Bank Holidays In September 2023 :अबब! सप्टेंबर महिन्यात बँकांना 17 दिवस सुट्ट्या! महाराष्ट्रातील बँका 'या' दिवशी राहणार बंद...

Bank Holidays In September India 2023 : सप्टेंबर महिन्यामध्ये आता बहुतांश सण, उत्सव आल्यामुळे राष्ट्रीय तसेच, स्थानिक प्रादेशिक सुट्ट्यामुळे बँका बंद असणार आहे, राज्यामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी ते ईद-ए-मिलाद-उल-नबी या सणानिमित्त बँकांना सुट्ट्या (Bank Holidays) असणार आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया द्वारे सप्टेंबर महिन्यातील बँकांना मिळणाऱ्या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत त्यामध्ये सप्टेंबर 2023 (September 2023) या महिन्यात बँकांना तब्बल 17 दिवस सुट्ट्या असणार आहे. महाराष्ट्रातील बँका किती दिवस असतील बंद? जाणून घेऊया...

$ads={1}

सप्टेंबर 2023 मधील बँक सुट्ट्यांची यादी | Bank Holidays In September India 2023

Bank Holidays In September 2023

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया द्वारे जाहीर करण्यात आलेल्या संपूर्ण देशातील सप्टेंबर महिन्यातील बँक सुट्ट्या यादी खालीलप्रमाणे, यामध्ये राज्यनिहाय सुट्ट्या वेगवेगळ्या आहेत. महाराष्ट्र राज्यातील सुट्ट्या कोणत्या दिवशी असणार आहे, ते खाली दिलेले आहे.

 1. 3 सप्टेंबर 2023 - रविवार
 2. 6 सप्टेंबर 2023 - श्री कृष्ण जन्माष्टमी (Shri Krishna Janmashtami)
 3. 8 सप्टेंबर 2023 - G-20 शिखर परिषद (G-20 Summit)
 4. 7 सप्टेंबर 2023 - गोपाळकाला
 5. 9 सप्टेंबर 2023 - दुसरा शनिवार 
 6. 10 सप्टेंबर 2023 - रविवार
 7. 17 सप्टेंबर 2023 - रविवार
 8. 18 सप्टेंबर 2023 - हरतालिका तृतीय, वर्षसिद्धी विनायक व्रत आणि विनायक चतुर्थी
 9. 19 सप्टेंबर 2023 - गणेश चतुर्थी (गणेशोत्सव सुरवात)
 10. 20 सप्टेंबर 2023- गणेश चतुर्थी (दुसरा दिवस) आणि नुआखाई (ओडिशा).
 11. 22 सप्टेंबर 2023- गौरी पूजन, श्री नारायण गुरु समाधी दिन.
 12. 23 सप्टेंबर 2023 - चौथा शनिवार, महाराजा हरि सिंह (जम्मू आणि काश्मीर) यांची जयंती
 13. 24 सप्टेंबर 2023- रविवार
 14. 25 सप्टेंबर 2023: श्रीमंत शंकरदेव यांची जयंती
 15. 27 सप्टेंबर 2023- मिलाद-ए-शरीफ (प्रेषित मोहम्मद यांचा जन्मदिवस).
 16. 28 सप्टेंबर 2023- ईद-ए-मिलाद किंवा ईद-ए-मिलादुन्नबी (बारा वफत)
 17. 29 सप्टेंबर 2023 - ईद-ए-मिलाद-उल-नबी (जम्मू आणि काश्मीर) नंतर इंद्रजात्रा आणि शुक्रवार

महाराष्ट्रातील सप्टेंबर 2023 मधील बँक सुट्ट्यांची यादी | Bank Holidays In September Maharashtra 2023

$ads={2}

महाराष्ट्र राज्यातील बँकांना एकूण 8 दिवस सुट्ट्या असणार आहे. त्यामध्ये एकूण चार रविवार आणि दोन दुसरा व चौथा शनिवार, आणि दिनांक 19 सप्टेंबर 2023 गणेश चतुर्थी, 28 सप्टेंबर 2023 ईद-ए-मिलाद किंवा ईद-ए-मिलादुन्नबी (बारा वफत) निमित्त सुट्टी देण्यात आली आहे. म्हणजेच सप्टेंबर महिन्यात बँकांना एकूण 8 दिवस सुट्ट्या असणार आहे.


Previous Post Next Post