विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज; 4 हजार 140 अंतिम उमेदवार – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 साठी राज्यातील एकूण 288 विधानसभा मतदारसंघासाठी एका टप्प्यांमध्ये दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी यंत्रणेची सर्व तयारी पूर्ण झाली असून या निवडणुकीतील अंतिम उमेदवारांची संख्या 4 हजार 140 असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम यांनी दिली आहे.

विधानसभा निवडणुक

मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाच्या पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत श्री.चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी पी.प्रदीप उपस्थित होते.

श्री.चोक्कलिंगम यांनी सांगितले की, राज्यातील लोकसभेच्या 16 – नांदेड या एका लोकसभा मतदारसंघात सुद्धा दिनांक 20 नोव्हेंबर, 2024 रोजी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी नामनिर्देशनपत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक 29 ऑक्टोबर 2024 असा होता. त्यानुसार 288 विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 7,078 इतके नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले. त्यापैकी एकूण 2,938 अर्ज मागे घेण्यात आले.

महिला व बालविकास विभागात मोठी भरती, जाहिरात ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक

मतदार नोंदणीत वाढ

दि.30 ऑक्टोबर रोजी अद्ययावत मतदारांची संख्या 9,70,25,119 असून यामध्ये पुरुष मतदार 5,00,22,739 तर महिला मतदार 4,69,96,279 आहे. तर 6,101  तृतीयपंथी मतदारांची नोंदणी  झाली आहे. दिव्यांग (PwD Voters) मतदारांची एकूण संख्या 6,41,425 इतकी असून सेना दलातील (Service Voters) मतदारांची संख्या 1,16,170 आहे.

आचार संहिता म्हणजे काय? काय करावे, काय करू नये येथे पहा

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा शासन निर्णय

राज्यामध्ये अतिउंच इमारती/सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या संकुलात

1,181 मतदान केंद्रे

मतदारांच्या संख्येच्या प्रमाणात मतदान केंद्राच्या संख्येत वाढ केली असून राज्यात  एकूण मतदान केंद्रे 1,00,186 आहेत. यामध्ये शहरी मतदान केंद्र 42,604  तर ग्रामीण मतदान केंद्र 57,582 इतकी आहेत. शहरी भागातील मतदारांची अनास्था विचारात घेऊन शहरी भागातील मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे, यासाठी राज्यामध्ये पुणे, मुंबई, ठाणे, इ. शहरांमध्ये अतिउंच इमारती/सहकारी गृहनिर्माण संस्थांची संकुले यामध्ये एकूण 1,181 मतदान केंद्र उभारण्यात आलेली आहेत. तसेच झोपडपट्टी भागात 210 मतदान केंद्र उभारण्यात आलेली आहेत. सहाय्यक मतदान केंद्रांची एकूण संख्या 241 इतकी आहे.

मतदानासाठी सुट्टी शासन परिपत्रक पहा

ईव्हीएम व्हीव्हीपॅट EVM-VVPAT

राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पुरेशा संख्येने ईव्हीएम उपलब्ध असून पुरेसा साठा आहे. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 1,00,186 इतक्या मतदान केंद्रांसाठी  2,21,600 बॅलेट युनिट (221 %), 1,21,886 कंट्रोल युनिट (122 %) व 1,32,094 व्हीव्हीपॅट (132 %) इतक्या प्रथमस्तरीय तपासणी मशिन्स उपलब्ध असून एकूण प्रथमस्तरीय करण्यात आलेल्या ईव्हीएम पैकी प्रशिक्षण व जनजागृतीच्या कार्यक्रमाकरिता त्यापैकी 5166 बॅलेट युनिट, 5166 कंट्रोल युनिट व 5165 व्हीव्हीपॅट इतक्या मशिन्सचा वापर करण्यात आला आहे. या सर्व बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व ईव्हीएम मशिन्सची प्रथम सरमिसळ दिनांक 18 ते 21 ऑक्टोबर, 2024 या कालावधीत सर्व जिल्ह्यांकडून करण्यात आलेली आहे. या निवडणुकीत एकूण 185 विधानसभा मतदारसंघात एक बॅलेट युनिटची आवश्यकता आहे. तर १०० मतदारसंघात दोन बॅलेट युनिट आणि तीन मतदारसंघांमध्ये तीन बॅलेट युनिट लागणार आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी निरिक्षक (Observer)

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी 142 सामान्य निरीक्षक (General Observer), 41 पोलीस निरीक्षक (Police Observer) व 71 खर्च निरीक्षक (Expenditure Observer) यांची नियुक्ती केलेली आहे. तसेच विशेष पोलीस निरीक्षक दीपक मिश्रा, भापोसे. (से. नि.), विशेष खर्च निरीक्षक बी. आर. बालकृष्णन, (Ex. IRS) व विशेष सामान्य निरीक्षक मोहन मिश्रा, भाप्रसे (से. नि.) यांची नियुक्ती केलेली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना विभागांतर्गत सरळसेवा भरती सुरू, जाहिरात पाहा

कायदा व सुव्यवस्था अंतर्गत दि. 4 नोव्हेंबरपर्यंतचा तपशील

राज्यातील वितरित केलेले एकूण शस्र परवाने 78,267 इतके असून जमा करण्यात आलेली शस्रास्रे 55,136 एवढी आहेत. जप्त करण्यात आलेली शस्रे 229 तर परवाने रद्द करून जप्त करण्यात आलेली शस्रे 575 आहेत. परवाना जमा करण्यापासून सुट देण्यात आलेली शस्त्रे 10,603  इतकी असून  जप्त करण्यात आलेली अवैध शस्रास्रे 1,294 आहेत. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून 46,630 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

राज्यभर अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या जप्ती

राज्यात दि. 15.10.2024 ते दि. 04.11.2024 या कालावधीत राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या बेकायदा पैसे, दारु, ड्रग्ज व मौल्यवान धातु इ. बाबींच्या एकुण – 252.42 कोटी रुपयांची जप्ती करण्यात आली आहे. यामध्ये रोख रक्कम – 63.47 कोटी तर  34,89,088 लिटर दारु ( 33.73 कोटी रुपये किमतीची) जप्त करण्यात आली. ड्रग्ज 38,24,422 ग्राम (32.67 कोटी रुपये किमतीचे.) मौल्यवान धातू 14,28,983 ग्राम (83.12 कोटी रुपये किमतीचे ), तर फ्रिबीज 34,634 (संख्या) 2.79 कोटी रुपये किमतीचे आणि इतर 8,79,913 (संख्या) 36.62 कोटी रुपये किमतीचे जप्त करण्यात आले आहे.

मतदार यादीत नाव चेक करा

सी व्हिजील ॲप (C-Vigil app) वरील आचारसंहिता भंगाबाबतच्या 2,452 तक्रारी निकाली

दि. 15.10.2024 ते 04.11.2024 या कालावधीत राज्यभरात सी व्हिजील ॲप (C-Vigil app) वर आचारसंहिता भंगाबाबतच्या 2,469 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील 2,452 (99.31%) तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. तसेच आज अखेर एनजीएसपी पोर्टल (NGSP Portal) वरील 7,793 तक्रारीपैकी 5,205 निकाली काढण्यात आलेल्या आहेत.

माध्यम देखरेख व संनियत्रण समिती

राजकीय पक्षामार्फत प्रचार प्रसिध्दीकरिता इलेक्ट्रॉनिक माध्यमांमार्फत दिल्या जाणाऱ्या जाहिरातीचे ऑडियो-व्हिडियो/ संदेश यांचे पूर्व प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरीय माध्यम प्रमाणिकरण समिती गठित करण्यात आली आहे. या समितीकडे जाहिरातीच्या पूर्व प्रमाणीकरण (PRE CERTIFICATION) साठी नोंदणीकृत राजकीय पक्षांकडून प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने 90 प्रमाणपत्राद्वारे 628 जाहिरातींना  मान्यता देण्यात आलेली आहे. 

अ) सन 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी असलेले मतदार व सद्यस्थितीत अद्यावयत मतदार यादीप्रमाणे असलेले मतदार यांचा तुलनात्मक तक्ता खालीलप्रमाणे आहे:-

Maharashtra voter

आदिवासी विकास विभाग अंतर्गत 611 पदांची मोठी भरती, जाहिरात पाहा

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now