Mahavitaran Employee : महावितरण वीज कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट! महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक यांचे महत्वाचे निर्देश

Mahavitaran Employee News : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी महापारेषणच्या वतीने आयोजित सक्षमीकरण परिषदेत बोलताना महत्त्वाची निर्देश दिले. त्यांनी वीज कंपन्यांना कर्मचारी व कामगार संघटनांशी सुसंवाद वाढवण्याची सूचना केली. वीज ही मानवाची अत्यावश्यक मूलभूत गरज आहे. या महत्त्वाच्या सेवा क्षेत्रात काम करताना मानव संसाधन विभागाची भूमिका मोठी आहे. खासगी वीज कंपन्यांशी स्पर्धा करताना अधिकारी, कर्मचारी व कामगार संघटनेमध्ये सुसंवाद ठेवून पारदर्शी कारभार ठेवणे आवश्यक आहे.

$ads={1}

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक यांचे महत्वाचे निर्देश

Mahavitaran Employee News

महापारेषणच्या वतीने महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या तीनही वीज कंपन्यांतील मानव संसाधन व कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांची दोन दिवसीय सक्षमीकरण परिषद (मल्हार-२०२३) रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, भाईंदर येथे आयोजित केली आहे. त्या परिषदेत श्री. पाठक बोलत होते. 

श्री. पाठक म्हणाले की, भारताचा वेगाने विकास होत आहे. वीज क्षेत्रातही आमुलाग्र बदल होत आहेत. महानिर्मिती (Mahanirti), महापारेषण (Mahapareshan) व महावितरण (Mahavitaran) या तीनही कंपन्या महत्त्वाच्या आहेत. यामध्ये मानव संसाधन विभागाची भूमिका खूप मोठी व व्यापक आहे. त्यासाठी त्यांनी वेगळा विचार केला पाहिजे. खासगी वीज कंपन्यांशी स्पर्धा करताना आपण अधिकारी, कर्मचारी व कामगार संघटनेमध्ये सुसंवाद ठेऊन पारदर्शी कारभार ठेवला पाहिजे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याची मागणी, शासनाकडे प्रस्ताव सादर

अन्न, वस्त्र व निवारा या माणसाच्या मूलभूत गरजांप्रमाणेच वीज ही मानवाची अत्यावश्यक मुलभूत गरज बनली आहे. या महत्त्वाच्या सेवा क्षेत्रात काम करताना वीज कंपन्यांतील मानव संसाधन व कामगार विभागाने सातत्याने कर्मचारी व कामगार संघटना यांच्यात सुसंवाद वाढविला पाहिजे, असे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी सांगितले.

परिषदेच्या सुरूवातीला महापारेषणचे संचालक श्री. गमरे यांनी प्रास्ताविकातून परिषदेमागची भूमिका विशद केली. तीनही कंपन्यांमध्ये मानव संसाधन व कामगार अधिकाऱ्यांशी समन्वय रहावा, यासाठी ही परिषद आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार व्यवस्थापक महेश आंबेकर यांनी मानले.

$ads={2}

हे ही वाचा : असंघटित कामगारांची नोंदणी करण्यासाठी येथे पहा महत्वाची बातमी  - करार कर्मचाऱ्यांना सुधारित मानधन!

अखेर! शासकीय कर्मचाऱ्यांना 1 जुलैची काल्पनिक वेतनवाढ लागू

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post