Pradhan Mantri Vishwakarma Yojana : 30 लाख कारागिरांना 5 टक्के व्याजदराने कर्ज मिळणार!

केंद्र सरकारने कारागिरांसंदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारने पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान (Pradhan Mantri Vishwakarma Yojana) योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत 30 लाख कारागिरांना लाभ मिळणार आहे. ही योजना 13 हजार कोटींची असून, या योजनेमुळे देशातील कारागिराच्या आर्थिक उन्नतीसोबत त्याच्या परंपरागत कौशल्याची जपणूकही होणार आहे.

$ads={1}

विश्वकर्मा योजना 2023 काय आहे?

Pradhan Mantri Vishwakarma Yojana

पीएम विश्वकर्मा योजना सर्वसामान्य कारागिरांसाठी आहे. देशातील कारागिरांचे कौशल्य टिकावे आणि त्यातून त्याच्या आर्थिक उन्नतीला चालना मिळावी असा प्रयत्न आहे. त्यासाठी त्याला ५ टक्के व्याजदराने कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासोबत कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देण्यात येणार असून दररोज ५०० रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचे प्रमाणत्र देण्यात येणार आहे. उत्पादित वस्तूंना बाजार मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाच्या उन्नतीसाठी विविध योजना राबवितांना सर्वसामान्य माणसाला सहभागी करून घेतले. ३२ कोटी नागरिकांचे जनधन खाते सुरू झाले आहेत. नागरिकांच्या सहभागातून देशात स्वच्छतेची चळवळ मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली. कोविड काळात ८० कोटी गरिबांना मोफत धान्य देण्यात आले, असेही पालकमंत्री म्हणाले. पीएम विश्वकर्मा योजनेचा कारागिरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

PM Vishwakarma Yojana ही सामान्य कारागिरांसाठी योजना आहे. या योजनेअंतर्गत कारागिरांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यांना आवश्यक साधने देण्यात येणार आहेत. कारागिरांसाठी पुरस्कारही देण्यात येणार आहेत.

जनधन योजना, उज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शेतकरी सन्मान निधी योजना अशा अनेक कल्याणकारी योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आल्या आहेत. देशात पायाभूत सुविधांचा विकासही मोठ्या प्रमाणात होत असून मोठे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत प्रशिक्षण, व्यवसायासाठी १५ हजारापर्यंत साहित्य आणि कर्ज सुविधा देण्यात येणार आहे.

अधिकृत वेबसाईट - https://pmvishwakarma.gov.in/

$ads={2}

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post