Pension Yojana Maharashtra : संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील निवृत्तीवेतनात मोठी वाढ, लाभ, पात्रता, अर्ज सविस्तर जाणून घ्या..

Pension Yojana Maharashtra : राज्यात निराधार, अंध, अपंग, शारिरीक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती व निराधार विधवा, परित्यक्त्या, देवदासी या सर्व दुर्बल घटकांसाठी अर्थसहाय्य देण्याच्या हेतूने राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृध्द व्यक्तींसाठी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना राबविण्यात येतात, त्यामधील संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील निवृत्तीवेतनात दरमहा 500 रुपयांची वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या योजनेसाठी आवश्यक पात्रता, लाभ आणि इतर महत्वाची माहिती सविस्तर वाचा..

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ अनुदान योजना

Pension Yojana Maharashtra

संजय गांधी निराधार अनुदान योजना ही सन 1980 पासून राबवण्यात येत आहे. या योजनेमध्ये निराधार वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग, शारीरिक व मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती व निराधार विधवांना अर्थसहाय्य (Pension) देण्याच्या मूळ हेतूने संजय गांधी निराधार योजना राबवण्यात येत आहे.

संजय गांधी निराधार अनुदान योजनाश्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनाराष्ट्रीय गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, आम आदमी विमा योजना अशा विविध योजना राज्य तसेच केंद्र शासनामार्फत वंचित घटकातील व्यक्तींसाठी त्यांचा समाजातील मान उंचावण्यासाठी त्यांना एक आर्थिक सपोर्ट देऊन स्वतःच्या उन्नतीसाठी योजना राबविण्यात येते.

संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील निवृत्तीवेतनात वाढ

संजय गांधी निराधार अनुदान योजनेत आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेत दरमहा 500 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या दोन्ही योजनांत सध्या 1000 रुपये इतके मासिक अर्थसहाय्य करण्यात येते. आता त्यात 500 रुपये वाढ झाल्याने ते 1500 हजार रुपये इतके होईल.

एक अपत्य असलेल्या विधवा लाभार्थींना सध्या 1100 तर दोन अपत्ये असलेल्या लाभार्थींना 1200 इतके मासिक अर्थसहाय्य देण्यात येते. यात अनुक्रमे 400 रुपये व 300 रुपये अशी वाढ देखील करण्यात आली आहे. सध्या या दोन्ही योजनांत मिळून 40 लाख 99 हजार 240 लाभार्थी आहेत. निवृत्तीवेतनात वाढ झाल्यामुळे 2 हजार 400 कोटी रुपये अतिरिक्त तरतुदीस देखील मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

संजय गांधी निराधार योजना लाभार्थी कोण ?

 • वय 65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला 
 • अनाथ मुले 
 • अपंगातील दिव्यांग सर्व प्रवर्ग (किमान ४०% अपंगत्व सिव्हील हॉस्पिटलचे अपंग प्रमाणपत्र
 • क्षयरोग,कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला 
 • निराधार विधवा ( आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवासह ) 
 • घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या
 • अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला 
 • तृतीयपंथी
 • देवदासी
 • 35 वर्षावरील अविवाहीत स्त्री 
 • तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी 
 • सिकलसेलग्रस्त 

संजय गांधी निराधार योजना आवश्यक कागदपत्रे

 1. जन्म प्रमाणपत्र
 2. उत्पन्नाचा दाखला
 3. रहिवाशी प्रमाणपत्र
 4. अपंगाचे प्रमाणपत्र
 5. वैद्यकीय प्रमाणपत्र
 6. कोणत्याही सरकारी किंवा निमसरकारी किंवा शासन अनुदानित निवासगृहाचा आंतरवासी नसल्याबाबतचा दाखला
 7. अनाथ असल्याचा दाखला

संजय गांधी निराधार योजना पात्रता अटी आणि शर्ती

 • महाराष्ट्र राज्यामध्ये कमीत कमी 15 वर्षापासून वास्तव्य रहिवासी असणे आवश्यक आहे.
 • दिव्यांग (अपंग) व्यक्ती अर्जदाराकडे किमान 40 टक्क्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
 • अर्ज करणाऱ्या व्यक्तीची वय हे 65 वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
 • या योजनेचा लाभ घेण्यासाठी दारिद्र रेषेखालील कुटुंबांच्या यादीत नाव असणे किंवा रुपये 21000 पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे.

संजय गांधी निराधार पेन्शन योजना अर्ज करण्याची पद्धत

संजय गांधी निराधार योजना फॉर्म Online - सोबतच्या शासन निर्णय GR मध्ये संजय गांधी निराधार योजना फॉर्म दिला आहे.
 • संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी सर्वप्रथम फॉर्म डाउनलोड करा.
 • संजय गांधी निराधार अनुदान योजना फॉर्म मध्ये आवश्यक सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
 • उपरोक्त सांगितलेले सर्व आवश्यक कागदपत्रे फॉर्म सोबत जोडा.
 • संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी आपण ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज करू शकता, यासाठी आपले सरकार या वेबसाईटला भेट देऊन आपले अकाऊंट तयार करा आणि त्या ठिकाणाहून आपण अर्ज करू शकता. मात्र त्यापूर्वी आपण ऑफलाईन स्वरूपामध्ये फॉर्म भरून आवश्यक ती कागदपत्रे सोबत ठेवा.

संजय गांधी निराधार योजना संपर्क कोणाकडे करावा?

 • संजय गांधी निराधार योजने संदर्भामध्ये कोणतीही अडचण/समस्या असल्यास आपल्या गावातील तलाठी कार्यालय किंवा तालुका स्तरावर तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा. [अधिक माहितीसाठी शासन निर्णय पहा]
मोफत टॅब योजना - ऑनलाईन अर्ज येथे करा

Previous Post Next Post