उद्योग विभागांतर्गत सर्व आस्थापनांना मतदानासाठी 20 नोव्हेंबर रोजी सुट्टी

येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्य रितीने बजावता यावा, याकरिता उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने सुट्टी जाहिर केली आहे.

election-holiday

लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ मधील कलम १३५ (ब) नुसार निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रातील कोणत्याही व्यवसायात, व्यापारात, औद्योगिक उपक्रमात किंवा इतर कोणत्याही आस्थापनेमध्ये कार्यरत असलेल्या आणि राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला, मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाईल. सदर सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना इत्यादींना लागू राहणार आहे. पोटकलम (1) नुसार मंजूर झालेल्या सुट्टीच्या कारणास्तव अशा कोणत्याही व्यक्तीच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही.

आचारसंहिता - म्हणजे काय? या काळात काय करावे? काय करू नये? येथे पाहा

टीईटी परीक्षेचे सुधारित वेळापत्रक - TET Hall Ticket Download Click Here

मतदार यादीत नाव चेक करा

हे अधिकारी, कर्मचारी निवडणूक कामात नाहीत

आदर्श आचारसंहिता लागू, 'या' बाबींवर निर्बंध; काय करावे किंवा करु नये..

अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल, मात्र त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील, कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहिल अथवा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.

उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम इत्यादींच्या आस्थापनांनी वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुद्ध योग्य कारवाई करण्यात येईल, असे उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने निर्गमित परिपत्रकात नमूद केले आहे.

परिपत्रक

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तात वाढ; ठिकठिकाणी तपासणी प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आवाहन

MPSC मार्फत विविध पदांसाठी मोठी भरती; जाहिरात, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक

NMMS शिष्यवृत्ती योजनेची सविस्तर माहिती - ऑनलाईन नोंदणी डायरेक्ट लिंक

आदिवासी विकास विभाग अंतर्गत 611 पदांची मोठी भरती, जाहिरात पाहा

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना विभागांतर्गत सरळसेवा भरती सुरू, जाहिरात पाहा

शिष्यवृत्ती परीक्षा 2025 ऑनलाईन नोंदणी सुरू, अधिसूचना पाहा

आरोग्य विभाग भरतीचा निकाल जाहीर, निवड यादी पाहा

ICDS अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती सुरू, जाहिरात, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक

अंगणवाडी मुख्यसेविका पदासाठी मोठी भरती ऑनलाईन अर्ज मूळ जाहिरात डायरेक्ट लिंक

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये भरघोस वाढ; परिपत्रक जारी

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now