Employee Promotion : आनंदाची बातमी ! शिक्षक संवर्गाच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा; वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्याबाबत बैठकीचे आयोजन..

Employee Promotion News : जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षक संवर्गाच्या पदोन्नती संदर्भात आता शासनाने केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी (शिक्षण) श्रेणी - २ संवर्गाच्या पदोन्नती प्रक्रिया राबविण्याबाबत मान्यता दिली असून, लवकरच पात्र शिक्षकांना पदोन्नती मिळणार आहे, तसेच पदोन्नती मिळालेल्या पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुखांना वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देणेबाबत एका महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, सविस्तर बातमी पाहूया..

शिक्षक संवर्गाच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा

Employee Promotion News

जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाची विविध टप्प्यातील पदोन्नती प्रक्रिया बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे. आता याबाबत दिनांक १५ जून २०२३ रोजी  शासनाने जारी केलेल्या पत्रान्वये केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी (शिक्षण) श्रेणी-२ संवर्गाच्या पदोन्नती प्रक्रिया राबविण्याबाबत कळविले आहे.

केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी (शिक्षण) श्रेणी - २ संवर्गाच्या पदोन्नती प्रक्रियेबाबत कालबध्द कार्यक्रम तयार करून, त्यानुसार तात्काळ पदोन्नतीची कार्यवाही सुरु करावी. याबाबत मा. शालेय शिक्षण मंत्री यांनी दिनांक १४ जून २०२३ रोजी झालेल्या बैठकीत सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता शिक्षक संवर्गाच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला असून, लवकरच पात्र शिक्षकांना पदोन्नती मिळणार आहे. [केंद्रप्रमुखांना टॅबलेट येथे पहा]

Employee Promotion News

पदवीधर मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुखांना एक वेतनवाढ मिळणार

पदवीधर वेतनश्रेणी घेत असलेल्या पदवीधर प्राथमिक शिक्षकातून पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुखपदी पदोन्नती मिळालेल्या पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुखांना वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देणेबाबत आता  मा. मंत्री (ग्राम विकास विभाग) यांच्या मंत्रालयीन दालनात दिनांक २० जून २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता बैठक आयोजित केली आहे. 

Employee Promotion News

त्यामुळे आता पदोन्नती मिळालेल्या पदवीधर मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुखांना वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्यासंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे.

कार्यालयीन कार्यपद्धती सुधारित नियमपुस्तिका PDF

नवनविन अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

 

Previous Post Next Post