Pashusavardhan Vibhag Bharti 2023 : [जाहिरात] पशुसंवर्धन विभागात 446 पदांची मोठी भरती, जाणून घ्या पदांचा तपशील व पगार, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक...

Pashusavardhan Vibhag Bharti 2023 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन विभागामध्ये 446 पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 27 मे 2023 पासून सुरुवात झाली आहे, तर अर्ज भरण्याची अंतिम मुदत 11 जून 2023 पर्यंत देण्यात आलेली आहे. सविस्तर जाहिरात पाहूया.

पशुसंवर्धन विभागात ४४६ पदांची भरती - मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

Pashusavardhan Vibhag Bharti 2023

पशुसंवर्धन विभागात विविध ४४६ पदांसाठी भरतीची प्रक्रिया राबविली जात असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. पशुसंवर्धन विभागात सर्वात मोठी भरती राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केली आहे.

लम्पी संसर्गाच्या वेळी पशुसंवर्धन विभागात पदांची कमतरता लक्षात घेता, त्यावेळी पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लवकरच आवश्यक त्या पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे आश्वासन जनतेला दिले होते. त्यानुसार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत धोरणात्मक निर्णय घेत ही पशुसंवर्धन विभागाची पदभरती जाहीर केली आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबविली जात आहे. याच अंतर्गत पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून सरळसेवा कोटयातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात काढण्यात आली आहे.

यामध्ये पशुधन पर्यवेक्षकची ३७६ पदे, वरिष्ठ लिपीकची ४४ पदे, लघुलेखक (उच्चश्रेणी)ची ०२ पदे, लघुलेखक (निम्नश्रेणी) ची १३ पदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञची ०४ पदे, तारतंत्रीची 03 पदे, यांत्रिकीची ०२, पदे, बाष्पक परिचरची ०२ पदे अशी एकूण ४४६ पदे भरली जाणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे.

पदांचा तपशील व वेतन

  1. पदाचे नाव - पशुधन पर्यवेक्षक (गट-क), वेतनश्रेणी एस-८, (२५५००-८११००)
  2. पदाचे नाव - वरिष्ठ लिपीक (गट-क), वेतनश्रेणी :- एस-८, (२५५००-८११००)
  3. पदाचे नाव - लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट-क), वेतनश्रेणी :- एस-१५, (४१८००-१३२३००)
  4. पदाचे नाव - लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट-क), वेतनश्रेणी :- एस-१४, (३८६००- १२२८००)
  5. पदाचे नाव - प्रयोगशाळा तंत्रज्ञ (गट-क), वेतनश्रेणी :- एस-१३ (३५४००-११२४००)
  6. पदाचे नाव - तारतंत्री (गट-क), वेतनश्रेणी :- एस-०६. (१९९००-६३२००)
  7. पदाचे नाव - यांत्रिकी (गट-क), वेतनश्रेणी:- एस-०६. (१९९००-६३२००)
  8. पदाचे नाव - बाष्पक परिचर (गट-क), वेतनश्रेणी :- एस-०६, (१९९००-६३२००)

२७ मे २०२३ रोजी सकाळी १०.०० वा. पासुन अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे, तर ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक ११ जून २०२३ रात्री ११.५९ वाजेपर्यंत आहे. तसेच यांची परीक्षा येत्या जुलै महिन्यात होणार असल्याचे सांगितले आहे.

Pashusavardhan Vibhag Bharti 2023
Pashusavardhan Vibhag Bharti 2023

संपूर्ण जाहिरात PDF येथे डाउनलोड करा
ऑनलाईन अर्ज येथे करा
अधिकृत वेबसाईट

पोस्ट ऑफिस मध्ये मोठी भरती, थेट 10 वीच्या गुणांनावर निवड येथे पहा

महागाई भत्ता तब्बल 8 % वाढ येथे पहा
'आरटीई' लेटेस्ट अपडेट येथे पहा

पुढील अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

                                                             

Previous Post Next Post