Sarathi Drone Pilot Training : युवकांना सुवर्णसंधी! सारथीकडून ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज सुरु

Sarathi Drone Pilot Training : राज्यातील लक्षित गटातील शेतकरी /युवक/युवती यांना छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे प्रायोजित महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत रिमोट पायलट प्रशिक्षण संस्थेमार्फ़त ड्रोन पायलट प्रशिक्षण देणेकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत.

युवकांना सुवर्णसंधी! सारथीकडून ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज सुरु

Sarathi Drone Pilot Training

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे अन्वये सारथी संचालक मंडळाच्या बैठकीतील मान्य ठरावानुसार राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा समाजातील शेतकरी / युवक/युवती यांना सारथी संस्थेच्या खर्चाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत रिमोट पायलट प्रशिक्षण (Remote Pilot Training) संस्थेमार्फ़त मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानुसार शेतकरी / युवक/युवती यांचेकडून दि. ३१.०३.२०२४ अखेर सायंकाळी ५.०० पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.

कागदपत्रे हार्ड कॉपी सारथी संस्थेस पाठविण्याची शेवटची तारीख : ऑनलाईन अर्ज सादर केले नंतर १५ दिवसाचे आत

युवकांना रोजगाराच्या संधी

कृषीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर वाढविणेकरिता केंद्र व राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रोत्साहनात्मक अनुदान देत आहे. ड्रोनव्दारे विविध खरिप, रब्बी, फळपिके तसेच भाजीपाला पिकावर किटकनाशकाची फवारणी सुलभरित्या करता येते. मात्र, योग्यरित्या ड्रोन चालवू (ऑपरेट करु) शकतील, असे प्रशिक्षित मनुष्यबळ देखील पुरेशा प्रमाणात आज उपलब्ध नाही. शेती क्षेत्रातील लक्षित गटातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.

सारथीकडे ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी निधीची तरतूद असून अशी प्रशिक्षणे महात्मा फुले कृषी विद्यापिठ राहुरी अंतर्ग स्थापित झालेल्या रिमोट पायलट प्रशिक्षण केंद्रामार्फत आयोजित करण्यात आलेली आहेत. सदर केंद्राने सारथी संस्थेशी सामजस्य करार करुन लक्षित गटातील युवकांसाठी/ सदस्यांकरिता अशी प्रशिक्षणे देण्यास सहमती दर्शविलेली आहे.

हे ही वाचा : राज्यातील या कामगारांच्या प्रश्नांबाबत हिवाळी अधिवेशनात सरकारकडून मोठा खुलासा

याकरिता ७ दिवसाचे प्रशिक्षण असून या मध्ये ५ दिवस ड्रोन पायलटींग व २ दिवस फवारणी करणेचे प्रशिक्षण व अनुभव याचा समावेश आहे. प्रत्येक महिन्यामध्ये सदर केंद्रावर ७ दिवसाच्या १० प्रशिक्षणार्थीच्या ४ बॅचेस घेण्यास संबधित केंद्राने मान्यता दर्शिवलेली आहे.

प्रशिक्षणासाठी पात्रता निकष

  • प्रशिक्षणार्थी लाभार्थीचे वय १८ ते ४० वर्ष असावे,
  • लाभार्थी कृषी पदवीधर अथवा कृषी पदविका धारक असावा, मात्र असे लाभार्थी अर्ज न आल्यास अन्य विषयांचे पदवीधरांचा विचार करण्यात येईल.
  • मागील ३ वर्षाचे वार्षीक उत्पन्न हे र. रु. ८.०० लाखापेक्षा जास्त नसावे अथवा सक्षम प्राधिका-यांचे
  • आर्थिक दुर्बल प्रमाणपत्र (EWS) असावे.
  • प्रशिक्षणार्थी लाभार्थीकडे वैध पासपोर्ट असावा.
  • वैद्यकीय योग्यता (फिटनेस) प्रमाणपत्र असावे
  • शेतकरी कुटुंबातील सदस्यास प्राधान्य दिले जाईल,
प्रशिक्षणाचे ठिकाण: महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी कॅम्पस

रिमोट पायलट प्रशिक्षणासाठी पात्रता व निकष सविस्तर येथे पहा
अधिक माहितीसाठी भेट द्या - https://sarthi-maharashtragov.in/
ऑनलाईन अर्ज येथे करा

Previous Post Next Post