राज्यातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्वाचे शासन परिपत्रक निर्गमित

Employees Salaries : राज्यातील अधिकारी आणि कर्मचारी व पेन्शनधारकाचे पेन्शन आणि वेतन दि. ३१ ऑक्टोबर, २०२४ रोजी देय होणाऱ्या माहे ऑक्टोबर, २०२४ च्या वेतन आणि निवृत्तिवेतनाचे प्रदान दि.२५ ऑक्टोबर, २०२४ पूर्वी प्रदान करणेबाबत वित्त विभागाने शासन परिपत्रक निर्गमित केले आहे.

राज्यातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्वाचा शासन निर्णय निर्गमित

Employees Salaries

माहे ऑक्टोबर, २०२४ च्या वेतनाचे आणि निवृत्तिवेतनाचे प्रदान दि.२५ ऑक्टोबर, २०२४ पूर्वी होण्यासाठी सर्व संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी वेतन देयके आणि निवृत्तिवेतन देयके त्वरीत यथास्थिती अधिदान व लेखा कार्यालय, मुंबईः संबंधित जिल्हा कोषागार कार्यालय, उप कोषागार कार्यालय येथे सादर करावीत. असे शासन परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

सदर निर्णय जिल्हा परिषद, मान्यताप्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषि विद्यापीठे, अकृषि विद्यापीठे व त्याच्या संलग्न अशासकीय महाविद्यालये यांचे अधिकारी / कर्मचारी, तसेच निवृत्तिवेतनधारक यांना देखील लागू होईल.

राज्यातील कर्मचाऱ्यांना 'या' दिवशी भरपगारी सुट्टी जाहीर, शासन परिपत्रक

अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचाऱ्यांना ‘इतकी’ मिळणार (भाऊबीज भेट) येथे पाहा

माहे ऑक्टोबर, २०२४ च्या वेतनाचे आणि निवृत्तिवेतनाचे प्रदान दि.२५ ऑक्टोबर, २०२४ पूर्वी होण्यासाठी संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई तसेच सर्व जिल्हा कोषागार कार्यालये व उप कोषागार कार्यालये यांना आवश्यक त्या सूचना तात्काळ निर्गमित कराव्यात.

वित्त विभागाच्या अधिनस्त संचालनालय लेखा व कोषागारे याचेद्वारे प्रशासित करण्यात येत असलेल्या ट्रेझरीनेट, बीम्स, बील पोर्टल, सेवार्थ, ग्रास, निवृत्तिवेतनवाहिनी, कोषवाहिनी, अर्थवाहिनी, महाकोष, वेतनिका, IPLA, VPDAS, इत्यादी संगणक प्रणालीच्या संदर्भात मे. टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड यांचे मार्फत करण्यात येत असलेले Data Managed Hosting चे कामकाज महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ, मुंबई यांचेकडे हस्तांतरीत करण्याची कार्यवाही (Migration) सद्यस्थितीत सुरु आहे.

राज्यातील या कर्मचाऱ्यांना सण अग्रिम मंजूर, आदेश पाहा

संचालनालय, लेखा व कोषागारे याचेद्वारे प्रशासित करण्यात येत असलेल्या सर्व संगणक प्रणालीच्या संदर्भात में, टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड याचेकडील Data Managed Hosting चे कामकाज महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ, मुंबई यांचेकडे हस्तांतरीत करण्याच्या कामकाजाच्या पार्श्वभूमीवर दि. ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी देय ठरणारे माहे ऑक्टोबर, २०२४ चे वेतन आणि निवृत्तिवेतन दि. २५ ऑक्टोबर, २०२४ पूर्वी अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

शासन परिपत्रक पाहा

अंगणवाडी मुख्यसेविका पदासाठी मोठी भरती ऑनलाईन अर्ज मूळ जाहिरात डायरेक्ट लिंक

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांची मोठी भरती

आदिवासी विकास विभाग अंतर्गत 611 पदांची मोठी सरळसेवा भरती

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना विभागांतर्गत सरळसेवा भरती सुरू, जाहिरात पाहा

ICDS अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती सुरू, जाहिरात, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक

समाज कल्याण विभागात मोठी भरती, जाहिरात पाहा

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now