Government Employees : सरकारी कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात, एक दिवसाचे वेतन जूनच्या पगारातून होणार कपात..

Government Employees News : राज्यामध्ये अवकाळी पाऊस, चक्रीवादळ व गारपीट यामुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी तसेच इतर नागरिकांचे नुकसान झाले आहे, या राज्यातील नैसर्गिक आपत्तीच्या मदतकार्यासाठी शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये देणगी म्हणून जमा करण्यास आवाहन करण्यात आले आहे, दिनांक 9 जून 2023 रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार आता राज्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा एक दिवसाचा पगार जून महिन्याच्या पगारातून कपात करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

सरकारी कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात

Government Employees news

राज्यात झालेला अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीत, आपत्तीग्रस्त नागरीकांच्या मदतीसाठी राज्य शासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. अशा परिस्थितीत महासंघाशी संलग्न सर्व विभागातील अधिकारी देखील कर्तव्यभावनेने एक दिवसाचा पगार या मदतकार्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्यास इच्छुक असल्याबाबत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने दि. 19 एप्रिल 2023 रोजीच्या पत्रान्वये शासनाला कळविले आहे.

राज्यातील मदतकार्यासाठी एक दिवसाचे वेतन देण्याचे आवाहन

राज्य शासनातील सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालये, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका/ नगरपरिषद, सार्वजनिक उपक्रमे, महामंडळे, मंडळे तसेच सर्व स्वायत्त संस्थेतील अधिकारी व कर्मचारी यांनी राज्यात पावसामुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत म्हणून एक दिवसाचे वेतन, मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणगी म्हणून देण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.

'पेन्शन' संदर्भात घेतला मोठा निर्णय येथे पहा

एक दिवसाचे वेतन जूनच्या पगारातून होणार कपात

अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीकरीता राज्य शासनाकडून मदतकार्यासाठी पुढाकार घेण्यात आला असून, या नैसर्गिक आपत्तीस सामोरे जाण्यासाठी सहाय्य आणि मदत व पुनर्वसनाच्या कामास आपलाही हातभार लागावा म्हणून राज्यातील सर्व भा.प्र.से., भा.पो.से., भा.व.से व राज्य शासनाचे सर्व अधिकारी/कर्मचारी यांचा सहभाग असावा या कर्तव्यबुध्दीने त्यांना माहे जून, 2023 च्या आपल्या वेतनातील प्रत्येकी 1 दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. [परिपत्रक येथे पहा]

पुढील अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

 

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now