MHT-CET : अर्जांमध्ये 'या' तारखेपर्यंत दुरूस्ती करून घ्या, नावातील बदल, जन्मतारीख, फोटो, लिंग, स्वाक्षरी बदलता येणार

MHT-CET 2023 : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना अर्जात दुरुस्ती करण्याची संधी State Common Entrance Test Cell, Maharashtra State यांनी दिली आहे.

एमएचटी सीईटी अर्जात दुरुस्ती करता येणार

mht cet 2023

राज्यातील शैक्षणिक वर्ष MHT-CET 2023 24 करिता, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्यामार्फत अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटी 2023 प्रवेश परीक्षेसाठी उमेदवारांना ऑनलाईन नोंदणी अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे, दरम्यान विद्यार्थ्यांकडून अर्ज करताना वैयक्तिक माहिती जर मध्ये चुका झालेल्या असतील तर त्या आता दुरुस्त करता येणार आहे.

आता उमेदवारांना नाव, जन्मतारीख, फोटो, स्वाक्षरी आणि लिंग दुरुस्ती करण्यासाठी त्यांचा भरलेला अर्जात Edit करून  हा बदल करता येणार आहे.

Now candidate can edit their confirmed application form to correct the Candidate name, Date of birth, Candidate photo, Signature and Gender. The period for making the above changes is from 21/04/2023 to 25/04/2023.{alertInfo}

एमएचटी सीईटी दुरुस्तीची अंतिम मुदत 25 एप्रिल 

एमएचटी सीईटी - 2023 सदरील परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक व माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याची सर्व संबंधीत विद्यार्थी/ पालक/ संस्था यांनी कृपया नोंद घ्यावी. असे प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे.

एमएचटी सीईटी अर्जातील बदल करण्याचा कालावधी 21 एप्रिल 2023 ते 25 एप्रिल 2023 पर्यंत आहे.

MHT CET - Editing of application form has been started as per the schedule. Last date to edit your confirmed application form is 25/04/2023.{alertInfo}

MHT CET Official Website

MHT CET Website - www.mahacet.org 


विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅब आणि 6 GB इंटरनेट फ्री, असा करा ऑनलाईन अर्ज

महत्वपूर्ण बातम्या


Previous Post Next Post