ITI Admission 2023 : आयटीआय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू; प्रक्रियेतील टप्पे, प्रवेशाचे वेळापत्रक जाणून घ्या..

ITI Admission 2023 : आयटीआय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया दिनांक 12 जून 2023 पासून सुरू झाली असून, ऑनलाईन प्रवेश अर्ज नोंदणी करण्याची अंतिम मुदत 11 जुलै 2023 पर्यंत आहे, यंदा ITI Admission 2023 करिता एकूण चार फेऱ्या असून, एक समुपदेशन फेरी आणि एक ITI संस्थेतील फेरी अशा एकूण सहा फेऱ्या असणार आहेत, आयटीआय प्रवेश प्रक्रियेतील टप्पे व प्रवेशाचे वेळापत्रक जाणून घेऊया..

आयटीआय प्रवेश प्रक्रियेतील टप्पे

ITI Admission

माहितीपुस्तिका

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तसेच प्रवेश संकेत स्थळावर "आय.टी.आय. प्रवेश माहितीपुस्तिका प्रवेश पध्दती, नियमावली व प्रवेश प्रक्रीयेतील विविध स्तरावर करावयाच्या कार्यवाहीसाठी प्रमाणित कार्यपध्दती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. माहिती पुस्तिकेत देण्यात आलेली माहिती, नियम व प्रवेश पध्दतीचा अभ्यास करुनच उमेदवारांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करावा.

आयटीआय ऑनलाईन प्रवेश अर्ज

 1. ऑनलाईन प्रवेश अर्जासाठी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. 
 2. प्रवेश अर्जात प्राथमिक माहिती भरल्यानंतर उमेदवारांचे प्रवेश खाते (Admission Account) त्यांचा नोंदणी क्रमांक (Registration Number) हाच User ID म्हणून तयार होईल. 
 3. नोंदणी क्रमांक व User ID चा वापर करुन उमेदवारांनी त्यांच्या कडील दस्तऐवजाच्या आधारे प्रवेश अर्जात संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरावी. 
 4. प्रवेश अर्ज पूर्ण भरल्यावर सर्व माहिती बरोबर असल्याची पुनच्छ: खात्री करुन घ्यावी.
 5. प्रवेश अर्जातील माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यावरच प्रवेश अर्ज शुल्क ऑनलाईन स्वरुपात जमा करावे.

प्रवेश अर्ज पडताळणी (Verification) व निश्चित (Confirmation) करणे

 • प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी उमेदवाराने प्रवेश अर्जातील माहिती/ दाव्यांच्या पृष्ठ्यर्थ आवश्यक मुळ दस्तऐवज / कागदपत्रे जवळच्या औ.प्र. संस्थेत (ITI कॉलेज) पडताळणीसाठी सादर करावेत. 
 • औ.प्र. संस्थेतील अधिकारी मुळ अर्जातिल माहितीची सादर केलेल्या मूळ दस्ताऐवजावरुन काळजीपूर्वक तपासणी करतील व अर्जाचे निश्चितीकरण करुन "अर्ज निश्चितीकरण पावती" (Application Confirmation Slip) व निश्चित केलेल्या प्रवेश अर्जाची (Confirmed Application Form) प्रत देतील. 
 • प्रवेश अर्ज निश्चित झाल्यावर अर्जातील कोणत्याच माहितीत बदल करता येणार नाही याची नोंद घ्यावी.

पहिल्या प्रवेश फेरीसाठी विकल्प सादर करणे

प्रवेश अर्ज निश्चित केल्यावरच पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करण्यासाठी प्रवेश संकेतस्थळावर नोंदणी क्रमांक (Registration No.) व पासवर्ड (Password) व्दारे प्रवेश (Login) करुन सादर करावेत.

प्राथमिक गुणवत्ता यादी तपासणे व हरकती नोंदविणे

 • प्राथमिक गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल व उमेदवारांना SMS व्दारे कळविण्यात येईल.
 • मेदवारास प्रवेश अर्जातील काही निवडक माहितीत बदल करण्याची संधी "हरकती नोंदविणे या कालावधीत उपलब्ध करुन देण्यात येईल. 
 • याकरीता उमेदवाराने प्रवेश संकेतस्थळावर आपल्या खात्यात प्रवेश (Login) करुन प्रवेश अर्जातील माहितीत आवश्यक बदल करावेत. सदर कालावधीनंतर प्रवेश अर्जात कोणताच बदल करता येणार नाही.

प्रवेश फेरीत निवड व प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही

 1. प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसायनिहाय निवडयादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल व उमेदवारांना SMS व्दारे कळविण्यात येईल
 2. उमेदवारांना निवड झालेल्या संस्थेत प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश निश्चित करण्यासाठी प्रवेश अर्जात सादर केलेल्या माहितीच्या पृष्ठ्यर्थ आवश्यक दस्तऐवज सादर करणे अनिवार्य राहिल. प्रवेश अर्जातील माहिती व त्या पृष्ठ्यर्थे सादर केलेल्या दस्तऐवजांतील माहितीत तफावत आढळल्यास प्रवेश नाकारण्यात येईल याची नोंद घ्यावी.

पुढील प्रवेश फेरीसाठी विकल्प सादर करणे

 • निवड न झालेल्या वा प्रवेश न घेतलेल्या उमेदवारांनी पुढील प्रवेश फेरीसाठी Online पध्दतीने व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करावेत. 
 • उमेदवाराने नव्याने विकल्प सादर न केल्यास उमेदवाराने पूर्वीच्या प्रवेश फेरीमध्ये सादर केलेले जुनेच विकल्प या प्रवेश फेरीमध्ये विचारात घेण्यात येतील. 
 • दुसरी, तिसरी व चौथी प्रवेश फेरी बाबात पुढील कार्यवाही वरील प्रमाणेच राहिल.

नव्याने अर्ज करणे

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण/अनुत्तीर्ण व अद्याप पर्यंत कोठेही प्रवेश न घेतलेल्या तसेच औ. प्र. संस्थेत प्रवेशासाठी अर्ज न केलेल्या उमेदवारांसाठी प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा/ संस्थास्तरीय समुपदेशन फेरीपूर्वी नव्याने अर्ज करण्याची प्रवेश अर्ज शुल्क भरुण्याची व प्रवेश अर्ज निश्चित करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येईल.

शासकीय व खाजगी औ.प्र. जिल्हास्तरीय / संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी नाव नोंदणी

 1. नोंदणीकृत उमेदवारांनी औ.प्र. संस्थानिहाय व व्यवसाय निहाय रिक्त जागांचा अभ्यासकरुन जिल्हा/ संस्थास्तरीय समुपदेशन प्रवेश फेरीसाठी आपल्या प्रवेश खात्यात प्रवेश (Login) करुन कोणत्याही एका जिल्हा/ संस्थेच्या समुपदेशन फेरीकरिता दिलेल्या वेळापत्रकानुसार नोंदणी करावी. 
 2. संगणक प्रणालीव्दारे जिल्हा/ संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी जिल्हा/ संस्थानिहाय गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात येईल, समुपदेशन फेरीसाठी वेळ व दिनांक जाहीर करण्यात येईल व याबाबत उमेदवारास त्यांच्या प्रवेश खात्यात व SMS व्दारे माहिती देण्यात येईल.

समुपदेशन फेरी

दिलेल्या वेळ व दिनांकास हजर असलेल्या उमेदवारांना त्यांच्या गुणवत्ता क्रमांकानुसार समुपदेशनाकरिता बोलाविण्यात येईल व प्रवेशाकरिता उपलब्ध जागा, उमेदवाराची मागणी, उमेदवाराची अर्हता या आधारावर प्रवेशाच्या जागांचे वाटप करणे.

सदर प्रवेशफेरीत जागा बहाल करण्यात आलेल्या उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीनंतर संबंधित औ. प्र. संस्थेत दिलेल्या मुदतीत प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करावी.

संस्था स्तरावरील प्रवेश

खाजगी औ.प्र. संस्थांमध्ये संस्थास्तरावरील जागा व पाचव्या प्रवेश फेरीनंतर रिक्त राहिलेल्या जागांवर ज्या उमेदवारांची प्रवेश घेण्याची इच्छा आहे त्यांनाही त्यांची तपशिलवार माहितीसह प्रवेश संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल.

नोंदणीकृत उमेदवारांनी ज्या खाजगी औ.प्र. संस्थेत प्रवेश घ्यावयाचा आहे त्या संस्थेत व्यक्तीश: हजर राहून सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या |पडताळणीनंतर प्रवेश प्रक्रीया पूर्ण करावी. केंद्रीय प्रवेश प्रक्रीयेच्या पहिल्या फेरीपासून ते प्रवेशाच्या अंतिम दिनांकापर्यंत खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये संस्था स्तरावरील जागांवर उमेदवारांना प्रवेश घेता येतील.

आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक 2023

 • ऑनलाईन प्रवेश अर्ज नोंदणी - 12 जून 2023 ते 11 जुलै 2023
 • प्रवेश अर्ज निश्चित करणे - 19 जून  2023 ते 11 जुलै  2023
 • प्राथमिक गुणवत्ता यादी - 13 जुलै 2023
 • अंतिम गुणवत्ता यादी - 16 जुलै 2023
 • पहिली प्रवेश फेरी - 20 जुलै 2023
 • दुसरी प्रवेश फेरी -  31 जुलै  2023
 • तिसरी प्रवेश फेरी -  9 ऑगस्ट 2023
 • चौथी प्रवेश फेरी - 21 ऑगस्ट 2023 ते 24 ऑगस्ट 2023 
 • संस्था स्तरावरील समपुदेशन फेरी - 27 ऑगस्ट 2023 ते 28 ऑगस्ट 2023

आयटीआय साठी ऑनलाईन अर्ज - https://admission.dvet.gov.in/
माहितीपुस्तिका डाउनलोड करा - आयटीआय माहिती पुस्तिका
ऑनलाईन अर्ज असा करा - मार्गदर्शक सूचना

Previous Post Next Post