अंगणवाडी भरती प्रक्रिया 2023 : 12 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी! जळगाव, अकोला, सोलापूर जिल्ह्याची जाहिरात प्रसिद्ध..

Maharashtra Anganwadi Bharti 2023 : महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी भरती 2023 सुरु झाली असून, अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदांच्या राज्यभरात अंगणवाडी कर्मचाऱ्यांची जवळपास 20 हजार 601 पदे भरण्यात येत आहे, एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) अंतर्गत जळगाव, अकोला आणि सोलापूर जिल्ह्याची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, सविस्तर पाहूया..

12 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी!

Maharashtra Anganwadi Bharti 2023

अंगणवाडी भरती 2023 सुरु झाली असून, अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदांसाठी विविध जिल्ह्यामध्ये जाहिरात देण्यात आली आहे. ही संपूर्ण भरती प्रक्रिया दिनांक 2 फेब्रुवारी 2023 च्या शासन निर्णयानुसार राबविण्यात येत असून, यासाठी 12 वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी मिळालेली आहे. (अंगणवाडी भरती प्रक्रिया शासन निर्णय येथे पहा]

अंगणवाडी भरती आवश्यक पात्रता

  1. अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदांसाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  2. स्थानिक रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  3. अंगणवाडी भरती साठी आवश्यक वयोमर्यादा ही 18 ते 35 वर्ष आहे. (विधवा उमेदवारांसाठी 40 वर्ष)
  4. लहान कुटुंब पात्रता आवश्यक (उमेदवारास जास्तीत जास्त दोन अपत्य असावीत)
  5. मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
  6. याव्यतिरिक्त जाहिरातीमध्ये नमूद इतर पात्रता असणे आवश्यक राहील.

अंगणवाडी सेविका भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे 

  • शैक्षणिक पात्रता संबंधित (सर्व कागदपत्रे)
  • जन्म दाखला
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र (असल्यास)
  • रहिवासी दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • अनुभव प्रमाणपत्र (असल्यास )
  • स्थानिक रहिवासी असलेल्या बाबतचा दाखला
  • जाहिरातीमध्ये नमूद संबंधित कागदपत्रे

अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका पगार

महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात घोषित केल्याप्रमाणे सुधारित पगार पुढीलप्रमाणे 

  • अंगणवाडी सेविका -  10 हजार रुपये 
  • मिनी अंगणवाडी सेविका - 7200 रुपये 
  • अंगणवाडी मदतनिस - 5525 रुपये

अंगणवाडी भरती सुरू, येथे करा अर्ज

अंगणवाडी भरती प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने राबविली जाते. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष एकात्मिक बाल विकास या (ICDS) कार्यालयात जाऊन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही लगेच तुमच्या तालुका/मनपा क्षेत्रातील एकात्मिक बाल विकास (ICDS) या कार्यालयात जाऊन जाहिरातीची संपूर्ण माहिती घ्यावी आणि अर्ज सादर करावे.

जळगाव अंगणवाडी भरती जाहिरात 2023

जळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी भरतीची जाहिरात निघाली असून, यामध्ये 78 जागा भरण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची अंतिम मुदत ( Last Date ) दिनांक 6 जुलै 2023 पर्यंत आहे. 

  • अर्ज करण्याची पद्धत - ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 6 जुलै 2023

नोट - जाहिरात काळजीपूर्वक वाचून इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करावेत.

अंगणवाडी भरती जळगाव जाहिरात व फॉर्म डाउनलोड करा  - जाहिरात 1

अंगणवाडी भरती जळगाव जाहिरात व फॉर्म डाउनलोड करा  - जाहिरात 2

अकोला अंगणवाडी भरती जाहिरात 2023

अकोला जिल्ह्यातील अंगणवाडी भरतीची जाहिरात निघाली असून, यामध्ये 60 जागा भरण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनांक 10 जुलै 2023 पर्यंत आहे. 

  • अर्ज करण्याची पद्धत - ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 जुलै 2023

नोट - जाहिरात काळजीपूर्वक वाचून इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करावेत.

अकोला अंगणवाडी भरती जाहिरात 2023 येथे डाउनलोड करा

सोलापूर अंगणवाडी भरती जाहिरात 2023

सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाडी भरतीची जाहिरात निघाली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनांक 6 जुलै 2023 पर्यंत आहे. 

  • अर्ज करण्याची पद्धत - ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 6 जुलै 2023

नोट - जाहिरात काळजीपूर्वक वाचून इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करावेत.

सोलापूर अंगणवाडी भरती जाहिरात 2023 येथे डाउनलोड करा


इतर महत्वाच्या बातम्या

नवनविन अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

 

Previous Post Next Post