विधानसभा सार्वत्रिक निवडणुक-२०२४ : करिता सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याबाबचे शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
राज्यातील सर्व मतदारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याबाबचे शासन परिपत्रक जारी
आपल्या देशातील लोकशाही पध्दतीनुसार असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये १०० टक्के मतदान करणे अपेक्षित आहे. ही बाब लक्षात घेता लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ (भाग-२) मधील नियम १३५ (ब) नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये असे दिसून आले आहे की, संस्था/आस्थापना इ. भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नाहीत. यामुळे अनेक मतदारांना त्यांच्या मतदानापासून वंचित रहावे लागते, जे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे.
भारत निवडणूक आयोगाने दि. १५ ऑक्टोबर, २०२४ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे महाराष्ट्र राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. सदर निवडणूकीचे मतदान दि. २० नोव्हेंबर, २०२४ रोजी होणार आहे.
‘या’ दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर
राज्यातील या कर्मचाऱ्यांना Mediclaim Insurance Policy लागू, परिपत्रक जारी
राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मंजूर उपलब्ध पदांवर समायोजन - शासन शुद्धीपत्रक
भारत निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्य रितीने बजावता यावा यासाठी खालील प्रमाणे आदेश देण्यात आले आहेत.
- निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार/अधिकारी/कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.
- सदर सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादीना लागू राहील. (उदा. खाजगी कंपन्या या मधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाटयगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ.)
- अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत त्यांनी संबंधित जिल्हा निवडणुक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील, कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची भरपगारी सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचा वाढीव मोबदला मंजूर, शासन निर्णय पाहा
‘सक्षम ॲप’ ठरणार दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी वरदान -जाणून घ्या मिळणाऱ्या सुविधा
वर नमूद केल्यानुसार उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी/व्यवस्थापनाने वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी, मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुध्द योग्य कारवाई करण्यात येईल,
सदर परिपत्रक भारत निवडणूक आयोग यांचे क्र.ECI/PN/१४९/२०२४, दि.१५ ऑक्टोबर, २०२४ रोजीचे प्रसिध्दीपत्रक आणि भारत निवडणूक आयोग यांचे क्रमांक ७८/EPS/२०२४, दि.१६ ऑक्टोबर, २०२४ रोजीचे पत्रास अनुसरुन निर्गमित करण्यात आले आहे.
विविध पदांसाठी सरळसेवा भरती ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डायरेक्ट लिंक
महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना विभागांतर्गत सरळसेवा भरती सुरू, जाहिरात पाहा
ICDS अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती सुरू, जाहिरात, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक