि बदलत्या काळास अनुसरुन ठिकठिकाणी सुरु झालेल्या विविध शैक्षणिक, व्यावसायिक इत्यादी अभ्यासक्रमांची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

नवनविन अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

 

Previous Post Next Post