Maharashtra Education : चर्चेला पूर्णविराम ! 'डीएड' कॉलेज यंदाही सुरूच राहणार, नव्या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया सुरु..

Maharashtra Ded Course (NEP) News : नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार असल्याची माहिती नुकतीच शालेय शिक्षण मंत्री यांनी दिली, बऱ्याच दिवसापासून राज्यातील डीएड कॉलेज पूर्णत: बंद होणार असल्याची चर्चा केली जात होती, मात्र या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला असून, यंदा राज्यातील डीएड कॉलेज सुरू राहणार असून, पूर्वीचे डीएड आताचे डी.एल.एड शैक्षणिक वर्ष २०२३ २४ च्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे, सविस्तर बातमी पाहूया.. 

चर्चेला पूर्णविराम ! 'डीएड' कॉलेज यंदाही सुरूच राहणार

Maharashtra Ded Course (NEP) News

नवीन शैक्षणिक धोरण (New Education Policy) राज्यात शैक्षणिक वर्ष 2023 24 पासून  (NEP 2020) ची अंमलबजावणी सुरू होणार असल्याची माहिती नुकतीच शालेय शिक्षणमंत्री यांनी दिली.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (New Education Policy) अनेक महत्वपूर्ण बदल केले जाणार असून त्यामध्ये  5+3+3+4  अशी नविन संरचना असणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील पहिली पाच वर्ष यामध्ये पूर्वप्राथमिक, आणि पहिली व दुसरी इयत्तेचा समावेश असणार आहे.

पुढील तीन वर्षांत तिसरी ते पाचवी आणि त्यापुढील सहावी ते आठवी चा शैक्षणिक स्तर असणार आहे.
शेवटची चार वर्ष ही नववी ते बारावी अशा पद्धतीने शालेय शिक्षणाचे एकूण चार स्तरात विभागणी असणार आहे. सविस्तर येथे वाचा

शिक्षक होण्यासाठी डीएड किंवा बीएड करणे आवश्यक आहे. यासाठी नवीन शैक्षणिक धोरणातील शिफारशी नुसार राज्यातील डीएड कॉलेज बंद होणार याबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या पाहायला मिळत होत्या. मात्र आता यावर पूर्णविराम मिळाला असून, यंदातरी डीएड कॉलेज सुरु राहणार आहे. [शिक्षक होण्यासाठी आगामी काळात 'हे' बदल होणार.. येथे वाचा..]

जुनी पेन्शन योजना संदर्भात दोन महत्वाचे निर्णय येथे पहा

नव्या शैक्षणिक वर्षातील डीएड (डी.एल.एड) प्रवेश प्रक्रिया सुरु

प्राथमिक शिक्षण पदविका पूर्वीचा डीएड आणि आताचा डी.एल.एड हा दोन वर्षाचा पूर्ण वेळ अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाचे प्रवेश राज्यस्तरीय केंद्रीय पद्धतीने केले जातात. 

डी.एल.एड प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष सन २०२३ २४ करिता अध्यापक विद्यालयांची ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करणेबाबत शासनाने परिपत्रक काढले असून, अध्यापक विद्यालयांची ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करणेबाबतची Link 30 मे 2023  ते 5 जून 2023 पर्यंत सुरु राहणार आहे.

त्यांनतर शैक्षणिक वर्ष सन 2023 24 च्या डी.एल.एड प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. त्यामुळे आता डीएड कॉलेज यावर्षी सुरु राहणार असल्याचे निश्चित झाले आहे.

नवीन शैक्षणिक वर्षापासून 'एक राज्य एक गणवेश योजना' येथे पहा
आरटीईच्या 30 हजार 621 जागा रिक्त - जिल्हानिहाय येथे पहा

नवनविन अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

 

Previous Post Next Post