7th Pay Commission Arrears : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सातव्या वेतन आयोगाची थकबाकी मिळणार 'या' महिन्यात, महत्वाचा शासन निर्णय निर्गमित

7th Pay Commission Arrears : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, सरकारी कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे, आता यासंदर्भात वित्त विभागाने राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै 2022 रोजी देय असलेल्या 7 व्या वेतन आयोगाचे अनुक्रमे वेतन आणि निवृत्तिवेतनाची थकबाकी रक्कम भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात अथवा रोखीने देण्याबाबत शासनाने आदेश निर्गमित केले आहे. सविस्तर पाहूया..

सातव्या वेतन आयोगाची थकबाकी 'या' महिन्यात मिळणार

7th Pay Commission Arrears

वित्त विभागाने दिनांक 24 मे 2023 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार माहे जून 2023 च्या पगारासोबत 7 व्या वेतन आयोगाची थकीत रक्कम देण्याबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता जून महिन्याच्या वेतनासोबत राज्यातील शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै 2022 रोजी देय असलेल्या सातव्या वेतन आयोगानुसार 4 थ्या हप्त्याची रक्कम जून महिन्याच्या पगारात मिळणार आहे. [पेन्शन संदर्भात लेटेस्ट न्यूज पहा]

सातव्या वेतन आयोगाची थकबाकी या कर्मचाऱ्यांना मिळणार

राज्यातील शासकीय कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी तसेच सर्व जिल्हा परिषदा, शासन अनुदानित शाळा आणि इतर सर्व शासन अनुदानित संस्थांमधील पात्र कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग थकबाकीच्या चौथ्या हप्त्याची रक्कम माहे जून 2023 च्या वेतनासोबत अदा करण्यात येणार आहे.

राज्यातील या कर्मचाऱ्यांना थकबाकी रक्कम रोखीने मिळणार

भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम त्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.

आणि राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना (National Pension Scheme) अथवा परिभाषित अंशदायी निवृत्तिवेतन योजना (DCPS) लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम रोखीने अदा करण्यात बाबत वित्त विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत पेन्शन संदर्भात घेतला मोठा निर्णय येथे पहा
RTE 25% प्रवेश घेण्याची अंतिम संधी अपडेट पहा

नवनविन अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

 

Previous Post Next Post