CTET Application Form 2023 : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी नोंदणी सुरु, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 'या' स्टेप करा फॉलो

CTET Application Form 2023 : शिक्षक भरती ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी अशी आहे की, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा Central Teacher Eligibility Test (CTET) July 2023 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाद्वारे (Central Board of Secondary Education) करण्यात आली असून, CTET Application Form 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना आवाहन करण्यात आले आहे. 

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी नोंदणी सुरु - CTET  Notification 2023

CTET Application Form 2023

केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी (CTET) परीक्षा 2023 संदर्भात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे प्रसिद्ध पत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार संगणक आधारित चाचणी (Computer Based Test) ऑनलाइन पद्धतीने जुलै 2023 ते ऑगस्ट 2023 दरम्यान घेतली जाणार आहे. यासाठी 27 एप्रिल पासून CTET Application Form 2023 साठी अर्ज करता येणार आहे. तर अर्ज करण्याची अंतिम मुदत (CTET Application Form 2023 Last Date) ही 27 मे 2023 आहे.

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी येथे करा अर्ज - CTET Application Form Official Website

केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणीसाठी ऑनलाईन अर्ज CTET Official Website - https://ctet.nic.in/ या अधिकृत वेबसाईटवर भरणे आवश्यक आहे. CTET Application Form 2023 करिता Last Date 27 मे 2023 आहे.

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज असा भरा

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना तीन स्टेप मधून अर्ज भरावा लागतो, त्यामध्ये 

  1. Apply for Online Registration
  2. Fill Online Application Form
  3. Pay Examination Fee

यामध्ये सर्वप्रथम CTET परीक्षेसाठीच्या मार्गदर्शक सूचना व्यवस्थितपणे वाचून समजून घ्याव्यात.

  • त्यानंतर स्टेप एक मध्ये Online Registration करावे, 
  • त्यानंतर Personal Details , Contact Details, Permanent Address, Choose Password, Security Pin सेक्शन मधील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरावी.
  • त्यानंतर तुम्हाला CTET साठी नोंदणी केलेला Registration Number आणि तुम्ही तयार केलेला पासवर्ड मोबाईल क्रमांकावर किंवा ईमेल आयडी अथवा स्क्रीन वर दिसेल ते लिहून घ्यावे.
  • त्यांनतर CTET लॉगीन पेज वर जाऊन Only Registered Candidates Sign In याठिकाणी लॉगीन करावे.
  • स्टेप दोन मध्ये Fill Online Application Form मधील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरावी.
  • स्टेप तीन मध्ये भरलेला संपूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री करावी आणि शेवटी Pay Examination Fee भरून अर्ज सबमिट करावा.

केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी (CTET) जुलै 2023 साठी ऑनलाईन अर्ज शुल्क पुढीलप्रमाणे आहे.

  • General / OBC करिता पेपर 1 साठी 1000 रुपये व पेपर 1 व 2 साठी 1200 रुपये
  • SC / ST दिव्यांग - करिता पेपर 1 साठी 500 रुपये व पेपर 1 व 2 साठी 600 रुपये

हे सुद्धा पहा

नवनविन अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

    

Previous Post Next Post