Unique Disability ID : दिव्यांग व्यक्तींना विना पास मिळणार प्रवास सवलत; एसटीमध्ये केंद्राचे दिव्यांग ओळखपत्र (UDID Card) चालणार..

Unique Disability ID : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दिव्यांग व्यक्तींच्या प्रवासासंदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे, आता दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्या सोबतच्या साथीदारास बसमध्ये प्रवासाची अनुक्रमे 70 टक्के आणि 50 टक्के प्रवास सवलत देण्यात येते, यासाठी आता केंद्र सरकारद्वारे देण्यात येणाऱ्या वैश्विक कार्ड (Unique Disability ID) कार्ड हेच आता प्रवास सवलत देण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे, त्यामुळे आता लाखो दिव्यांग बांधवाना याचा दिलासा मिळाला आहे.

दिव्यांग व्यक्ती व त्यांच्या साथीदारास अनुक्रमे 75 टक्के व 50 टक्के प्रवास सवलत

Unique Disability ID

दिव्यांग हक्क अधिनियम 2016 कायदा (RPWD Act) देशभरात लागू करण्यात आला आहे, त्यानुसार आता 21 दिव्यांग प्रकाराचा समावेश करण्यात आला असून, दिव्यांग व्यक्तीना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी केंद्र शासनाने देशातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी एकाच प्रकारचे दिव्यांग प्रमाणपत्र म्हणजेच Unique Disability ID (युडीआयडी कार्ड) देण्यास सुरुवात केली आहे. या एका दिव्यांग ओळखपत्राने सर्व योजनांचा लाभ दिव्यांगाना घेता येतो.

यासंदर्भात एसटी बस मध्ये दिव्यांग व्यक्तींना व त्यांच्या सोबत असणाऱ्या व्यक्तीस गृह विभागाच्या दिनांक 9 ऑक्टोबर 2018 च्या शासन निर्णयानुसार 40 टक्के तसेच त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व (अपंगत्व) असलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना रा.प. महामंडळाच्या साध्या तसेच निमआराम बसेसमध्ये 75 टक्के सवलत अनुज्ञेय करण्यात आली असून, 65 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या लाभार्थ्याच्या साथीदारास 50 टक्के प्रवास सवलत अनुज्ञेय करण्यात आली आहे. [केंद्राप्रमाणे मिळणार वाहतूक भत्ता पहा]

त्याचबरोबर दिव्यांग लाभार्थ्यांस व त्यांचे साथीदारास शिवशाही [आसनी] बसेसमध्ये अनुक्रमे 70 टक्के व 45 टक्के सवलत अनुज्ञेय करण्यात आली आहे. [दिव्यांगांसाठी असणाऱ्या कल्याणकारी योजना येथे पहा]

एसटीमध्ये केंद्राचे दिव्यांग ओळखपत्र (UDID Card) चालणार

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 च्या अनुषंगाने केंद्र शासनाने दिव्यांग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्र (UDID Card) व अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु केली आहे. परंतु सदरचे देण्यात येणारे वैश्विक ओळखपत्र प्रवासादरम्यान सवलतीकरीता ग्राहय धरण्यात येत नसल्याचे तक्रारी प्राप्त होत होत्या.

सदर तक्रारीच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दिनांक 22 जून 2023 रोजी सर्व विभाग नियंत्रक यांना कळविले आहे की, दिव्यांग लाभार्थ्यांना प्रवास सवलतीकरीता केंद्र शासनाद्वारे देण्यात येणारे वैश्विक ओळखपत्र (Unique Disability ID) ग्राहय धरण्याबाबत कळविण्यात आले आहे.

सदर वैश्विक ओळखपत्रावर आगार व्यवस्थापक यांची सही व शिक्का देणे शक्य नसल्याने 65 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या लाभार्थ्यास प्रवासात साथीदार आवश्यक आहे. अशा लाभार्थ्यांची तपासणी करुन त्यांस विहित नमुन्यात कागदी पासचा दाखला देण्यात येतो. 

परंतु असा देण्यात येणारा कागदी पासचा दाखला हा हाताळणे अवघड असल्याने तसेच सदरचा कागदी पास खराब होणे, फाटण्याची शक्यता असल्याने सदर दिव्यांग लाभाच्यांच्या साथीदारास ( पूर्वी रा.प. महामंडळाव्दारे देण्यात येणा-या कागदी पासाशिवाय) दिव्यांग व्यक्तींच्या वैश्विक ओळखपत्रावर नमूद अपंगत्वाच्या टक्केवारीच्या आधारे रा.प.प्रवासभाड्यात सवलत अनुज्ञेय करण्याबाबत कळविले आहे. [परिपत्रक]

पुढील अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

 

Previous Post Next Post