गुड न्यूज! राज्य सरकारचा मोठा निर्णय; राज्यातील या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू, शासन निर्णय जारी..

Old Pension Scheme News : जुनी पेन्शन योजनेबाबत सरकारने दिनांक 24 जुलै 2023 रोजी एक महत्वपूर्ण शासन निर्णय जारी केला आहे, यानुसार राज्यातील आरोग्य विभागाच्या 42 अधिकारी, कर्मचाऱ्यांना  शासन सेवेत सामावून घेतल्यानंतर, आता त्यांच्या निवृत्तीवेतन संदर्भात जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत शासन निर्णय काढण्यात आला आहे, सविस्तर वाचा..

राज्य सरकारचा मोठा निर्णय - राज्यातील या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू

Old Pension Scheme News

इचलकरंजी नगरपरिषदेचे इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आले आहे. इचलकरंजी नगरपरिषदेच्या इंदिरा गांधी मेमोरिअल हॉस्पिटल मधील 42 अधिकारी/कर्मचारी यांना सार्वजनिक आरोग्य विभागात सामावून घेण्याबाबतचा शासन निर्णय दि. 27 डिसेंबर 2021 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

जुनी पेन्शन योजनेबाबत दिलासादायक बातमी

या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या समोवशनाच्या दिनांकापासून दिनांक 10 ऑगस्ट 2022 च्या शासन निर्णयान्वये 'परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS), राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) लागू करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. या संदर्भात लोकप्रतिनिधींनी या अधिकारी / कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत शासनास विनंती केली होती.

तारांकित प्रश्न - सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरून 60 वर्षे

त्यानुषंगाने इचलकरंजी नगरपरिषदेचे इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल मधील 42 अधिकारी / कर्मचारी यांना समक्रमांकाच्या दि. 10 ऑगस्ट 2022 रोजीच्या आदेशान्वये शासन सेवेत समावेशनाच्या दिनांकापासून "परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबतचा उपरोक्त दिनांक 10 ऑगस्ट 2022 चा शासन निर्णय अधिक्रमित करुन, महाराष्ट्र नागरी सेवा (सेवानिवृत्ती विषयक) अधिनियम, 1981 नुसार त्यांची यापूर्वीची सेवा विचारात घेऊन "जुनी पेन्शन योजना लागू राहण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. [शासन निर्णय येथे पहा]

$ads={2}

हे ही वाचा - सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरून 60 वर्षे - कंत्राटी कर्मचारी नवीन धोरण PDF कंत्राटी कर्मचारी निर्णय पहा - सारथी शिष्यवृत्ती खास योजना पहा

Previous Post Next Post