New Academic Year : आजपासून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा

New Academic Year 2023 : नवीन शैक्षणिक वर्षाला दिनांक 15 जून 2023 पासून सुरुवात होत आहे, शिक्षणाचा श्रीगणेशा ज्या शाळेतून होतो, त्या शाळेचा पहिला दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो, विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग सज्ज असून, विद्यार्थ्यांनी आनंदाने शिक्षण घेऊन यशस्वी व्हावे, अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री (Deepak Kesarkar)  यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आजपासून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात

New Academic Year

महाराष्ट्रात नवीन शैक्षणिक वर्षाला गुरूवार दि. 15 जून 2023 पासून सुरूवात होत आहे. शालेय शिक्षण विभाग विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी सज्ज असून विद्यार्थ्यांनी आनंदाने शिक्षण घेऊन यशस्वी व्हावे, अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

शुभेच्छा देताना मंत्री श्री.केसरकर म्हणाले, विद्यार्थी हे महाराष्ट्राचे भविष्यातील नेतृत्व आहेत. त्यांच्या हिताच्या दृष्टीने शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यात आले असून एकाच पुस्तकामध्ये सर्व विषयांचा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला आहे. याच पुस्तकात नोंदी घेण्यासाठी वह्यांची पाने देण्यात आली आहेत. सर्व विद्यार्थ्यांना गणवेश, बूट, सॉक्स देण्यात येणार आहेत. शेतीचे ज्ञान आवश्यक असल्याने यापुढे शेती विषय शिकविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सुधारित बालसंगोपन योजना पहा

कोणतेही काम करण्यात कमीपणा नसतो हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी श्रमाची महती समजून घ्यावी आणि  माणुसकी जपावी असा सल्लाही श्री.केसरकर यांनी दिला. विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करावा आणि महाराष्ट्रासह देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावावा. जगातील सर्वात तरूण देश म्हणून जगाला उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करावा. या कामी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शासन विद्यार्थ्यांच्या सोबत असून जगाचे दूत म्हणून सेवा देण्यासाठी तयार व्हावे, असेही श्री.केसरकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना सांगितले.

सातव्या वेतन आयोगाची थकबाकी आदेश पहा
पेन्शन संदर्भात मोठा निर्णय येथे पहा

शैक्षणिक वर्षापासून 'एक राज्य एक गणवेश' योजना लागू येथे पहा
RTE 25% प्रवेश लेटेस्ट अपडेट पहा
नवीन शैक्षणिक धोरण राज्यात लागू सविस्तर वाचा

नवनविन अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

 

Previous Post Next Post