राज्यातील संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन कधी मिळणार? सरकारने दिले स्पष्टीकरण

Gram Panchayat Employees : राज्यातील ग्रामपंचायत अंतर्गत कार्यरत असणाऱ्या संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन कधी मिळणार? याबाबत राज्याच्या पावसाळी अधिवेशनात अतारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता, याबाबत सरकारने यावलकर समितीच्या आणि वित्त विभागाकडे सादर केलेल्या प्रस्तावाबाबत महत्वाचे स्पष्टीकरण दिले आहे.

$ads={1}

राज्यातील संगणक परिचालकांची 11 वर्षापासून अविरत सेवा

Gram Panchayat Employees

ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या पूर्वीच्या संग्राम व सध्याच्या आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पात मागील 11 वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर (Gram Panchayat Employees) संगणक परिचालक (Computer Operators) कार्यरत असून, ग्रामीण भागातील सुमारे सहा कोटी जनतेला विविध प्रकारच्या सेवा अविरतपणे देत आहेत.

राज्यातील संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी (Employee Status) दर्जा व किमान वेतन (Minimum Pay) या मागणीसाठी संगणक परिचालकांच्या विविध संघटनांनी दिनांक 27 डिसेंबर 2022 रोजी नागपूर येथे आंदोलन केले होते.

ग्रामविकास विभागाने स्थापन केलेल्या यावलकर समितीने सन 2018 मध्ये सर्व संगणक परिचालकांना ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याची मागणी शासनाकडे केली व या मागणीच्या अनुषंगाने दिनांक 11 मार्च 2021 रोजी वा त्यासुमारास संगणक परिचालकांच्या मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन दिले होते.

उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय? चौकशीच्या अनुषंगाने संगणक परिचालकांना ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याच्या दृष्टीने कोणती कार्यवाही अथवा उपाययोजना केली वा करण्यात येत आहे. याबाबत विधानपरिषद मा. सदस्य अॅड. निरंजन डावखरे, श्री. प्रविण दरेकर, श्री. प्रसाद लाड, श्री. रमेशदादा पाटील, श्री. निलय नाईक, श्रीमती उमा खापरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

राज्यातील संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन कधी मिळणार?

वरील प्रश्नांच्या अनुषंगाने सरकारने पुढीलप्रमाणे स्पष्टीकरण दिले आहे. यावलकर समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने संगणक परिचालकांच्या मागण्यासंदर्भात तत्कालीन मा. मंत्री (ग्रामविकास) यांनी दिनांक 11 मार्च 2021 रोजी संघटनेला पत्र दिले आहे. 

ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या लोकसंख्या वाढीस अनुसरून आकृतिबंध सुधारण्याबाबत दिनांक 2 ऑगस्ट 2017 च्या परिपत्रकान्वये मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रायगड यांचे अध्यक्षतेखाली यावलकर समिती गठीत करण्यात आली होती.

हे ही वाचा - अनुकंपा भरतीबाबत मोठा निर्णय पहा - कंत्राटी तत्वावरील कर्मचाऱ्यांना वेतनवाढ

सदर समितीच्या अहवालामध्ये संगणक परिचालक यांना ग्रामपंचायतीचे कर्मचारी दर्जा देऊन त्यांना किमान वेतन देण्याबाबत शिफारस केलेली नाही. तथापि, सदर आकृतीबंधामध्ये लिपिक, वसूली कारकून किंवा डाटा ऑपरेटर हे पद पर्यायी म्हणून अंतर्भूत करण्यात आलेले आहे.

$ads={2} 

त्यानुसार ग्रामपंचायत कर्मचारी यांचे सुधारीत आकृतीबंधाचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करण्यात आला असता, वित्त विभागाने त्यामध्ये काही त्रुटी उपस्थित केल्या आहेत. असे लेखी उत्तर सरकारच्या वतीने अतारांकित प्रश्नाला देण्यात आले आहे.

हे ही वाचा - जुलै च्या पगारात मोठी वाढ होणार कंत्राटी तत्वावरील कर्मचाऱ्यांना वेतनवाढ -जुनी पेन्शन योजना लेटेस्ट न्यूज पहा

Previous Post Next Post