Dearness Allowance News : राज्यातील या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आता शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळणार महागाई भत्ता

Dearness Allowance News : केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यात येतो, याप्रमाणेच आता राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता देण्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली, एसटी महामंडळाचा वर्धापन दिन (दि 14) रोजी साजरा करण्यात आला, यादरम्यान कार्यक्रमात बोलताना त्यांनी एसटी कामगारांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच महागाई भत्ता देण्याची घोषणा केली, याचा राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार महागाई भत्ता

Dearness Allowance News

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) अमृत महोत्सवी वर्धापन दिन सोहळा कार्यक्रमाचे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात आज आयोजन करण्यात आले होते.  त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. 

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, एसटीचे अमृत महोत्सवी वर्ष व देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष हा दुग्ध शर्करा योग आहे. एसटीचा 75 वर्षांचा प्रदीर्घ प्रवास झाला असून ही महाराष्ट्राची लोकवाहिनी आहे. एस टी महामंडळाने बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदवाक्याप्रमाने काम करावे. 

गुणवत्तापूर्वक व लोकाभिमुख एसटीची सेवा असली पाहिजे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या 75 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास व महिलांना 50 टक्के प्रवास सवलत अशा योजनांना प्रवाशांनी उदंड प्रतिसाद दिला.

शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आता एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यासाठी शासन सकारात्मक असल्याची मोठी घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.

मराठी चित्रपटांसाठी मिनी थिएटर

प्रवाशी हे एसटीसाठी सर्वस्व असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, की एसटीचा चेहरा मोहरा बदलून टाकण्याचे काम शासन करीत आहे. नवीन इलेक्ट्रिक बसेस, वातानुकूलित बसेस महामंडळाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात येत आहे. महामंडळाच्या ताफ्यात लवकरच ७ हजार बसेस येणार आहेत. तसेच बस स्थानकांवर जमिन उपलब्धतेनुसार मराठी चित्रपटांसाठी मिनी थिएटर ही नवीन संकल्पना राबविण्यात येईल. 

थोडक्यात एसटी..

राज्यातील 38 हजार खेड्यांना एसटीने जोडले असून 97 टक्के जनतेपर्यंत एसटी पोहोचली आहे. एसटी कडे 16 हजार 500 बस असून 250 आगार आणि 580 बस स्थानके आहेत. एसटी तर्फे रोज 53 लाख प्रवाशांची ने - आण करते. 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाचा लाभ देण्यात येत आहे, तर महिला सन्मान योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या बसमध्ये 50 टक्के तिकीट दरात सवलत देण्यात येत आहे. तसेच अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींना घरापासून शाळेपर्यंत मोफत प्रवासाची सवलत देण्यात आली आहे.

मंत्रिमंडळ बैठीकीत कर्मचाऱ्यांच्या पगारात तब्बल 10 हजार रुपये वाढ येथे पहा निर्णय
कंत्राटी कर्मचारी शासन सेवेत लेटेस्ट बातमी पहा

Previous Post Next Post