11th Admission : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, येथे पहा..

11th Admission 2023 : राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दिनांक 25 मे 2023 पासून 11 वी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे, यंदा दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर होण्याआधीच आता अकरावी प्रवेश प्रक्रीयेचा भाग 1 भरता येणार आहे.

अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

11th Admission 2023

मुंबई महानगर क्षेत्र, पुणे-पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रांसह नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील उच्च माध्यमिक शाळांमध्ये इ.११ वी चे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येतात. सन. २०२३-२४ मध्ये मुंबई महानगर क्षेत्र, पुणे-पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रांसह नाशिक, अमरावती व नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील इ.११वी प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संचालनालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 25 मे 2023 पासून ते दहावीच्या निकालापर्यंत ऑनलाईन प्रवेश अर्जाचा भाग एक भरता येणार आहे.

दहावी-बारावी निकाल या तारखेला जाहीर होणार येथे पहा

अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक 

११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२३-२४ प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य टप्पे


 • विद्यार्थी, पालक, कनिष्ठ महाविद्यालये यांचे उद्बोधन, प्रशिक्षण, जनजागृती व प्रसिद्धी - मे 2023
 • Mock Demo Registration for Students विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर नोंदणी व अर्जाचा भाग-१ Dummy Form भरणेबाबात सराव करणे - दिनांक 20 मे ते 24 मे 2023 पर्यंत
 • Actual Student Registration & Part- १ विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर नोंदणी व अर्जाचा भाग-१ भरणे अर्ज प्रमाणित / Verify करुन घेणे - दि. २५ मे, २०२३ स. ११:00 वा पासून राज्यमंडळ इ.१० वी निकालापर्यंत
 • Form Part- Verification by GCs विद्यार्थी प्रवेश अर्जातील माहिती, भाग-१ ऑनलाईन तपासून प्रमाणित / Verify करणे. - दि. २५ मे, २०२३ पासून सुरु राज्यमंडळ इ. १०वी निकालानंतर दोन दिवस पर्यंत
 • Jr. College Registration उच्च माध्यमिक विद्यालय नोंदणी. कमवि नी भरलेली माहिती तपासून शिडसे यांनी ऑनलाईन प्रमाणित (Verify / Edit) करणे. - दिनांक 20 मे 2023 पासून सुरू राज्यमंडळ इ 10 वी निकाल येईपर्यंत
 • CAP Option Form for students (Part-२) विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या पोर्टलवर पसंतीक्रम नोंदविणे, (प्रवेश अर्जाचा भाग-२ भरणे) - राज्यमंडळ इ.१० वी निकालानंतर सुरु होईल, (साधारणपणे पाच दिवस) टीप - प्रत्येक फेरीपूर्वी सुरु असेल.
 • कोटांतर्गत राखीव जागांवरील प्रवेश सुरु अल्पसंख्याक कोटा - ५०%, इनहाऊस कोटा- १०%, व्यवस्थापन कोटा- ०५%, राज्यमंडळ इ.१०वी निकालानंतर सुरु होईल, (साधारणपणे पाच दिवस) टीप - यासाठी कार्यवाहीचे वेळापत्रक स्वतंत्रपणे देण्यात येईल.
 • CAP नियमित फेरी - १ - राज्यमंडळ इ. १० वी निकालानंतर १० ते १५ दिवस
 • CAP नियमित फेरी - २ (७ ते ९ दिवस)
 • CAP नियमित फेरी - ३ (७ ते ९ दिवस)
 • CAP विशेष फेरी - १ (७ ते ८ दिवस)
 • CAP विशेष फेरी - २ ATKT सहभाग (एक आठवडा)

Previous Post Next Post