'समग्र शिक्षा' अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मानधनात ५० टक्के वाढ करा ! आमदार विनोद अग्रवाल यांनी घेतली शिक्षणमंत्र्यांची भेट..

SSA Employees Latest News : समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट बातमी, गोंदिया विधानसभेचे आमदार विनोद अग्रवाल यांनी मंत्रालय मुंबई येथे दिनांक 25 मे 2023 रोजी राज्याचे शालेय शिक्षण माननीय मंत्री दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांची भेट घेऊन, समग्र शिक्षा अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात ५० टक्क्याने वाढ करण्यात यावी यांसदर्भात सविस्तर चर्चा करून निवेदन सादर केले आहे, सविस्तर बातमी पाहूया..

केंद्र सरकारने मंजूर केले PAB मिनिट्स, पण मानधन वाढ नाहीच..

SSA Employees Latest News

समग्र शिक्षा पूर्वीची (सर्व शिक्षा अभियान) या योजनेसाठी केंद्र 60 टक्के व राज्य 40% याप्रमाणे राज्यात या योजनेची अंमलबजावणी करण्यात येते. दरवर्षी या योजनेसाठी अंतिम मान्यता केंद्र सरकार देत असते.

यावर्षीच्या 'समग्र शिक्षा' बजेटमध्ये राज्यातील समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना मानधन वाढ होईल ही अपेक्षा होती, केंद्र सरकारने मंजूर केलेल्या PAB मिनिट्स (PAB Minutes) नुसार मात्र कर्मचाऱ्यांच्या पगारात कसलीही वाढ करण्यात आलेली नाही. [SSA Employees Latest News]

समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मानधनात ५० टक्के वाढ करा !

समग्र शिक्षा अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात ५० टक्याने वाढ राज्यशासनाने केली पाहिजे. राज्यात ६०८० कर्मचारी गेल्या १५ ते २० वर्षापासून कंत्राटी पद्धतीने कार्यरत असून दरवषी १० टक्के मानधनात वाढ होणे, अपेक्षित असताना सुद्धा गेल्या ५ वर्षापासून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात आलेली नाही. 

समग्र शिक्षा अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ केल्यास कसलाही अतिरिक्त भार राज्य शासनावर येणार नाही असे देखील माननीय मंत्रीमहोदयांच्या लक्षात यावेळी आणून दिले आहे.

जुनी पेन्शन योजना संदर्भात दोन महत्वाचे निर्णय येथे पहा
आरटीई लेटेस्ट अपडेट येथे पहा

सदर मागणी चे त्यांना निवेदन देत राज्यात ६०८० कर्मचारी हे गेल्या १५ ते २० वर्षापासून कंत्राटी पद्धतीने कार्यरत करीत असून दरवर्षी १० टक्के मानधनात वाढ होणे अपेक्षित असताना सुद्धा गेल्या ५ वर्षापासून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात आलेली नाही. [ 'या' विभागातील कंत्राटी कर्मचारी सेवेत कायम शासन निर्णय येथे पहा]

गोंदिया विधानसभेचे आमदार विनोद अग्रवाल यांनी मंत्रालय मुंबई येथे राज्याचे शालेय शिक्षण माननीय मंत्री दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांची भेट घेऊन मानधन वाढीचे निवेदन देण्यात आले,  यावेळी राज्याचे शिक्षण सचिव व प्रकल्प संचालक उपस्थित होते.

कंत्राटी कर्मचारी सेवेत कायम येथे पहा शासन निर्णय
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ

महत्वपूर्ण बातम्या
Previous Post Next Post