शाळा विकास आराखडा 2022-23 | Shala Vikas Arakhada 2022-23

शाळा विकास आराखडा हा शाळेचा आत्मा आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षाचे नियोजन या शाळा विकास आराखडा मध्ये करण्यात येते. शाळा विकास आराखडा हा शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती सोबत एकत्रित रित्या समन्वयाने शाळेच्या गुणवत्तेसाठी शाळा विकास आराखडा तयार करणे आवश्यक असते. शाळा विकास आराखडा तयार करताना प्रामुख्याने शाळा सुविधा, विद्यार्थी गुणवत्ता, समता आणि लोकसहभाग या प्रमुख चार घटकावर आधारित शाळा विकास आराखडा तयार केला जातो.

{tocify} $title={Table of Contents}

शाळा विकास आराखडा 2022-23 | Shala Vikas Arakhada 2022-23

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 (RTE Act 2009) मधील कलम 22 (1) नुसार शाळेचे मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती यांनी मिळुन शाळा विकास आराखडा तयार करण्यात येतो.

शाळा विकास आराखडा PDF
school development plan


शाळा विकास आराखडा म्हणजे काय

शाळा विकास आराखडा हा शाळा सुविधा, समता, गुणवत्ता आणि लोकसहभाग या प्रमुख चार घटकावर अवलंबून असून, त्याद्वारे शाळा व्यवस्थापन समिती यांच्या समन्वयाने विद्यार्थ्यांच्या दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी तयार केलेला कृती आराखडा असतो. व यासाठी आवश्यक सुविधा या वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक निर्मिती करण्यासाठी शाळा विकास आराखडा तयार केला जातो. शालेय गुणवत्ता विकासासाठी शाळेचा शालेय विकास आराखडा तयार करण्यात येतो. यास शाळा विकास आराखडा असे म्हणतात.

शाळा विकास आराखडा तयार करण्याचा उद्देश 

शाळा विकास आराखडा हा शाळेचा तयार झाल्यानंतर समूह साधन केंद्र , गटसाधन केंद्र  (गट/मनपा) व जिल्हा आणि त्यांनतर राज्य यांचा एकत्रित समूह आराखडा हा वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक (बजेट) निर्मिती करण्यासाठी आवश्यक असतो. त्यानुसार पुढील शैक्षणिक वर्षातील अंदाजपत्रक तयार करण्यास व विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी देण्यासाठीचा कृती कार्यक्रम तयार करून मुलांच्या गरजांचा विचार करून सदर आराखडा तयार केलेला असतो. यासाठी शाळा विकास आराखडा तयार करणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे.

शाळा विकास आराखडा तयार करताना विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा

परिवहन सुविधा 

अपवादात्मक परिस्थितीमध्ये दुर्गम भागातील आणि शहरी वंचित बालकांसाठी ही सुविधा निकषानुसार अनुज्ञेय आहे.

विशेष गरजा असणाऱ्या बालकांसाठी अनुज्ञेय शैक्षणिक सुविधा 

विशेष गरजा असणारी बालके म्हणजे कोणती बालके येथे वाचा 

प्रवास भत्ता

स्थानिक शाळेत समकक्ष वर्ग उपलब्ध नसल्यास किंवा निमशहरी व शहरी भागात शाळेचे अंतर अधिक असल्यास सुरक्षित व नियमितपणे शाळेत ये-जा करण्यासाठी प्रत्यक्ष प्रवास भत्ता

अध्ययनासाठी मध्यवर्ती शाळेत/समूह साधन केंद्रामध्ये / डे-केअर सेंटर मध्ये शाळापूर्व कार्यक्रमामध्ये तसेच विविध थेरपीची आवश्यकता असणाऱ्या विद्यार्थ्यांना थेरपी केंद्रामध्ये ये-जा करण्यासाठी प्रत्यक्ष प्रवास खर्च

मदतनीस भत्ता

शस्त्रक्रिया झालेल्या व थेरपीची गरज असलेल्या (शरीराच्या खालच्या दोन्ही अंगामुळे या दृष्टीदोषामुळे हलन चलनास समस्या असलेल्या मुलांना नियमित शाळेत ये-जा करण्यासाठी तसेच अध्ययनासाठी मध्यवर्ती शाळेत / समूह साधन केंद्रामध्ये / डे-केअर सेंटर मध्ये शाळापूर्व कार्यक्रमामध्ये तसेच विविध थेरपीची आवश्यकता असणाऱ्या विद्याथ्र्यांना थेरपी केंद्रामध्ये प्रोत्साहनात्मक मदतनीस भत्ता.

शैक्षणिक अध्ययन साहित्य भत्ता

मतिमंद, बहुविकलांग, सेरेब्रल पाल्सी व अंध प्रवर्गातील  - विशेष गरजा असणान्या विद्यार्थ्यांना नियमित शालेय प्रवाहात दाखल झाल्यास दैनंदिन अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शैक्षणिक अध्ययन साहित्य भत्ता (लेखनिक, वाचकनिस)

वसतिगृह भत्ता 

शेजारशाळा निकषाप्रमाणे शाळा उपलब्ध नसल्यास व नियमित शालेय प्रवाहात दाखल झाल्यानंतर वसतिगृहामध्ये राहून शिक्षण घेत असल्यास वसतिगृह भत्ता 

वाचक भत्ता

अंधत्वाचे प्रमाण 75 ते 100 टक्केपर्यंत असलेल्या विद्यार्थ्यांना वाचक भत्ता

लेखनिक भत्ता. 

दृष्टीदोष अध्ययन अक्षम व स्नायूंच्या दोषामुळे गंभीर लेखन समस्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यकतेप्रमाणे लेखनिक सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी लेखनिक भत्ता. 

साहित्य साधने

वैद्यकीय व पुनर्वसन केलेल्या कार्यात्मक मूल्यमापनानुसार शिफारस केलेली आवश्यक साहित्य साधने. उदा. श्रवणयंत्र, लोव्हिजन साहित्य, चष्मे, भिंग, अंघ काठी, ब्रेलकिट बेलबुक, पाठ्यपुस्तकावर आधारीत ऑडियो सिडी व्हिलचेअर, तीन चाकी सायकल कुबडी रोलेटर वॉकर, कैलीपर, स्प्लिट, गॉडीफाईड वेअर इ. 

स्वयंसेवक काळजीवाहक सुविधा

गृह मार्गदर्शनातून शाळेत येणाऱ्या बालकांसाठी ब्रेल रेडीनेस कार्यक्रमासाठी थेरपी सेंटरमध्ये काळजी घेण्यासाठी, अध्ययनासाठी मध्यवर्ती शाळेत स्कूल रेडीनेस कार्यक्रम व डे-केअर सेंटरमध्ये अतितीव्र व तीव्र स्वरूपाचे अपंगत्व असणाऱ्या बालकांची वैयक्तिक काळजी घेण्यासाठी व प्रशिक्षणासाठी स्वयंसेवक काळजीवाहक सुविधा. 

तक्रार निवारण (हक्कांचे सरंक्षण)

बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील कलम 32 अन्वये बालकांच्या हक्कांशी संबंधित तक्रार व गान्हाणे स्थानिक प्राधिकरणाकडे मांडावयाची तरतूद आहे.

उपरोक्त प्रमाणे अधिनियमाच्या अधिन व 21 एप्रिल, 2014 च्या शासन निर्णयाप्रमाणे तालुका / जिल्हा / महानगरपालिका प्रभाग स्तर या विविध स्तरांवर तक्रार निवारण समित्यांचे गठण करणे आवश्यक आहे. 

विशेष प्रशिक्षण

E1 आणि E2 मधील मुलांचा समावेश विशेष प्रशिक्षणासाठी झाला असल्याची खातरजमा करण्यात यावी. (E1 आणि E2 म्हणजे काय? पुढे वाचा)

स्वच्छतागृहाचे निकष 

मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असावे.

120 विद्यार्थीसंख्येपर्यंत 1 युनिट ( 1 शौचालय व 3 मुतारी)

 • उदाहरण 1 - शाळेत 120 विद्याथ्यांपैकी 80 मुले व 40 मुली असले तरीही स्वतंत्रपणे मुलांसाठी व मुलींसाठी प्रत्येकी एक युनिट असावेत. 
 • उदाहरण 2 - शाळेत 210 विद्यार्थ्यांपैकी 80 मुले व 130 मुली असले तरीही स्वतंत्रपणे मुलांसाठी 1 युनिट व मुलींसाठी 2 युनिट असावेत.

शाळा विकास आराखडा मधील महत्वाच्या संज्ञा संकल्पना अर्थ

विशेष गरजा असणारी बालके 

समता - Equity

 • E1 - कधीही शाळेत दाखल न झालेली बालके (शाळाबाह्य)
 • E2 - शाळेत दाखल परंतु एक महिना (सतत ३० दिवस गैरहजर) किंवा अधिक कालावधीसाठी अनुपस्थित असणारे बालके 

शहरी / ग्रामीण भागातील कठीण परिस्थितीतील बालके

शाळेत दाखल परंतु कठीण परिस्थितीतील बालके 
 • S1 - बालकामगार
 • S2 - अनाथ / बेघर / पालक संरक्षण विरहीत
 • S3 - प्लॅटफॉर्मवर वास्तव्यास असलेली S4 भीक मागणारी / भंगार / कचरा गोळा करणारी
 • S5 - सेक्स वर्करचे मूल
 • S6 - बालसुधार गृहातील (रिमांड होम) बालके
 • S7 - विशेष गरजा असणारी बालके 
 • S8 - इतर

स्थलांतरित बालके (Migratory children) 

ज्यांचे पालक दरवर्षी उदरनिर्वाहासाठी हंगामी स्वरूपात (एक महिन्यापेक्षा अधिकच्या कालावधीसाठी) कुटूंबासह स्थलांतर करतात. अशा स्थलांतर होऊन जाणाऱ्या व येणाऱ्या विद्यार्थ्यांचा तपशिल
 • M1 - स्थलांतरामुळे शाळेत उपस्थित राहू न शकणारे विद्यार्थी 
 • M2 - अन्य वस्तीतून शाळा परिसरात स्थलांतर होऊन येणारे विद्यार्थी 

गुणवत्ता (Quality)

संपादणूकीचे स्तर (अध्ययन स्तर)
 • Q-1 - दाखल वर्गासाठी निश्चित अध्ययन क्षमतापेक्षा अधिक क्षमता प्राप्त असलेले
 • Q-2 - दाखल वर्गासाठी निश्चित अध्ययन क्षमता प्राप्त असलेले
 • Q-3 - दाखल वर्गासाठी निश्चित अध्ययन क्षमता प्राप्त नसलेले
 • Q-4 - पायाभूत अध्ययन क्षमता प्राप्त नसलेले

शाळा विकास आराखडा PDF  २०२२-२३

शाळा विकास आराखडा PDF  २०२२-२३ येथे डाउनलोड करा हे सुद्धा वाचा
नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

                                                          


Previous Post Next Post