तरुणांसाठी आनंदाची बातमी ! पाचवी वी ते पदवीधारक व आयटीआय तरुणांना राेजगाराच्या विविध संधी, रोजगार मेळाव्याचे आयोजन, येथे करा नोंदणी..

Maharashtra Rojgar Melava : महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कौशल्य भारत मिशन अंतर्गत संपूर्ण देशातील तरुणांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, यामध्ये पाचवी ते पदवीधारक व आयटीआय तरुणांना सहभागी होता येणार आहे, जास्तीत जास्त तरुणांनी या रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. 

प्रधानमंत्री राष्ट्रीय रोजगार उमेदवारी  मेळाव्याचे आयोजन

Maharashtra Rojgar Melava

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कौशल्य भारत मिशन अंतर्गत देशातील तरुणांसाठी भविष्यातील संधींना चालना देण्याच्या संकल्पनेचा एक भाग म्हणून, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (MSDE) 8 मे 2023 रोजी देशभरातील 200 हून अधिक जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय रोजगार उमेदवारी मेळावा (PMNAM) आयोजित करणार आहे.

स्थानिक तरुणांना संबंधित शिकाऊ प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अनेक स्थानिक व्यवसाय आणि संस्थांना या रोजगार उमेदवारी मेळ्याचा भाग होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. 

या कार्यक्रमात विविध क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक कंपन्यांचा सहभाग पाहायला मिळेल. एका व्यासपीठाद्वारे, सहभागी संस्था संभाव्य शिकाऊ उमेदवारांशी संपर्क साधू शकतात, त्यांच्या पात्रतेनुसार जागेवरच प्रशिक्षणार्थींची निवड करू शकतात, तसेच तरुणांच्या उपजीविकेच्या संधींना बळकट करू शकतात.

पाचवी ते पदवीधारक व आयटीआय तरुणांना राेजगाराची संधी

इयत्ता 5 वी ते इयत्ता 12 वी उत्तीर्ण किंवा कौशल्य रोजगार उमेदवारी प्रमाणपत्र असलेले किंवा आयटीआय प्रमाणपत्रधारक किंवा पदविकाधारक किंवा पदवीधर असलेले उमेदवार या प्रशिक्षणार्थी मेळ्यात अर्ज करू शकतात. Maharashtra Rojgar Melava 

उमेदवारांनी त्यांच्या स्वयंपरिचय माहितीच्या तीन प्रती, सर्व गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रांच्या तीन प्रती, छायाचित्र असलेले ओळखपत्र (आधार कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स इ.) आणि तीन पासपोर्ट आकाराचे फोटो संबंधित ठिकाणी सोबत आणणे आवश्यक आहे. 

रोजगार मेळाव्यासाठी आवश्यक कागदपत्रे

उमेदवारांनी त्यांच्या स्वयंपरिचय माहितीच्या तीन प्रती, सर्व गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रांच्या तीन प्रती, छायाचित्र असलेले ओळखपत्र (आधार कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स इ.) आणि तीन पासपोर्ट आकाराचे फोटो संबंधित ठिकाणी सोबत आणणे आवश्यक आहे. 

दरवर्षी 15 लाख तरुणांना रोजगाराच्या विविध संधी

प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी देशभरात हे रोजगार उमेदवारी मेळे आयोजित केले जातात. या मेळ्यांमध्ये, निवडक व्यक्तींना प्रशिक्षणार्थी संधी दिली जाते आणि रोजगार उमेदवारी दरम्यान त्यांना नवीन कौशल्ये आत्मसात करण्यासाठी सरकारी निकषांनुसार मासिक मानधन मिळते. रोजगार उमेदवारी हे कौशल्य विकासाचे सर्वात टिकाऊ मॉडेल मानले जाते आणि स्किल इंडिया मिशन अंतर्गत याला मोठी चालना मिळत आहे.

सरकार दर वर्षी 15 लाख तरुणांना प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणाद्वारे प्रशिक्षित करण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि हे ध्येय पूर्ण करण्यासाठी आस्थापना आणि तरुणांचा सहभाग वाढवणारा प्रधानमंत्री राष्ट्रीय रोजगार उमेदवारी मेळा (PMNAM) हा उपक्रम राबविला जात आहे. हा उपक्रम सहभागी कंपन्यांमध्ये अस्तित्वात असलेल्या विविध संधींबद्दल तरुणांमध्ये जागरूकता देखील वाढवत आहे.

रोजगार मेळाव्यासाठी उमेदवारांनी येथे करा ऑनलाईन नोंदणी

इच्छुक उमेदवारांनी https://www.apprenticeshipindia.gov.in/  या अधिकृत वेबसाईटवर नाव नोंदणी करावी. तसेच तुमच्या जवळील मेळाव्याचे ठिकाण येथून शोधू शकता. 

  • सर्वप्रथम https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाईटवर जा
  • तिथे इमेज स्लायडिंग मध्ये रोजगार मेळावा के लिये रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करा. डायरेक्ट लिंक https://www.apprenticeshipindia.gov.in/mela-registration (डायरेक्ट लिंक खाली दिलेली आहे)
  • आता Pradhan Mantri National Apprenticeship Mela या सेक्शन मधील सर्व माहिती भरून नोंदणी करा.

रोजगार मेळाव्याच्या ठिकाणांची यादी http://dgt.gov.in/appmela2022/ या पोर्टलवर देखील उपलब्ध आहे.

ज्या उमेदवारांनी या आधीच नावनोंदणी केली आहे त्यांनी सर्व संबंधित कागदपत्रांसह कार्यक्रमस्थळी पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मेळ्याद्वारे रोजगार उमेदवारी सत्रानंतर, उमेदवारांना नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग (NCVET) - मान्यताप्राप्त प्रमाणपत्रे देखील मिळतील. यामुळे त्यांच्या रोजगारक्षमतेत सुधारणा होईल.

Previous Post Next Post