जागतिक कर्णबधिर दिन | World Day of the Deaf

जागतिक कर्णबधिर  दिन हा दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी साजरा करण्यात येतो. कर्णबधिर  व्यक्तीचे जीवनमान उंचावण्यासाठी, समाजामध्ये जागृती निर्माण व्हावी, कर्णबधिर  व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा, कर्णबधिर  व्यक्तीच्या हक्काचे जतन व्हावे, समाजामध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने जागतिक कर्णबधिर दिन हा सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी साजरा केला जातो.

Jagtik karnbadhir dinकर्णबधिर  व्यक्तीच्या संदर्भात वेगवेगळ्या संज्ञा वापरल्या जातात, त्यामध्ये कर्णबधिर, मूकबधिर, सांकेतिक भाषा, कर्णबधिर जागरूकता सप्ताह, जागतिक कर्णबधिर दिन, जागतिक सांकेतिक भाषा दिन अशा विविध संज्ञा कर्णबधिर व्यक्तीच्या संबंधित वापरण्यात येतात.

कर्णदोष, कर्णबधिर , मूकबधिर,  मुका,  बहिरा, डेफ  हे सर्व शब्द जवळपास एकच अर्थ दर्शवितात. तो म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऐकायला न येणे किंवा बोलता न येणे ऐकणे आणि बोलणे या संबंधित असणारी समस्या साधारणपणे कर्णबधिर या दिव्यांग प्रकारामध्ये त्याचे निदान होते. आणि त्यानुसार त्या व्यक्तीला उपचार करता येतात. आणि कर्णबधिर प्रवर्गाचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येतो.

सप्टेंबर महिना हा कर्णबधिर व्यक्तींच्या जागरूकतेचा महिना म्हणून जगभरामध्ये ओळखला जातो. सप्टेंबर महिन्यामध्ये कर्णबधिर व्यक्तींसाठी जागतिक कर्णबधिर दिन, जागतिक कर्णबधिर जागरूकता सप्ताह, जागतिक सांकेतिक भाषा दिन साजरे करण्यात येते. यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करून समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याचे कार्य केले जाते.

 जागतिक कर्णबधिर दिन | World Day of the Deaf


जागतिक कर्णबधिर दिन हा सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी साजरा करण्यात येतो. यावर्षी जागतिक कर्णबधीर दिन २५ सप्टेंबर २०२२ रोजी साजरा करण्यात येईल. जागतिक कर्णबधिर जागरूकता सप्ताह हा यंदा 19 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2022 या कालावधीत साजरा करण्यात येत आहे.

'सांकेतिक भाषा' ही कर्णबधिरांची प्रथम भाषा म्हणून ओळखली जाते कर्णबधिर व्यक्तींना ऐकायला न येणे किंवा बोलता न येणे यामुळे या व्यक्तींचे संभाषण हे सांकेतिक भाषेद्वारे होते. 


सांकेतिक भाषेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी सांकेतिक भाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 

जागतिक सांकेतिक भाषा दिवस हा 23 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो.

संयुक्त राष्ट्र संघटनेने २३ सप्टेंबर हा दिवस "जागतिक सांकेतिक भाषा दिन" म्हणून घोषित केला आहे. तसेच सांकेतिक भाषेच्या महत्त्वाबाबत जागरुकता निर्माण होण्याच्या दृष्टीने "वर्ल्ड फेडरेशन ऑफ डेफ"  World Federation of the Deaf (WFD) यांनी या वर्षासाठीच्या जागतिक सांकेतिक भाषा दिनासाठी  “Sign Language unite us.” असे बोधवाक्य सुचवले आहे. 

अशा पद्धतीने कर्णबधिर व्यक्तीचे जीवनमान उंचावण्यासाठी, समाजामध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने कर्णबधिर  व्यक्तींचे कार्य सर्वांसमोर यावे त्यांच्या हक्काचे संरक्षण व्हावे या उद्देशाने सप्टेंबर महिन्यामध्ये विविध दिन, सप्ताहाच्या निमित्ताने कार्यक्रम साजरे करण्यात येते.

जागतिक कर्णबधिर दिन विषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न 


प्रश्न - जागतिक कर्णबधिर दिन कधी साजरा केला जातो? | World Day of the Deaf ?


उत्तर- जागतिक कर्णबधिर दिन हा दरवर्षी सप्टेंबर महिन्याचा शेवटचा रविवार हा दिवस जागतिक कर्णबधिर दिन म्हणून साजरा केला जातो.

प्रश्न - जागतिक कर्णबधिर दिवस 2022 | world deaf day 2022


उत्तर - 2022 मध्ये जागतिक कर्णबधिर दिन हा 25 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येईल.

 प्रश्न - जागतिक कर्णबधिर दिन केव्हापासून साजरा केला जातो?

उत्तर - जागतिक कर्णबधिर दिनाची सुरुवात (वर्ड फेडरेशन ऑफ द डे) जागतिक कर्णबधिर महासंघाने 1958 पासून सुरुवात केली.

प्रश्न - पहिला आंतरराष्ट्रीय कर्णबधिर दिवस कधी साजरा करण्यात आला? | When was the first International Day of the Deaf?

उत्तर - पहिला आंतरराष्ट्रीय कर्णबधिर दिवस 1958 मध्ये साजरा करण्यात आला.

>> जागतिक कर्णबधीर सांकेतिक भाषा दिवस 2022 | international day of sign languages 2022 

>>  जागतिक कर्णबधिर महासंघ | यांच्या कार्याविषयी सविस्तर वाचा

हे सुद्धा वाचा

>> कर्णबधीर व्यक्तीचे प्रमाणपत्र कसे काढावे? | UDID Card Hearing Impairment

>> समावेशित शिक्षणामध्ये कर्णबधीर मुलांचे शिक्षण 

>> दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६ नुसार कर्णबधीर व्यक्तीची व्याख्या (दिव्यांग २१ प्रकार)

>> अपंग प्रमाणपत्र ऑनलाईन नोंदणी कशी करावी?

>> स्वावलंबन कार्डचे (UDID) फायदे 

>> २१ प्रकारातील दिव्यांग (अपंगा) विषयी वाचा सविस्तर

>> समावेशित शिक्षण संकल्पना 

Previous Post Next Post