राज्यातील दिव्यांग, वृध्द व निराधारांना विविध योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करण्याबाबत

राज्यातील दिव्यांग, वृध्द व निराधारांना विविध योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करण्याबाबत माननीय सदस्य श्री.प्रसाद लाड, श्री. प्रवीण दटके, श्री. चंद्रशेखर बावनकुळे, श्री. निलय नाईक, श्री. रमेश कराड यांनी विधानभवनात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

राज्यातील दिव्यांग, वृध्द व निराधारांना विविध योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करण्याबाबत

maharashtra government increases honorarium for disabled-senior citizens and orphans

माननीय सदस्यांनी उपस्थित केलाला तारांकित प्रश्न खालीलप्रमाणे

  1. बोर्डी (ता. अकोट, जि. अकोला) येथील वृध्द, निराधार लाभार्थ्यांना माहे एप्रिल, २०२३ ते सप्टेंबर, २०२३ या कालावधीतील संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान थकित असल्याची बाब माहे ऑक्टोबर, २०२३ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय, 
  2. असल्यास, दिव्यांग नागरिकांना विविध योजनेंतर्गत दरमहा रुपये १००० एवढे अनुदान लाभार्थ्यांना वेळेवर मिळत नसून त्यात वाढ करून ३ हजार रुपये करावे आणि एका कुटुंबात जास्त लाभार्थी असल्यास त्यांच्या अनुदानात किमान पाच हजार इतकी वाढ करावी अशी मागणी दिव्यांग नागरिकांकडून करण्यात येत असल्याची बाब माहे सप्टेंबर, २०२३ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे ही खरे आहे काय,
  3. असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने राज्यातील दिव्यांग तसेच निराधारांसाठी नवीन सुसज्ज योजना तयार करून विविध योजनांतर्गत दरमहा देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करुन सदर अनुदान विहित कालावधीत देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
  4. नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

सन्माननीय मुख्यमंत्री यांनी याबाबत पुढीलप्रमाणे खुलासा केला आहे.

  1. (१) हे खरे नाही.

  2. (२), (३) व (४) संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात दरमहा रुपये १०००/- वरुन रुपये १५००/- इतकी वाढ विभागाच्या दिनांक ०५ जुलै, २०२३ च्या शासन निर्णयान्वये करण्यात आली आहे.
दिव्यांग (अपंगांसाठी) असणाऱ्या कल्याणकारी योजना
दिव्यांगांच्या विविध प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत मोठे निर्णय
Previous Post Next Post