Election Allowance GR : कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या निवडणूक भत्त्याबाबत, सुधारित शासन निर्णय

Election Allowance GR : लोकसभा तसेच विधानसभेच्या सार्वत्रिक/पोट निवडणुकीच्या वेळी मतदान / मतमोजणी कामासाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना तसेच कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या निवडणूक भत्त्याबाबत सुधारणा करण्यात आली असून, याबाबतचा सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.

कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या निवडणूक भत्त्याबाबत, सुधारित शासन निर्णय

Election Allowance GR

भारत निवडणूक आयोगाने त्यांचे पत्र दिनांक ०६.०६.२०२३ व दिनांक १७.११.२०२३ अन्वये निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त करावयाच्या कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या निवडणूक भत्त्याच्या दरामध्ये व काही बाबीमध्ये सुधारणा करण्याबाबत निर्देश दिले आहेत. 

भारत निवडणूक आयोगाच्या सदर पत्रातील सूचनांना अनुसरुन राज्यातील लोकसभा/विधानसभा निवडणुकांच्या कर्तव्यार्थ नियुक्त करण्यात येणाऱ्या निवडणूक कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या निवडणूक भत्त्याच्या अनुषंगाने सुधारणा करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्यातील लोकसभा / विधानसभा सार्वत्रिक/पोट निवडणुकांच्या मतदान / मतमोजणी कर्तव्यार्थ नियुक्त करण्यात येणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांना पुढीलप्रमाणे निवडणूक भत्ता मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Election Allowance GR

  1. मतदान केंद्र / मतमोजणी केंद्रावर प्रत्यक्ष तैनात करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनाही वरील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे भत्त्याचे दर लागू राहतील.
  2. प्रशिक्षणासाठी उपस्थित राहणाऱ्या, मतदानाचे साहित्य ताब्यात घेणाऱ्या तसेच मतदान व मतमोजणीच्या दिवशी प्रत्यक्ष मतदान / मतमोजणी कर्तव्यार्थ उपस्थित राहणाऱ्या कार्यरत व राखीव अधिकारी / कर्मचारी यांना वरील तक्त्यात नमूद केलेल्या दराप्रमाणे निवडणूक भत्ता अनुज्ञेय राहील.
  3. हा निवडणूक भत्ता सार्वत्रिक तसेच पोट निवडणुकांसाठी दिला जाईल.
  4. दूर्गम प्रदेशातील (difficult terrain) मतदान केंद्रांवर संबंधित मतदान पथकास (Polling official) ३ किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवस आगोदर निघावे लागते, त्या मतदान पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना सामान्य दरा पेक्षा दुप्पट दराने निवडणूक भत्ता अनुज्ञेय राहील.
  5. निवडणूक भत्त्या व्यतिरिक्त, सर्व मतदान केंद्रांवर / मतमोजणी केंद्रांवर निवडणूक संबंधित कामासाठी तैनात मतदान कर्मचाऱ्यांसह पोलिस कर्मचारी, मोबाईल पार्टीमधील कर्मचारी, होमगार्ड, वनरक्षक ग्राम रक्षक दल, NCC कैडेट्स, माजी सैनिक, स्वयंसेवक इत्यादींसाठी पॅक केलेले दुपारचे जेवण आणि/किंवा हलका अल्पोहार प्रदान केला जाईल.
  6. उपरोक्त पध्दतीनुसार मतदान कर्मचारी / पोलीस कर्मचारी आणि निवडणूक कामासाठी नियुक्त केलेले इतर अधिकारी / कर्मचारी याना TA/DA ची अदागयी करण्यासंदर्भात प्रकरणपरत्वे मूळ विभाग अथवा निवडणूक विभाग यांच्याकडून कार्यवाही करण्यात यावी.
  7. अधिकारी / कर्मचारी यांना प्रवास भत्ता / दैनिक भत्ता (TA/DA) देताना तो त्या-त्या वेळी अनुज्ञेय असलेल्या दराने देय होईल.

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचा वाढीव मोबदला मंजूर, शासन निर्णय

राज्यातील सर्व प्रकारच्या शाळासंदर्भात, शालेय शिक्षण विभागाचे नवे निर्देश जारी

NMMS शिष्यवृत्ती योजनेची सविस्तर माहिती - ऑनलाईन नोंदणी डायरेक्ट लिंक

आदिवासी विकास विभाग अंतर्गत 611 पदांची मोठी भरती, जाहिरात पाहा

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना विभागांतर्गत सरळसेवा भरती सुरू, जाहिरात पाहा

ICDS अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती सुरू, जाहिरात, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक

अंगणवाडी मुख्यसेविका पदासाठी मोठी भरती ऑनलाईन अर्ज मूळ जाहिरात डायरेक्ट लिंक

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now