Unorganised Sector Workers : महत्त्वाची बातमी! असंघटित कामगारांची नोंदणी करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घ्यावा – उद्योगमंत्री उदय सामंत

Unorganised sector workers : असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी शासनाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. शासकीय योजनांचा कामगारांना लाभ मिळावा यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी असंघटित कामगारांची नोंदणी (Registration) करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले. सविस्तर वाचा...

$ads={1}

असंघटित कामगारांची नोंदणी करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घ्यावा

Unorganised sector workers

बांधकाम क्षेत्रामुळे रोजगाराच्या (Employment) संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्या आहेत.  बांधकाम व्यावसायिक सर्वसामान्यांना घरे उपलब्ध करुन देतात.  बांधकाम क्षेत्रातील असंघटित कामगारांनाही घरे उपलब्ध करुन देण्यासाठी संघटनेने पुढाकार घ्यावा.  संघटनेने त्यांच्या क्षेत्रातील कामगारांची, महिला कामगारांची नोंदणी करावी. त्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळेल. मराठी माणसाने मराठी माणसाला व्यवसायामध्ये सहकार्य करावे अशी अपेक्षा श्री.सामंत यांनी व्यक्त केली.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याची मागणी, शासनाकडे प्रस्ताव सादर

मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेच्या वतीने 'पुणे शहर व परिसरात होणाऱ्या संभाव्य औद्योगिक विकास (Industrial Development) व पायाभूत सुविधांचा बांधकाम क्षेत्रावर होणारा परिणाम' या विषयावर आयोजित केलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेचे एस.आर.कुलकर्णी,  नंदू घाटे,  प्रमोद पाटील, अंकुश आसबे आदी उपस्थित होते.

$ads={2}

बांधकाम क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. खासदार श्रीरंग बारणे यांनी पुणे परिसरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे होत असून याचा लाभ बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांना होणार असल्याचे सांगितले. संघटनेचे अध्यक्ष नंदू घाटे यांनी प्रास्ताविकात संघटनेच्या कार्याची माहिती दिली.

करार कर्मचाऱ्यांना सुधारित मानधन!
बाह्ययंत्रणेमार्फत नियुक्त कर्मचाऱ्यांना 83% मानधन मिळणार

मोठी अपडेट ! तलाठी भरती परीक्षेच्या तारखेबाबत जाहीर सूचना! सविस्तर वाचा

Previous Post Next Post