महाराष्ट्र नगरपिरषद राज्यसेवा गट क परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Maharashtra Municipal Council Rajyaseva Group C Exam Schedule Announced : नगरपरिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा संवर्गामधील विविध पदे नामनिर्देशनाने, सरळसेवेने भरण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट क परीक्षा २०२३ पदभरतीची जाहिरात दि. १३ जुलै, २०२३ रोजी राज्यातील विविध वृत्तपत्रात प्रसिध्द करण्यात आली होती. या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

$ads={1}

महाराष्ट्र नगरपिरषद राज्यसेवा गट क परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट क जाहिरात संचालनालयाच्या संकेतस्थळावर, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग तसेच केंद्र शासनाच्या कामगार व रोजगार मंत्रालयाच्या National Career Service या पोर्टलवर निर्गमित करण्यात आलेली होती, त्यानुसार दि. १३ जुलै २०२३ ते दि. २० ऑगस्ट, २०२३ या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते.

त्यानुसार आता सदर विविध संवर्गांची ऑनलाईन परीक्षा ही दि. २५ ऑक्टोबर २०२३ ते दि. ०३ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे. याबाबत संवर्गनिहाय सविस्तर वेळापत्रक परीक्षेपूर्वी https://mahadma.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे.

इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी! जाहिरात
Maharashtra Municipal Council Rajyaseva Group C Exam Schedule Announced
कर्मचारी अपडेट्स - कंत्राटी कर्मचारी - सरकारी कर्मचारी

$ads={2}

तलाठी भरती परीक्षा निकाल कट ऑफ जिल्हानिहाय डायरेक्ट लिंक

सरकारी जॉब अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post