BARTI UPSC Coaching : 'बार्टी' मार्फत विद्यार्थ्यांना दिल्लीत मिळणार युपीएससीचे मोफत कोचिंग; प्रशिक्षणाबरोबर मिळणार विद्यावेतन, सविस्तर जाणून घ्या..

BARTI UPSC Coaching : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI), पुणे मार्फत दिल्ली येथील नामांकित प्रशिक्षण संस्थांमध्ये राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी संघ लोकसेवा आयोग-नागरी सेवा (UPSC) परीक्षेसाठी मोफत अनिवासी प्रशिक्षण (Coaching) राबविण्यात येणार आहे. प्रशिक्षणाबरोबर विद्यावेतन देखील देण्यात येणार आहे, त्याकरिता १४ ऑगस्टपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे. सविस्तर जाणून घेऊया..

BARTI UPSC Coaching

'बार्टी' मार्फत विद्यार्थ्यांना दिल्लीत मिळणार युपीएससीचे मोफत कोचिंग

राज्यातील अनुसूचित जातीतील ३०० उमेदवारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत दिल्ली येथील प्रशिक्षण संस्थेमध्ये संघ लोकसेवा आयोग-नागरी सेवा परीक्षेच्या (Preliminary and Main) पूर्वतयारी प्रशिक्षणासाठी पुरस्कृत (Sponsor) करण्यात येणार आहे.

दिनांक २७ ऑगस्ट २०२३ रोजी सामायिक प्रवेश परीक्षा Common Entrance Test (CET) आयोजित करण्यात आली असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी http://www.siac.org.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन ‘बार्टी’चे महासंचालक सुनील वारे यांनी केले  आहे.

मोफत प्रशिक्षणाबरोबर मिळणार विद्यावेतन 

बार्टी संस्थेमार्फत दिल्ली येथील प्रशिक्षण संस्थेचे प्रशिक्षण शुल्क देण्यात येते, हे प्रशिक्षण अनिवासी असल्याने उमेदवारांना दिल्ली येथील निवास व भोजनाची व्यवस्थेकरिता प्रती माह कमाल रक्कम १३ हजार रुपये विद्यावेतन (Stipend) देण्यात येते. विद्यावेतन करिता विद्यार्थ्यांची उपस्थिती ग्राह्य धरण्यात येते. 

प्रशिक्षणाच्या सुरवातीस दिल्ली येथे जाण्याकरिता ५ हजार रुपये (एकदाच) व प्रशिक्षण संपल्यानंतर परतीच्या प्रवासाकरिता ५ हजार रुपये (एकदाच) प्रवास खर्च देण्यात येतो. पहिल्या महिन्यातील आर्थिक सहाय्य ३ हजार रुपये (एकरकमी) देण्यात येते, अशी माहिती महासंचालक श्री. वारे यांनी दिली.

यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी राखीव जागांचा कोटा

यूपीएससी परीक्षेच्या पूर्व तयारी प्रशिक्षणासाठी दिल्लीतील केंद्रासाठी अनुसूचित जातीच्या ३०० उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्यामध्ये ३० टक्के जागा महिलांसाठी, ४ टक्के जागा दिव्यांग व्यक्तीसाठी (Person With Disability), ५ टक्के जागा अनुसूचित जाती अंतर्गत वंचित जातीमधील (वाल्मिकी व तत्सम जाती- होलार, बेरड, मातंग, मांग, मादगी इ.) विद्यार्थ्यांकरिता आरक्षित असतील, एकूण जागांच्या ५% जागा विशेष बाब म्हणून राखीव ठेवण्यात येणार आहे.

आवश्यक  पात्रता

  1. उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  2. उमेदवाराकडे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा दाखला व अधिवास प्रमाणपत्र असावे. 
  3. उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. 
  4. उमेदवाराचे वय संघ लोकसेवा आयोग-नागरी सेवा परीक्षेच्या अटी व शर्ती नुसार असावे. 
  5. संघ लोकसेवा आयोगामार्फत सन २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेसाठी उमेदवार पात्र असावा. 
  6. रुपये ८ लाखापर्यंत कौटुंबिक उत्पन्न मर्यादा असलेले उमेदवार प्रशिक्षणासाठी पात्र असतील.
BARTI UPSC Coaching

तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी http://www.siac.org.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post Next Post