Tribal Recruitment 2024 : आदिवासी विकास विभाग अंतर्गत 611 पदांची मोठी सरळसेवा भरती सुरू, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डायरेक्ट लिंक

आदिवासी विकास विभागाने ५ ऑक्टोबर २०२४ ला विविध पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध केली होती. यामध्ये अर्ज करण्याची अंतिम मुदत २ नोव्हेंबर ठेवली होती. त्यास आता १२ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Tribal Recruitment 2024 : आदिवासी विकास विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर झालेला असून, त्या विभाग/कार्यालयातील सरळसेवेच्या कोटयातील रिक्त पदे १०० टक्के भरण्यास दिलेल्या मान्यतेनुसार तब्बल ६११ पदांची सरळसेवा भरती सुरु झाली आहे, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.

आदिवासी विकास विभाग अंतर्गत 611 पदांची मोठी सरळसेवा भरती सुरू

Tribal Recruitment 2024

आयुक्त, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य नाशिक हे त्यांचे अंतर्गत अपर आयुक्त, कार्यालय नाशिक/ ठाणे / अमरावती / नागपुर यांचे अधिनस्त आस्थापनेवरील खालील पदे भरण्यात येत आहे.

एकुण जागा : ६११

  1. वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक
  2. संशोधन सहाय्यक
  3. उपलेखापाल
  4. मुख्यलिपिक
  5. सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ)
  6. आदिवासी विकास निरिक्षक (नॉनपेसा)
  7. वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक
  8. कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी
  9. लघुटंकलेखक
  10. गृहपाल-स्त्री 
  11. गृहपाल पुरुष
  12. अधिक्षक स्त्री
  13. अधिक्षक पुरुष
  14. ग्रंथपाल
  15. सहाय्यक ग्रंथपाल
  16. प्रयोगशाळा सहाय्यक
  17. कॉमेरामन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर 
  18. उच्चश्रेणी लघुलेखक
  19. निम्नश्रेणी लघुलेखक 

सरळसेवेची पदे भरण्यासाठी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या रिक्त पदांकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरावयाची सुविधा https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दिनांक १२.१०.२०२४ पासुन उपलब्ध होणाऱ्या लिंक वर उपलब्ध करुन दिलेली आहे.

महत्वाच्या तारखा

  • ऑनलाईन पध्दतीने अर्ज व परिक्षा शुल्क भरण्याचा दिनांक व वेळ : दिनांक १२.१०.२०२४ दुपारी १५.०० वाजता पासुन
  • ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक : दिनांक १२.११.२०२४ रात्री २३.५५ वाजे पर्यंत.
  • ऑनलाईन परिक्षेचा दिनांक : https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.

पदनिहाय सविस्तर तपशील, आवश्यक शैक्षणिक अहर्ता आणि इतर महत्वाची माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवरील मूळ जाहिरात पहावी.

आदिवासी विकास विभाग 611 जागांसाठी जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज येथे करा 

अधिक माहितीसाठी : https://tribal.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना विभागांतर्गत सरळसेवा भरती सुरू, जाहिरात पाहा

‘या’ दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर

ICDS अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती सुरू, जाहिरात, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक

तसेच २३ नोव्हेंबर २०२३ रोजी भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.  त्यानुसार अर्जाचे शुल्क विभागाने परत करण्यासाठी २८ ऑक्टोबर पर्यंत मुदत दिली होती. त्याला १२ नोव्हेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक, आदिवासी विकास भवन, पहिला मजला, जुना आग्रा रोड नाशिक येथे अथवा  टोल फ्री 1800 267 0007 या क्रमांकावर संपर्क साधावा.

अंगणवाडी मुख्यसेविका पदासाठी मोठी भरती ऑनलाईन अर्ज मूळ जाहिरात डायरेक्ट लिंक

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये भरघोस वाढ; परिपत्रक जारी

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now