Scholarship : विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ! तब्बल 13 वर्षानंतर इयत्ता पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्तीत भरघोस वाढ

Increase Scholarship News : महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे  तब्बल 13 वर्षानंतर शिष्यवृत्तीच्या रकमेत भरघोस वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला, पाचवी तसेच आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करून त्यांना अधिक प्रोत्साहन देण्याचा निर्णय दिनांक 13 जून 2023 रोजी  झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती रकमेत भरघोस वाढ

Increase Scholarship News

राज्यातील शालेय विद्यार्थ्याना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेत भरीव वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा योजनेत आता पाचवीसाठी 5 हजार रुपये प्रति वर्ष आणि आठवीसाठी 7 हजार 500 प्रति वर्ष अशी शिष्यवृत्ती असणार आहे.

ही शिष्यवृत्ती 2023 24 पासून लागू होणार असून, संच एच आणि संच आय करिता 20 हजार पेक्षा कमी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. 

पाचवी नंतर 3 वर्षांकरिता आणि आठवी नंतर 2 वर्षांकरिता शिष्यवृत्ती देण्यात येते. मात्र, गेल्या 13 वर्षात यात वाढ झाली नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. [वेतनात तब्बल 10000 रु वाढ पहा]

यामुळे पाचवीच्या विद्यार्थ्यांस दर महिन्याला 500 रुपये आणि आठवीच्या विद्यार्थ्यांस दरमहिन्याला 750 अशी शिष्यवृत्ती मिळेल. ही शिष्यवृत्ती 10 महिन्यांसाठी असते.

सध्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीकरिता किमान 250 रुपये ते कमाल 1000 रुपये प्रति वर्ष तर माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी किमान 300 ते कमाल 1500 प्रति वर्ष एवढी संचनिहाय शिष्यवृत्ती देण्यात येते.

RTE 25% प्रवेश घेण्याची अंतिम संधी अपडेट पहा

अनुसूचित जाती विद्यार्थ्यांसाठीच्या निर्वाह भत्त्यात केंद्राप्रमाणे सुधारणा; सर्व अभिमत विद्यापीठे, खाजगी महाविद्यालयांना लागू

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्त्यात केंद्राप्रमाणे सुधारणा करण्याचा तसेच त्याचा लाभ सर्व अभिमत विद्यापीठे, खाजगी महाविद्यालयांना देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या सुधारित मार्गदर्शक सूचना केंद्राने दिल्या असून त्या देखील राज्यात लागू करण्यात येतील.

अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना उच्च शिक्षण घेणे, त्यांच्या गुणवत्तेत वाढ करणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेऊन उच्च विद्या विभूषित होणे, हा उद्देश ठेवून अनुसूचित जाती (नवबौद्धासह) विद्यार्थ्यांकरीता भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना 1959-60 पासून राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहे. मार्च 2021 पासून या योजनेंतर्गत 2020-21 ते 2025-26 या वर्षांकरीता दिलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचना राज्यात लागू करण्यात येतील.

निर्वाह भत्त्यात सुधारणा करण्यात आली असून यासाठी 6 कोटी 50 लाख इतक्या वाढीव खर्चास देखील मान्यता देण्यात आली.  ही योजना केंद्र आणि राज्यामध्ये 60:40 अशी राबविण्यात येते. सुधारित निर्वाह भत्त्याचे दर पुढील प्रमाणे आहेत 

वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गटांप्रमाणे 4 हजार रुपये ते 13 हजार 500 रुपये तर वसतिगृहात न राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गटांप्रमाणे 2 हजार 500 ते 7 हजार रुपये असे सुधारित दर असतील. शिष्यवृत्तीचा लाभ थेट विद्यार्थ्याच्या बँक खात्यात जमा होईल.

कॅबिनेट बैठकीतील 10 महत्वपूर्ण निर्णय पहा
बाल संगोपन (दरमहा 2250) सुधारित योजना पहा
कंत्राटी कर्मचारी शासन सेवेत नियमित मंत्रिमंडळ निर्णय पहा

पुढील अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

 

Previous Post Next Post