जागतिक कर्णबधिर महासंघ | World Federation of the Deaf (WFD)

वर्ड फेडरेशन ऑफ द डेफ (WFD) हा महासंघ  कर्णबधीर व्यक्तींच्यासाठी कार्य करणारा जागतिक स्तरावरचा महासंघ आहे.

जागतिक कर्णबधिर महासंघाची (World Federation of the Deaf) स्थापना ही 23 सप्टेंबर 1951 (23 September 1951, Rome, Italy) रोजी इटली मधील रोम या शहरात झाली.


World Federation of the Deaf

जागतिक  कर्णबधीर महासंघ (World Federation of the Deaf) महासंघ कर्णबधिरांच्या सर्वांगीण विकासासठी अविरतपणे आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करत आहे. जगातील कर्णबधिर लोकांच्या मानवी हक्कांचे संरक्षण (deaf people’s human rights worldwide) करणारे World Federation of the Deaf (WFD) यांचे काम सुरु आहे. 

135 देशांमध्ये या महासंघाचे जाळे पसरले असून, त्यामध्ये आशिया खंडातील भारतात ‘अलीयावर जंग राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्था मुंबई’ हे प्रमुख केंद्र आहे.

जगातील  कर्णबधीर मानवी हक्कांचे जतन करत कर्णबधिरांसाठी सांकेतिक भाषेचा विकास करणे आणि त्या माध्यमातून जगातील कर्णबधीर लोकांना एकत्र करण्याचे महत्त्वाचे कार्य World Federation of the Deaf (WFD) कडून केले जात आहे.

जगातील कर्णबधिरांसाठी वापरण्यात येत असलेल्या सांकेतिक भाषेत (Sign Languages) मध्ये सुधारणा करणे, त्यांना अधिकाधिक उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, माहिती आणि सेवा पुरवणे, कर्णबधिरांच्या अधिकारांमध्ये सुधारणा करणे, त्यासाठी संस्थांची स्थापना करणे आदी कार्य या महासंघातर्फे सुरू आहेत. 

त्यासोबतच जगभरातील कर्णबधिरांसाठी समता आणि मानवी अधिकार मिळवून देणे,  त्यांची कार्य, त्यांचे सांस्कृतिक योगदान जगाच्या समोर आणणे आणि या लोकांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे यासाठी जागतिक कर्णबधिर महासंघाचे World Federation of the Deaf (WFD) कार्य चालते.

>> जागतिक कर्णबधीर सांकेतिक भाषा दिवस 2022 | international day of sign languages 2022 

>>  जागतिक कर्णबधिर दिन | World Day of the Deaf

हे सुद्धा वाचा

>> कर्णबधीर व्यक्तीचे प्रमाणपत्र कसे काढावे? | UDID Card Hearing Impairment

>> समावेशित शिक्षणामध्ये कर्णबधीर मुलांचे शिक्षण 

>> दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६ नुसार कर्णबधीर व्यक्तीची व्याख्या (दिव्यांग २१ प्रकार)

>> अपंग प्रमाणपत्र ऑनलाईन नोंदणी कशी करावी?

>> स्वावलंबन कार्डचे (UDID) फायदे 

>> २१ प्रकारातील दिव्यांग (अपंगा) विषयी वाचा सविस्तर

>> समावेशित शिक्षण संकल्पना 

Previous Post Next Post